चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर 2022 माहिती ग्रहणाची वेळ सूतक काळ ग्रहण मोक्ष – Chandragrahan Mahiti

नमस्कार मित्रांनो वर्षाचं शेवटचं अंतिम चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर रोजी असून कार्तिक पौर्णिमा या दिवशी हे चंद्रग्रहण पूर्ण चंद्रग्रहण होत आहे चंद्रग्रहण सुतक काळ काय असणार आहे काय नियम आहे काय न करावे काय करावे आणि ग्रहण मोक्ष कधी होणार संपूर्ण माहिती या लेखात बघणार आहोत

चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर 2022 माहिती ग्रहणाची वेळ सूतक काळ ग्रहण मोक्ष - Chandragrahan Mahiti

चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर 2022 माहिती ग्रहणाची वेळ सूतक काळ ग्रहण मोक्ष – Chandragrahan Mahiti

2022 या वर्षातील हे दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण मंगळवार दिनांक आठ नोव्हेंबर रोजी होत असून हे खग्रास चंद्रग्रहण असणार आहे आणि आपल्या भारत देशात विविध राज्यांमध्ये हे ग्रहण दिसणार आहे

खग्रास चंद्रग्रहण जेव्हा होतं तेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्रमा हे एका सरळ रेषेमध्ये असतात आपण जेव्हा अशा वेळेस चंद्राला बघू तर तो आपल्याला ग्रहण स्वरूपात म्हणजेच काळा दिसेल

चंद्रग्रहणामध्ये नऊ तास अगोदर सुतक लागतात ते सूर्यग्रहणामध्ये 12 तास अगोदर सुतकाल लागत असतो

चंद्रग्रहण वेळ 8 नोव्हेंबर 2022

भारतामध्ये चंद्रग्रहण सायंकाळी 06:18 पर्यंत राहणार आहे तर सकाळी वेध सुरुवात किंवा सुतक कालची सुरुवात 09 वाजून 21 मिनिटांनी होणार.

चंद्र ग्रहण केव्हा असते किंवा होते

जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते तेव्हा पृथ्वीची सावली ही चंद्रावर पडते आणि त्यामुळे चंद्राला ग्रहण लागते त्याला चंद्रग्रहण असे म्हणतात चंद्रग्रहण हे पूर्णतः एक खगोलीय घटना असते जवळपास साधारणपणे पौर्णिमेला चंद्रग्रहण होत असते

वेध लागणे म्हणजे काय

चंद्र परिभ्रमण प्रथम उपछायेत येतो त्यावेळी चंद्रप्रकाश कमी होतो यालाच ग्रहणाचे वेध लागले असे म्हणतात

त्यानंतर चंद्र जेव्हा दाट छायेत मध्ये येतो आणि आपल्याला झाकलेला दिसतो तेव्हा आपण म्हणतो की ग्रहण लागले

कालांतराने चंद्र हा छायेतून बाहेर पडतो आणि पुन्हा प्रकाशित होतो त्याला आपण म्हणतो ग्रहण सुटले त्यानंतर काही काळ चंद्र उपछायेत असतो त्यामुळे त्याचा प्रकाश कमी असतो

See also marathi name of tuna fish | मराठी नेम ऑफ टुना फिश | Tuna fish in Marathi information

खग्रास चंद्रग्रहण –

जेव्हा चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत येतो त्यावेळी खग्रास चंद्रग्रहण होते. खग्रास चंद्रग्रहणात पृथ्वीच्या दाट सावलीमध्ये चंद्र वर पडल्यामुळे सूर्यप्रकाश चंद्रावर येत नाही त्यामुळे चंद्र पूर्णपणे काळा दिसतो पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणामधून प्रकाश किरण अपवर्तित होऊन चंद्रावर पडतात त्यातही लाल रंगाच्या प्रकाश किरणाचे सर्वात जास्त अपवर्तन होत असल्याने चंद्र हा तांबूस दिसतो

खंडग्रास चंद्रग्रहण

जेव्हा चंद्राचा काही भाग पृथ्वीच्या सावलीत येतो त्यावेळेस खंडग्रास चंद्रग्रहण होते पृथ्वीमुळे पूर्ण चंद्र झाकला जात नाही फक्त काही भाग झाकला जातो म्हणून यास खंडग्रास असे म्हणतात

महाराष्ट्रात ग्रहण कोठे दिसणार

आठ नोव्हेंबरला खंडग्रास चंद्रग्रहण होत आहे आणि देशाच्या पूर्वेकडील भागात 98% पर्यंत हे चंद्रग्रहण दिसणार आहे पश्चिम भारतात एक तास पंधरा मिनिटे पर्यंत खंडग्रास चंद्रग्रहण दिसेल महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात साडेपाच वाजता तर मुंबई येथे सहा वाजून एक वाजता चंद्रोदयामध्येच ग्रहण सुरू होणार आहे विदर्भातून गडचिरोली जिल्ह्यात साडेपाच वाजता ग्रहणाची सुरुवात होणार आहे तर चंद्रपूर येथे पाच वाजून 33 वाजता ग्रहण दिसणार आहे तर बुलढाणा मध्ये पाच वाजून 45 वाजता ग्रहणाला सुरुवात होईल

पुढील वर्षी 2023 मध्ये होणारी ग्रहणे

2023 मध्ये एकूण आपल्याला चार ग्रहणे बघायला मिळणार आहे यामध्ये 20 एप्रिल 2023 रोजी खग्रास सूर्यग्रहण होईल तर पाच व सहा मे रोजी छायाकल्प चंद्रग्रहण होईल 14 ऑक्टोबर 2023 रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण असणार व शेवटचा 28 व 29 ऑक्टोबर रोजी खंडग्रास चंद्रग्रहण असणार

ग्रहणाबाबत वैज्ञानिक दृस्टीकोण

ग्रहणे केवळ ऊन आणि सावल्यांचा खेळ असून त्याबद्दल अंधश्रद्धा माननीय अगदी चुकीची आहे असं वैज्ञानिकांचे मत आहे

ग्रहण काळात काय करू नये

कोणत्याही शुभ कामाची सुरुवात ही ग्रहण काळामध्ये करू नये तसेच ग्रहण काळात देवपूजा केली जात नाही

ग्रहण पाहताना कोणती काळजी घ्यावी

ग्रहण कधीही उघड्या डोळ्यांनी पाहू नये त्यामुळे तुम्हाला डोळ्यांचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात

See also भारत चे मुख्य निवडणूक आयुक्त

ग्रहण पाहण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे गॉगल्स उपलब्ध असतात ते विकत घेऊन तुम्ही ग्रहण पाहू शकता किंवा तुमच्या घरी एक्स-रे असेल त्यातून सुद्धा तुम्ही ग्रहण बघू शकता

सारांश

अशा पद्धतीने मित्रांनो आम्ही आपणास चंद्रग्रहणाची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला ही माहिती आवडली असेल उपयोगी ठरली असेल तर नक्की तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि असेच धार्मिक अपडेट साठी आमच्या पोर्टलला भेट देत रहा धन्यवाद

Leave a Comment