टॉम अँड जेरीचे दिग्दर्शक जीन डाइच यांचे निधन

टॉम अँड जेरीचे दिग्दर्शक जीन डाइच यांचे निधन

tom%2Bjerry

•ऑस्कर पुरस्कार विजेते रेखाचित्रकार आणि टॉम अ‍ॅन्ड जेरीचे दिग्दर्शक जीन डाइच (वय ९५) यांचे नुकतेच निधन झाले.

•१६ एप्रिल रोजी चेक प्रजासत्ताकमधील प्राग शहरात त्यांची प्राणज्योत मालवली.

•चेक प्रजासत्ताकमधील जीन यांचे प्रकाशक पीटर हिमेल यांनी डाइच यांच्या मृत्यूच्या वृत्तास दुजोरा दिला.

•त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९२४ रोजी शिकागोत झाला, त्यांचे पूर्ण नाव युजीन मेरिल डाइच असे होते.

•त्यांनी काही लोकप्रिय अ‍ॅनिमेशन पटांचे दिग्दर्शन केले. त्यात, पॉपिये द सेलर मॅन, मुन्रो, टॉम टेरिफिक अँड नुडनिक यांचा समावेश होता.

•त्यांनी टॉम अँड जेरीच्या १३ भागांचे दिग्दर्शन केले. ‘पॉपिये द सेलर’ मालिकेतील अनेक भाग त्यांनी दिग्दर्शित केले होते.

See also महानगरपालिका भरती प्रश्न पत्रिका भाग 03 – Mahanagar Palika Bharti Question Paper

Leave a Comment