केंद्राकडून दीड वर्षांत १० लाख नोकऱ्या, युद्धपातळीवर प्रक्रिया राबविण्याचे निर्देश – पंतप्रधान मोदी / “10 Lakh Jobs In 18 Months”: PM’s Order For Hiring On “Mission Mode

केंद्राकडून दीड वर्षांत १० लाख नोकऱ्या, युद्धपातळीवर प्रक्रिया राबविण्याचे निर्देश – पंतप्रधान मोदी –

“10 Lakh Jobs In 18 Months”: PM’s Order For Hiring On “Mission Mode

jobs

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध केंद्र सरकारी विभाग आणि मंत्रालयांना आगामी दीड वर्षांत दहा लाख नोकरभरती करण्याची सूचना दिली आहे. मोहिमेप्रमाणे ही भरतीप्रक्रिया करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पंतप्रधान कार्यालयातर्फे मंगळवारी ही माहिती देण्यात आली. पंतप्रधान कार्यालयाने सर्व सरकारी विभाग व मंत्रालयातील मनुष्यबळाचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधानांनी या सूचना दिल्या.

देशातील वाढत्या बेरोजगारीसंदर्भात विरोधी पक्षांकडून सातत्याने सरकार टीकेचे लक्ष्य होत आहे. या पार्श्वभूमीवर मोदींनी हा निर्णय घेतला आहे. सरकारच्या अनेक विभागांत रिक्त असलेल्या पदांचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. आगामी दीड वर्षांत म्हणजे १८ महिन्यांत केंद्र सरकारने दहा लाख नोकऱ्या उपलब्ध करून दिल्यास, २०२४ मधील आगामी निवडणुकीत बेरोजगारीच्या मुद्यावर भाजपकडे प्रचारासाठी चोख प्रत्युत्तर तयार असेल.

यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ‘ट्वीट’मध्ये नमूद केले आहे, की पंतप्रधान मोदींनी सर्व सरकारी विभाग व मंत्रालयांमधील मनुष्यबळाचा साकल्याने आढावा घेतला. त्यानंतर आगामी दीड वर्षांत दहा लाख नोकरभरती करण्याची सूचना दिली. हे काम एका मोहिमेप्रमाणे राबवण्यासही सांगण्यात आले आहे.

केंद्रशासित प्रदेश, परदेशांतील दूतावासासह केंद्र सरकारच्या नियमित नागरी कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यांवर (बोनस, मानधन, हक्काच्या रजांचे पैसे किंवा प्रवास भत्ता सोडून) २०१९-२० मध्ये २,२५,७४४.७ कोटी रुपये खर्च झाले. मार्च २०१८-१९ मध्ये हाच खर्च २.०८,९६०.१७ कोटी होता. या अहवालानुसार केंद्रीय सुरक्षा दलात एकूण मंजूर पदांपैकी मार्च २०२० मध्ये ९.०५ लाख कर्मचारी होते.

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत विरोधी पक्षांनी वाढत्या बेरोजगारांच्या मुद्दय़ावर सरकारवर टीकेचे प्रहार केले होते. त्यावेळी भाजपने लोककल्याणकारी योजनांद्वारे विकासासह हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून विरोधकांना प्रत्युत्तर दिले होते व त्यात त्यांना यश आले. बेरोजगाराच्या विरोधकांच्या मुद्दय़ांना फेटाळताना भाजप नेहमी असा युक्तिवाद करतो, की सरकारच्या वेगवेगळय़ा योजनांद्वारे व धोरणांद्वारे देशांत उद्योग वाढले आहेत. त्यामुळे रोजगारही लक्षणीयरीत्या वाढला आहे.

See also इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2022 -Engineering Service (Pre) Examination 2022

Leave a Comment