श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना

क्षेत्र: सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग

श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी

 • महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक श्रावणबाळ योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

श्रावणबाळ योजनेअंतर्गत मिळणारे फायदे

 • श्रावण बाळ योजनेनंतर्गत लाभार्थ्यास राज्य शासनाद्वारे दरमहा 1500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते जेणेकरून वृद्ध व्यक्ती आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकतील.
 • या योजनेमुळे महाराष्ट्रातील वृद्ध नागरिक आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील
 • या योजनेमुळे महाराष्ट्रातील वृद्ध नागरिकांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागणार नाही.
 • या योजनेमुळे जेष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक समस्येवर मात करतील.
 • वृद्ध नागरिकांचे जीवनमान सुधारेल.
 • वृद्ध नागरिक सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
 • वृद्ध नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजेसाठी आवश्यक कागदपत्रे

 • लाभार्थी व्यक्तीचा वयाचा दाखला (जन्माचा दाखला/शाळा सोडल्याचा दाखला/आधार कार्ड)
 • महाराष्ट्र राज्याचा 15 वर्ष वास्तव्याचा दाखला (डोमेसाइल प्रमाणपत्र/ग्रामपंचायत/नगरसेवक दाखला)
 • उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 21,000/- पेक्षा जास्त नसावे)
 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • पिवळे (BPL) रेशन कार्ड
 • घरपट्टी पावती
 • विजेचे बिल
 • दारिद्र रेषेखालील कुटुंबाचे प्रमाणपत्र
 • मतदान कार्ड
 • मोबाईल नंबर

श्रावण बाळ योजनेच्या अटी

 • श्रावण बाळ योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच घेता येईल.
 • श्रावण बाळ योजनेअंतर्गत अर्जदार व्यक्ती 15 वर्षांपासून महाराष्ट्र राज्यात वास्तव्य करत असणे आवश्यक आहे.
 • अर्जदाराचे वय 65 वर्ष व 65 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे
 • लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे नाव ग्रामीण/शहरी भागाच्या दारिद्र रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे
 • लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 21,000/- पेक्षा जास्त नसावे.
 • बीपीएल (BPL) श्रेणीत नसलेल्या जेष्ठ नागरिकांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येतो.
 • या योजनेचा लाभ हा फक्त महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिकांनाच घेता येणार आहे.
 • महाराष्ट्र राज्याचं बाहेरील व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • अर्जदार व्यक्ती केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर कोणत्या सरकारी योजनेअंतर्गत पेंशन योजनेचा लाभ घेत असल्यास अशा अर्जदाराचा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबातील कोण सदस्य जर सरकारी कर्मचारी असेल तर अशा अर्जदारास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
See also अग्निपथ योजना २०२२ , कोण बनू शकतो अग्निवीर, जाणून घ्या योजनेशी संबंधित सर्व माहिती -agneepath-scheme-launched-know-all-the-details-related-to-scheme

श्रावणबाळ योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

या योजनेच्या अधिक माहितीसाठी गावातील ग्रामपंचायत कार्यालय/तलाठी किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधावा व सादर योजनेअंतर्गत अर्ज घ्यावा व अर्जात विचारलेली माहिती भरून योग्य ती कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपी सोबत जोडून अर्ज सादर करावा व अर्ज भरल्याची पोच पावती संबंधित अधिकाऱ्यांकडून घ्यावी.

अधिकृत वेबसाइटhttps://aaplesarkar.mahaonline.gov.in/

Leave a Comment