केवल प्रयोगी अव्यय – मराठी व्याकरण

जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावन व्यक्त करतात त्यांना केवल प्रयोगी म्हणतात.

केवल प्रयोगी अव्यय म्हणजे प्रशंसा , आश्चर्य , तिरस्कार , दुःख किंवा आनंद यांसारख्या मनातील भावना व्यक्त करणारा विकारी शब्द .

उदा.
i) अरेरे ! काय ही अवस्था !
ii) बाप रे ! केवढा हा साप !
iii) शी ! किती घाण वास हा !
iv) शाब्बास ! तू करून दाखविलेस !

केवल प्रयोगी अव्ययाचे प्रकार खालील प्रमाणे:

१) हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय :- वावा , अहाहा ,ओहो , वा , आहा

२) शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय :- हाय , अरेरे , हायहाय , देवारे

३) आश्चर्यकारक केवलप्रयोगी अव्यय :- बापरे , अरेच्चा , अबब

४) प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय :- वाहवा , शाब्बास , छान , भारी

५) संमतिदर्शक केवलप्रयोगी अव्यय :- हां , अच्छा , ठीक , बराय

See also मराठी व्याकरण प्रश्न उत्तरे TOP Marathi Vyakran Prashn Uttre // Talathi Police MIDC ZP Exam Oriented MCQ

Leave a Comment