07/03/2022 चालू दैनंदिन घडामोडी – DAILY CHALU GHADAMODI CURRENT AFFAIRS MARATHI 07 MARCH 2022

07/03/2022 चालू दैनंदिन घडामोडी – DAILY CHALU GHADAMODI CURRENT AFFAIRS MARATHI 07 MARCH 2022

07/03/2022 चालू दैनंदिन घडामोडी - DAILY CHALU GHADAMODI CURRENT AFFAIRS MARATHI 07 MARCH 2022

ओबीसी आरक्षणाचं विधेयक विधानसभेत मंजूर

ओबीसी आरक्षणाचं विधेयक आज विधानसभेत मंजूर झालं आहे. सभागृहात एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाकडे केवळ निवडणुका घेण्याचे अधिकार असणार आहेत, निवडणूक वगळता इतर अधिकार राज्यसरकारकडे आले आहे. त्यामुळे आता सरकार प्रभाग रचनेचा अहवाल निवडणूक आयोगाकडे देत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाला निवडणूक जाहीर करता येणार नाही.

हे विधेयक मंजूर झाल्याने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा जो प्रश्न प्रलंबित आहे, त्या प्रकरणता सर्वोच्च न्यायालयने ट्रिपल टेस्ट करण्यास सांगितलेलं आहे. आता ट्रिपल टेस्ट करणयासाठी राज्य सरकारला काही कालावधी मिळणार आहे. हे विधेयक मंजूर झाल्यामुळे प्रभाग रचना, वॉर्ड रचना, मतदार याद्या बनवणे, निवडणूक कार्यक्रम इत्यादी संदर्भातील सर्व अधिकार राज्य सरकारडे येणार आहेत.

यापूर्वी प्रकल्पांचे भूमिपूजन व्हायचे, उद्घाटनाचा पत्ताच नसायचा! पंतप्रधान नरेंद्र मोदींची अप्रत्यक्ष टीका. हिरवा झेंडा दाखवत पुणे मेट्रोतून पाच मिनिटांची केली सफर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण. गेल्या काही वर्षातील भारताच्या जगभरातील वाढत्या प्रभावानेच युक्रेन मध्ये अडकलेल्या हजारो विद्यार्थ्यांना ऑपरेशन गंगा अंतर्गत माय भूमी मध्ये परत आणणे सहज शक्य झाले याउलट जगातील इतर मोठ्या राष्ट्रांना युक्रेन मध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना सोडवण्यासाठी अनेक समस्यांना सामना करावा लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी. पुणे मेट्रो चे भूमिपूजन आणि आता लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली याआधी अनेक प्रकल्पांचे केवळ भूमिपूजन व्हायचे मात्र उद्घाटन कधी होणार याचा पत्ता नसायचा. कोणत्याही योजना वेळेत पूर्ण करता येऊ शकतात हे आज अधोरेखीत झाले, अशा …

उत्तर प्रदेश मध्ये अखेरचे टप्प्यासाठी आज मतदान होणार. दोन कोटी मतदार बजावणार हक्क. उत्तर प्रदेशच्या विधानसभेसाठी अखेरच्या टप्प्यातील मतदान सोमवारी होणार आहे. शेतकरी आंदोलन बेरोजगारी लखिंपुर खेरी प्रकरण आदी मुद्दे निवडणुकीत प्रचाराच्या केंद्रस्थानी होते.
एन एस इ च्या माजी सीईओ चित्रा रामकृष्णन यांना अटक. नॅशनल स्टॉक एक्सचेंज च्या एन एस माजी सीईओ चित्रा रामकृष्णन यांना लोकेशन प्रकरणात सीबीआयने रविवारी दिल्लीतून अटक केली. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. हिमालयात राहणाऱ्या अज्ञात योगी एन एस सोबत गोपनीय माहिती शेअर केल्याच्या प्रकरणात त्यांना चौकशीला सामोरे जावे लागत आहे.

See also Daily Current Affairs In Marathi दैनिक चालू घडामोडी: 06 मे 2022

ई-कॉमर्स कंपन्यांना तोंड देण्यासाठी व्यापाऱ्यांनी करावा ऑनलाईन व्यवसाय. राष्ट्रीय व्यापारी परिषदेचा निर्धार; कॅटची दोन दिवस परिषद. ई-कॉमर्स वऑनलाइन व्यापार पंधरा टक्क्यांनी वाढला आहे त्याच्याशी स्पर्धा करण्यासाठी ऑनलाइन व्यापार सुरु करणे आवश्यक असून त्यासाठी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून नव्या कार्यप्रणालीचा वापर करावा लागणार आहे. असे राष्ट्रीय व्यापारी परिषदेत ठरविण्यात आले असे कॅट महाराष्ट्राचे कार्यकारी चेअरमन राजेंद्र पाटील यांनी सांगितले.

दुसरा युद्धविरामही अयशस्वी. रशियाचे हल्ले सुरू असल्याचा यांचा आरोप, खरकिव्ह व अन्य शहरांमध्ये नुकसान, ऑपरेशन गंगा अंतिम टप्प्यात सोळा हजार भारतीय आले परत.


एकटा रवींद्र जडेजा लंकेवर भारी. रवींद्र जडेजाने निर्णायक अष्टपैलू खेळ करत भारताला श्रीलंकेविरुद्ध पहिल्या क्रिकेट कसोटीत एक डाव आणि 222 धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. जडेजाने फलंदाजीत नाबाद 175 धावा काढल्यानंतर सामन्यात दोन्ही डावात मिळून नऊ बळी घेतले.

भावांनो, आता तरी कामावर या! अपील करा बडतर्फ कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळातील संधी. संपात सहभागी झालेल्या एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांची बडतर्फी व सेवा समाप्ती या प्रकारची कारवाई करून घरी पाठवले आहे, अशा दहा हजार कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याची तयारी महामंडळाने सुरू केल्याची माहिती आहे, मात्र या कर्मचाऱ्यांना यासाठी विभाग नियंत्रककाकडे अपील करायचे आहे. ही संधी किती कर्मचारी घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कर्मचाऱ्यांनी दहा मार्च पर्यंत कामावर येण्याचे आव्हान केले आहे, कुठल्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पाकिस्तान विरुद्ध भारतीय संघाची विजयी मालिका कायम. आयसीसी विश्वचषक महिलांची दणदणीत विजय सलामी मीताली राज ची विश्‍वविक्रमी कामगिरी.

चेन्नई कोलकत्ता सलामीला भिडणार.

आयपीएलच्या परवा चे वेळापत्रक जाहीर.

CHALU GHADAMODI MARATHI PRASHN UTTRE

HALU GHADAMODI MARATHI PRASHN UTTRE


अलीकडे कोणत्या राज्यात कालियाट्टम उत्सव सुरू झाला आहे?
उत्तर – केरळ

भारतीय सैन्य तीन दिवसीय हिवाळी महोत्सव कोठे आयोजित करत आहे?
उत्तर – जम्मू आणि काश्मीर

टाटा IPL 2022 साठी कोणत्या देशांतर्गत कार्ड पेमेंट नेटवर्कला अधिकृत भागीदार बनवण्यात आले आहे? ,
उत्तर: रुपया

प्रो कबड्डी लीग सीझन 8 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
उत्तरः दबंग दिल्ली

अलीकडेच राजस्थान उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर – एमएम श्रीवास्तव

भारत आणि कोणत्या देशामधील वाणिज्य स्तरावरील बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे?
उत्तर – बांगलादेश

डॉक्टर रतन लाल यांना 2020 चा खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला आहे?


>> जागतिक अन्न पुरस्कार


Leave a Comment