देशातील कोरोना रुग्णांची संख्या 13 हजार 387

देशातील कोरोना रुग्णांची संख्या 13 हजार 387

pib

देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या 1007 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 13 हजार 387 पोहचली आहे. एकूण मृतांचा आकडा 437 वर पोहचला असून, गेल्या 24 तासात 23 जण दगावले आहेत. तर आत्तापर्यंत 1749 रुग्ण बरे झाले असते. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव आणि प्रवक्ते लव अग्रवाल यांनी आज दिली.

पुढे ते म्हणाले, पहिल्यांदा कोरोना रुग्णांची संख्या दर तीन दिवसांनी डबल होत होती. आता हा वेग कमी झाला असून साधारण सात दिवसांनी वाढत आहे. तर देशातील 13.6 टक्के रुग्ण आत्ता पर्यंत बरे झाले आहेत. तसेच कोरोना रुग्णांच्या संख्येत 40 टक्के घट झाली असून 80 टक्के नागरिक बरे होत आहेत,असं ही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यांना नवीन 5 लाख रैपिड टेस्ट चे किट देण्यात आले आहेत. या नवीन टेस्ट किट द्वारे अवघ्या तीस मिनिटात रिपोर्ट मिळत आहेत. काल एका दिवसात 28 हजार पेक्षा अधिक कोरोनाग्रस्तांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. अशी माहिती आयसीएमआर च्या प्रवक्त्यांनी दिली.

लॉक डाऊन मध्ये शेतीच्या कामांना परवानगी देण्यात आली आहे. भारतीय डाक विभागाकडून मोठी मदत मिळत आहे. तसेच कोरोना रुग्णांसाठी ची रुग्णालये, सुविधा, चाचण्या अशा सर्व आघाड्यांवर क्षमता वाढवण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

See also (PDF) Navneet Gujarati Grammar Book PDF Free Download

Leave a Comment