आजच्या मराठी चालू घडामोडी २२-०२-२०२२ – current affairs in Marathi 22 Feb 2022

आजच्या मराठी चालू घडामोडी २२-०२-२०२२ – current affairs in Marathi 22 Feb 2022

आजच्या मराठी चालू घडामोडी २२-०२-२०२२ - current affairs in Marathi 22 Feb 2022

रशिया- युक्रेनच्या युद्धाला तोंड फुटले बंडखोरांच्या ताब्यातील प्रदेश केले स्वतंत्र घोषित. युक्रेनच्या सामान्य नागरिकांना युद्ध व शस्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.
लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षाची शिक्षा देशभर गाजलेल्या चारा घोटाळ्यातील पाचव्या प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना विशेष सीबीआय न्यायालयाने पाच वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली.
पुष्पा या वर्षातील सर्वोत्तम चित्रपट ठरला आहे. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022 चा रविवारी मुंबईत पार पडला यामध्ये ब्लॉकबस्टर हिट पुष्पा द राईज हा सर्वोत्तम चित्रपट ठरला.
कर्करोग निदानासाठी वरदान ठरणार मॉलिक्युलर लॅब राज्यातील एकमेव लॅब असणार.
डिसेंबर महिन्यात मिळाले 14.60 लाख रोजगार. देशात पुन्हा एकदा रोजगार वाढत आहे कर्मचारी भविष्य निधी संघटनेला ई पी एफ ओ मध्ये डिसेंबर 2021 ला 14.60 लाख नवे सदस्य मिळालेले आहे
इंडियाबुल्स च्या मुंबईतील मालमत्तांवर ई डी चे छापे… ब्लॅक मनी विरोधातील कायद्यान्वये कारवाई.


दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीची क्रीडा गुण इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षेच्या सातारा वरून. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड.
सोळा वर्षाच्या आर प्रज्ञानंद ची विश्व विजेता कार्लसन वर मात.. भारताचा युवा ग्रँड मास्टर आर प्रज्ञानंद याने एअर विंग मास्टर्स जलद बुद्धिबळ ऑनलाइन स्पर्धेच्या आठव्या फेरीत जागतिक क्रमांक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या विश्व विजेता मॅग्नस कार्लसन याचा एकतर्फी पराभव करत खळबळ माजवून दिली.
T20 मध्ये भारत नंबर वन. भारतीय संघाने घरच्या मैदानावर एक दिवस मालिका पाठोपाठ टी-ट्वेंटी तही पाहुण्या वेस्टइंडीज चा 3.0 ने क्‍लीन स्वीप देऊन मालिका विजय सोबतच भारताने टी-20 क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर मजल मारली आहे. भारताच्या खात्यात 269 रेटिंग गुण प्राप्त झालेत.
अमेरिकेतील चाळीस विद्यापीठांमध्ये जैन धर्मा वरील अभ्यासक्रम अहिंसा सात्विक आहाराबाबत कोर्स उपलब्ध आहेत . तर सहिष्णू समाजाची निर्मिती शक्य आहे 450 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.

See also MPSC CHALU GHADAMODI DAILY || रोज चालू घडामोडी || २३ march २०२२

मराठी चालू घडामोडी २२-०२-२०२२ – current affairs in Marathi 22 Feb 2022 Prshn Uttre

भारतीय न्यूट्रिनो वेधशाळा कोणत्या राज्यात आहे, ज्याची अलीकडेच चर्चा झाली?


उत्तर – तामिळनाडू

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो? ,


उत्तर – दरवर्षी २१ फेब्रुवारीला

कोणत्या राज्याने अलीकडेच 20 फेब्रुवारी 2022 रोजी आपला 36 वा स्थापना दिवस साजरा केला? ,


उत्तर-अरुणाचल प्रदेश

बिल गेट्स यांना नुकताच कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?


उत्तर – हिलाल-ए-पाकिस्तान

नुकताच भारतीय रेल्वेचा सर्वात लांब बोगदा जोडला गेला आहे, त्याचे नाव काय आहे?


उत्तर – T-49 बोगदा

करिअर समुपदेशन कार्यशाळा ‘प्रचार 2022’ नुकतीच कोठे सुरू झाली आहे?


उत्तर – बिकानेर

अलीकडेच कोणत्या राज्यात विक्रम साराभाई चिल्ड्रन इनोव्हेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे?


उत्तर – गुजरात

कोणत्या राज्याने अलीकडे 21 फेब्रुवारी 2022 रोजी आपला 36 वा स्थापना दिवस साजरा केला?


उत्तर – मिझोराम

कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच कौशल्य सुधारण्यासाठी “अहरन” प्रकल्प सुरू केला आहे?


उत्तर आसामLeave a Comment