चालू घडामोडी Current Affairs Daily Chalu Ghadamodi 19 March 2022

चालू घडामोडी Current Affairs Daily Chalu Ghadamodi 19 March 2022

चालू घडामोडी Current Affairs Daily Chalu Ghadamodi 19 March 2022

राजस्थान छत्तीसगड प्रमाणे राज्यात लवकरच जुनी पेन्शन योजना ज्येष्ठ नेते शरद पवार यांची शिक्षक अधिवेशनात घोषणा. जुनी पेन्शन हा विषय मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री तसेच ग्रामविकास मंत्री यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल या बैठकीला मी स्वतः उपस्थित राहणार आहे राजस्थान छत्तीसगड प्रमाणे राज्यातही ही योजना लागू करण्याबाबत गंभीरपणे चिंतन करून हा प्रश्न निकाली काढण्यात येईल असे आश्वासन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिले. राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पनवेल येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी शरद पवार उपस्थित होते.

शुल्क माफी कागदावर पालकांची फरफट. राज्य शासनाच्या निर्णयाला न्यायालयाची स्थगिती शिक्षण विभागाच्या अनास्थेचा फटका.

परदेशांत कोरोना वाढताच आरोग्य विभागाचा धोक्याचा इशारा. दक्षिण कोरियात एका दिवसात 6. 21 लाख रुग्ण.

राज्यात सव्वालाख वारसदारांच्या कोरोना अनुदानासाठी हेलपाटे फक्त तेरा हजार जणांना लाभ राज्य शासनाकडे निधीच नसल्याने वितरण ठप्प. राज्यात 171 नवीन कोरोना बाधित.
एमपीएससी ची रखड गाडी अभियंत्यास च्या आठ्या कपाळी. अभियंता संवर्गातील 1,145 पदे भरण्यासाठी झाली परीक्षा.

देशाचा अर्थ गाडा सुरळीत कर संकलनात 48 टक्क्यांनी वाढ.

युक्रेन च्या लवीव्ह शहरावर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला लढाऊ विमान दुरुस्ती केंद्राला केले लक्ष निवास इमारतीचे मोठे नुकसान. भारताकडून तीव्र चिंता व्यक्त.

क्षेपणास्त्र चाचणी अपयशी झाल्याने पाकिस्तान ची फजिती. भारताला इशारा देण्याच्या नादात घाई. पाकिस्तानची सारवासारव अपयशी झाली.

कॅन्सर होण्याचा धोका शाकाहार घेतल्यामुळे 14 टक्क्यांनी कमी होतो लंडन मधील संशोधन रक्तदाब व कोलेस्ट्रॉल ची पातळी राहते सामान्य.

आनंदी देशात भारत 136 व्या स्थानी संयुक्त राष्ट्रांची यादी फिनलंड ठरला जगातील सर्वात आनंदी देश.

सयुक्त राष्ट्रांकडून दरवर्षी जगातील सर्वात आनंदी देशांची यादी (World Happiness Report) जाहीर केली जाते. वैयक्तिक पातळीवर असणारं समाधान, चांगलं राहणीमान, जीडीपी, आयुर्मान अशा निरनिराळ्या घटकांच्या आधारे ही यादी तयार केली जाते. जगभरातल्या एकूण १५० देशांचं या घटकांच्या आधारे मूल्यमापन करण्यात येतं. यंदाच्या वर्षी अर्थात २०२२ ची यादी तयार करताना एकूण १४६ देशांचं मूल्यमापन करण्यात आलं आहे. या यादीमध्ये सध्या युद्ध सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेनचा देखील समावेश असून ते अनुक्रमे ८० आणि ९८व्या स्थानावर आहेत.

See also Marathi Daily Chalu Ghadamodi 30 April 2022

सलग पाचव्या वर्षी फिनलँड अव्वल – या यादीमध्ये सलग पाचव्या वर्षी फिनलँडला जगातला सर्वात आनंदी देश होण्याचा मान मिळाला आहे. फिनलँडच्या पाठोपाठ डेन्मार्क, आईसलँड, स्वित्झर्लंड, नेदरलँड, लग्झेंबर्ग, स्विडन, नॉर्वे, इस्त्रायल आणि न्यूझीलंड या ९ देशांचा क्रम लागतो. पहिल्या १० मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त एक बदल झाला असून ऑस्ट्रिया या यादीतून बाहेर गेला आहे. इतर देशांचा फक्त क्रम बदलला असून ते पहिल्या दहामध्ये कायम आहेत.

अफगाणिस्तान सर्वात शेवटच्या स्थानी – दरम्यान, या यादीमध्ये अफगाणिस्तान सर्वात शेवटच्या म्हणजेच १४६व्या स्थानी आहे. अफगाणिस्तानपाठोपाठ लेबेनॉन आणि झिम्बाब्वे हे देश सर्वात कमी आनंदी ठरले आहेत.

यादीमध्ये भारत कुठे – जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीमध्ये भारताचं स्थान मात्र बरचसं मागे आहे. १४६ देशांच्या यादीमध्ये भारत थेट १३६व्या क्रमांकावर म्हणजे शेवटून ११व्या क्रमांकावर आहे.

CURRENT AFFAIRS PRASHN UTTRE 2022

बाजार भांडवलाच्या बाबतीत कोणत्या देशाने अलीकडे जगातील पहिल्या पाच क्लबमध्ये प्रवेश केला आहे?
उत्तर भारत

अलीकडे कोणत्या बँकेने ग्रीन डिपॉझिट प्रोग्राम सुरू केला आहे?
उत्तर – डीबीएस बँक इंडिया

कोणते शहर 2050 पर्यंत निव्वळ-शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य निर्धारित करणारे पहिले दक्षिण आशियाई शहर बनले आहे?
उत्तर – मुंबई

अलीकडेच कोणता दिवस संयुक्त राष्ट्र संघाने इस्लामोफोबियाशी लढा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केला आहे?
उत्तर – १५ मार्च

कोणत्या संस्थेने अलीकडेच ‘सूक्ष्म वित्त कर्जासाठी नियामक फ्रेमवर्क’चे निर्देश जारी केले आहेत? ,
उत्तर: RBI

अलीकडेच “राहुल बजाज: अॅन एक्स्ट्राऑर्डिनरी लाईफ” हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
उत्तर – गीता पिरामल

नुकताच “राष्ट्रीय लसीकरण दिवस” ​​कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – १६ मार्च

Leave a Comment