चालू घडामोडी 17 मार्च 2021 -करेंट अफ्फैर्स 17 मार्च मराठी

चालू घडामोडी 17 मार्च 2021

चालू घडामोडी 2021:मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षा करिता चालुघडामोडी येथे आम्ही उपलब्ध करून देत आहोत .

दररोज मराठी मध्ये दर्जेदार चालू घडामोडी 2021 करिता तुम्ही www.marathijobs.in या संकेत स्थळाला भेट देत रहा.

चालू घडामोडी 17 मार्च 2021

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली

सरकारचा मोठा निर्णय
श्री हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त
श्री रजनीश शेठ यांच्या कडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार
श्री संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी श्
री परमवीर सिंह यांच्या कडे गृह रक्षक दलाची जवाबदारी

जगातील ३० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी २२ भारतात

जगातील ३० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी २२ शहरे भारतातील आहेत, दिल्ली हे जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानीचे शहर आहे, असे आयक्यूएअर या स्विस संघटनेने मंगळवारी जाहीर केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे.

तथापि, दिल्लीतील हवेच्या दर्जात २०१९ ते २०२० या कालावधीत १५ टक्क्यांनी सुधारणा झाली आहे, असेही अहवालामध्ये म्हटले आहे.

हवेच्या दर्जात सुधारणा झाली असली तरी दिल्ली हे १० व्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रदूषित शहर आहे आणि जगातील सर्वात प्रदूषित राजधानीचे शहर आहे, असे अहवालामध्ये म्हटले आहे.

जगातील ३० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी २२ शहरे भारतातील असल्याने प्रदूषित शहरांच्या श्रेणीत भारताचे स्थान अद्याप कायम आहे.

दिल्लीसह गझियाबाद, बुलंदशहर, बिसराख जलालपूर, नोइडा, ग्रेटर नोइडा, कानपूर, लखनऊ, मेरठ, आग्रा आणि मुझफ्फरनगर त्याचप्रमाणे राजस्थानातील भिवारी, फरिदाबादर्, ंजद, हिसार, फतेहाबाद, बंधवारी, गुरुग्राम, यमुनानगर, रोहतक आणि धरुहेरा आणि बिहारमधील मुझफ्फरपूर ही अन्य २१ शहरे प्रदूषित आहेत.

सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत चीनमधील झिनजिआंगचा समावेश आहे त्यापाठोपाठ भारतातील नऊ शहरांचा समावेश आहे.

गझियाबाद हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रदूषित शहर आहे.

भारतामध्ये हवेचे प्रदूषण प्रामुख्याने वाहतूक, स्वयंपाकासाठी जाळण्यात येणारा बायोमास, वीजनिर्मिती, उद्योग, बांधकाम आणि कचरा जाळणे यामुळे होत आहे.

See also पोलिस भरती 2020 अपडेट

सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांचे खासगीकरण केले जाणार नाही

सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांचे खासगीकरण केले जाणार नाही. तसेच खासगीकरण होत असलेल्या बँकांमधील कर्मचारी व ठेवीदारांचे हित जपले जाईल, अशी ग्वाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी दिली.

‘आयडीबीआय’सह अन्य दोन सरकारी बँकांच्या खासगीकरणाची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली असून, सरकारी हिस्सेदारी कमी करण्यासाठी १.७५ लाख कोटी रुपयांची निर्गुंतवणूक केली जाणार आहे. बँकांच्या खासगीकरणाविरोधात देशातील बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस आंदोलन केले.

या पाश्र्वभूमीवर सीतारामन यांनी महत्त्वाचे विधान केले. देशाच्या र्आिथक विकासाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मोठ्या बँकांची गरज असून खासगीकरणाचे धोरण विचारपूर्वक राबवले जात असल्याचेही सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

लवकरच ‘विकास वित्तसंस्था’

देशातील मोठ्या गुंतवणुकीच्या दीर्घकालीन पायाभूत प्रकल्पांना अर्थसाह्या करण्यासाठी ‘राष्ट्रीय बँक’ स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासाठी ‘विकास वित्तसंस्था’ निर्माण केली जाणार असून, या विधेयकाला मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.


नंदा खरे यांच्या ‘उद्या’ कादंबरीला साहित्य अकादमी
आबा महाजन यांच्या ‘आबाची गोष्ट’ला बाल साहित्य पुरस्कार

ज्येष्ठ कथा-कादंबरीकार आणि व्यासंगी नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला २०२० या वर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार तर, बाल साहित्याचे विपुल लेखन करणारे साहित्यिक आबा गोविंदा महाजन यांच्या ‘आबाची गोष्ट’ या लघुकथेला बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला. साहित्य अकादमीने शुक्रवारी या पुरस्कारांची घोषणा केली. मराठीसह सहा भाषांसाठीचा युवा साहित्य पुरस्कार यथावकाश जाहीर केला जाईल, असे अकादमीच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

फक्त नफ्यातोट्याच्या हिशेबात निव्वळ बाजारपेठीय जगण्याशी नाळ जोडून घेणाऱ्या मानवी आयुष्यात संवेदनशीलता, करुणा या मूल्यांचे महत्त्व तरी किती उरणार, याचा आगामी काळाचा अस्वस्थ करणारा वेध ‘उद्या’ या कादंबरीत मांडण्यात आला आहे. ‘आबाची गोष्ट’ या लघुकथेतून लेखकाने ग्रामीण जीवनातील मुलांचे भावविश्व अलगदपणे उलगडत नेले आहे. साहित्य अकादमी पुरस्कारांच्या निवड समितीमध्ये मराठीसाठी वसंत आबाजी डहाके, सतीश काळसेकर आणि निशिकांत मिरजकर हे तिघे सदस्य होते तर, बाल साहित्य पुरस्कारासाठी चंद्रकांत पाटील, कौतिकराव ठाले-पाटील, कृष्णात खोत हे तिघे परीक्षक होते.

चालू घडामोडी pdf 2021 करिता तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा :-

https://t.me/estudycircles

चालू – घडामोडी 18 मार्च 2021

Leave a Comment