चालू घडामोडी 18 मार्च 2021 -करेंट अफ्फैर्स 18 मार्च मराठी

चालू घडामोडी 18 मार्च 2021 -करेंट अफ्फैर्स 18 मार्च मराठी

चालू घडामोडी 2021:मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षा करिता चालुघडामोडी येथे आम्ही उपलब्ध करून देत आहोत .

दररोज मराठी मध्ये दर्जेदार चालू घडामोडी 2021 करिता तुम्ही www.marathijobs.in या संकेत स्थळाला भेट देत रहा.

चालू घडामोडी 18 मार्च 2021 -करेंट अफ्फैर्स 18 मार्च मराठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यांना सूचना

देशाच्या काही भागांमध्ये कोविड-१९च्या संसर्गाची प्रकरणे वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करून, करोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘जलद व निर्णायक पावले’ उचलण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले.

‘चाचणी करा, शोध घ्या व उपचार करा’ या त्रिसूत्रीचे गंभीरपणे पालन करण्याच्या आवश्यकतेवरही पंतप्रधानांनी भर दिला.

चालू घडामोडी 18 मार्च 2021 -करेंट अफ्फैर्स 18 मार्च मराठी

करोना महासाथीची परिस्थिती आणि सध्या सुरू असलेली लसीकरणाची मोहीम याबाबत राज्यांच्या मुख्यमंर्त्यांशी मोदी यांनी आभासी चर्चा केली. करोनाच्या विरोधात लस हे परिणामकारक शस्त्र असल्याचे सांगून, सरकारी व खासगी अशा दोन्ही प्रकारची लसीकरण केंद्रे स्थापन करण्याचे आवाहन त्यांनी राज्यांना केले.

महाराष्ट्र व पंजाब यांसारख्या राज्यांमध्ये करोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असून, महाराष्ट्र व मध्य प्रदेशमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण वाढले आहे, असे जानेवारीत देशात लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून मुख्यमंर्त्यांशी प्रथमच साधलेल्या संवादात मोदी म्हणाले.

देशातील ७ राज्यांतील ‘पॉझिटिव्हिटी रेट’मध्ये गेल्या काही आठवड्यांत दीडशे टक्क््याहून अधिक वाढ झाली असल्याबाबत पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली.

‘ही वाढ आपण इथेच थांबवली नाही, तर करोनाच्या देशव्यापी उद्रेकाची परिस्थिती निर्माण होईल’, असे सांगून ती थांबवण्यासाठी जलद व निर्णायक पावले उचलण्याचे आवाहन त्यांनी केले.

फेडरेशन चषक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा

पतियाळा येथे सुरू असलेल्या फेडरेशन चषक वरिष्ठ राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत बुधवारी महाराष्ट्राच्या अविनाश साबळे आणि सर्वेश कुशारे यांनी सुवर्णपदकांची कमाई केली,

तर कोमल जगदाळेने रौप्यपदक पटकावले.

अविनाशने ३००० मीटर स्टीपलचेस मध्ये राष्ट्रीय विक्रमही नोंदवला.

See also 51 to 100 number names in marathi

२६ वर्षीय अविनाशने ८ मिनिटे २०.२० सेकंद अशी वेळ नोंदवताना २०१९मधील स्वत:चाच ८ मि. २१.३७ से. वेळेचा विक्रम मोडीत काढला.

राजस्थानच्या शंकर लाल स्वामीने रौप्य व हरयाणाच्या राजकुमारने कांस्यपदक मिळवले.

महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये कोमलने १० मिनिटे ०५.४३ सेकंदांची वेळ नोंदवताना दुसरा क्रमांक मिळवला, पहिला क्रमांक उत्तर प्रदेशच्या परूल चौधरीने मिळवला.

उंच उडी स्पर्धेत सर्वेशने (२.१५ मीटर) सुवर्णपदक मिळवले,

तमिळनाडूच्या आदर्श रामला (२.१० मीटर) रौप्यदक मिळाले.

भालाफेक स्पर्धेत हरयाणाच्या नीरज चोप्राने (८७.८० मी.) सुवर्णपदकाची कमाई करताना नवा स्पर्धाविक्रम केला.

चालू घडामोडी pdf 2021 करिता तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा :-

https://t.me/estudycircles

चालू – घडामोडी 17 मार्च 2021

Buy Best Book from amazon – Click Here


Leave a Comment