09/03/2022 च्या दैनंदिन चालू घडामोडी – Chalu Ghadamodi 09 March 2022 Marathi

09/03/2022 च्या दैनंदिन चालू घडामोडी – Chalu Ghadamodi 09 March 2022 Marathi

09/03/2022 च्या दैनंदिन चालू घडामोडी - Chalu Ghadamodi 09 March 2022 Marathi

जयंतकुमार बांठिया:-
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
ओबीसी समाजाची सांख्यिकी माहिती जमा करणे किंवा अन्य अटींची पूर्तता करण्यासाठी निवृत्त मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन करण्यात आला

आरोपांची धुळवड! भाजप नेत्यांविरोधात सरकारचे कारस्थान, ईडी म्हणजे भाजपचे एटीएम. महाविकास आघाडीतील सत्तारूढ शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप यांच्यात मंगळवारी आरोपांची धुळवड रमली, राज्य सरकारने भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची कारस्थान करीत असल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार पाडण्या साठीच्या कारस्थाना नुसार मुंबईत छापे सत्र सुरू असल्याचा आरोप खरात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सोमय्या पितापुत्र सह भाजपला लक्ष्य केले.

आकाश मोकळे 27 मार्च पासून सेवा पूर्ववत. करोना काळातील दोन वर्षाच्या निर्बंधानंतर आंतरराष्ट्रीय विमान सेवेला आकाश मोकळे झाले आहे. 27 मार्च पासून ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे हवाई वाहतूक मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केले.

युद्धाच्या नावाने व्यापार्‍यांकडून लूट. गहू तेल या बरोबरच मसाल्याचे पदार्थ ही महाग. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर देशभरात तेल आणि गव्हाची भाववाढ सुरू झाली मात्र आता रशिया युक्रेन युद्धाच्या नावाने व्यापाऱ्यांकडून लूट सुरू असल्याचे चित्र राज्यात आहे.

सर्वसमावेशक महिला धोरण लवकरच. महिलांना आपले अधिकार व हक्काची जाणीव झाली पाहिजे. कोणत्याही बाबतीत महिला कमी नाहीत फक्त त्यांना संधी देण्याची गरज आहे सामाजिक व राजकीय क्षेत्रात महिलांना संधी देण्यासाठी महाराष्ट्राने वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. हा प्रवाह असाच सुरू ठेवण्यासाठी महिला धोरणात काळानुरूप बदल होणे आवश्यक आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी जाहीर केले.

शुल्क कपातीच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण विभागाकडे इच्छाशक्तीचा अभाव, शुल्क कपातीस शाळा नका देत असल्याबाबत शिक्षण मंत्र्यांचा दुजोरा. राज्यातील शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2021-22 यामध्ये सरसकट 15 टक्के शुल्क कपात करण्यास शाळांकडून नकार दिला जात असल्याबाबत खुद्द शिक्षण मंत्र्यांनीच विधानसभेत तारांकित प्रश्‍नाला दिलेल्या उत्तरात दुजोरा दिला आहे.

See also Today Marathi Current Affairs | Chalu Ghadamodi | 05 July 2022

महाविद्यालये लवकरच बहु विद्याशाखिय स्वायत्त संस्था, यूजीसी कडून देशभरातील संस्थांना सुचना. देशातील महाविद्यालयांचे दोन हजार पस्तीस पर्यंत पदवी देण्यात येणाऱ्या बहू विद्या शाखीय स्वायत्त संस्थांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने यूजीसी ने जाहीर केले असून त्याअंतर्गत दुहेरी पदवी शासकीय आणि खाजगी महाविद्यालयांचा समूह, महाविद्यालयांचे विलिनीकरण बहुशाखीय संशोधन आदी महत्त्वपूर्ण तरतुदी काढण्यात आल्या आहेत. तसेच शैक्षणिक धोरण 2020 मध्ये बहुशाखीय शिक्षण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर या धोरणात भाग देण्यात आला आहे.

9 ते 12 एप्रिल दरम्यान शासकीय रेखाकला परीक्षा परीक्षेसाठी दहा ते पंचवीस मार्च या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन.

भारत-चीन चर्चेची फेरी शुक्रवारी, पूर्व लडाखमधील थोडया बाबत अधिकारी सकारात्मक. भारत आणि चीन यांच्या दरम्यान लष्करी अधिकाऱ्यांच्या स्तरावरील चर्चेची 15 वी फेरी 11 मार्च रोजी होणाऱ आहे. ही चर्चा भारतीय हद्दीच्या बाजूने चौशुल- मोल्डो सीमा अधिकाऱ्यांच्या बैठक स्थळावर होणार आहे अशी माहिती संरक्षण संस्थातील विभाग प्रमुखांनी दिली आहे. पूर्व लडाखमध्ये उभय देशांत ज्या जागांवरून वाद आहे त्याचे निराकरण करण्यासाठी ही चर्चा होत आहे. भारतातर्फे या चर्चेत नेतृत्व लेफ्टनंट जनरल अनिज्ञ सेनगुप्ता हे करणार आहेत.

सातारा सैनिक स्कूल चे दरवाजे मुलींसाठी 61 वर्षात पहिल्यांदाच खुले. साताऱ्यातील सैनिक स्कूल चे दरवाजे मागील 61 वर्षात पहिल्यांदाच खुले झाले आहेत. सैनिक स्कूल मध्ये 611 विद्यार्थिनी मधून पहिल्यांदाच दहा मुलींची प्रवेश प्रक्रिया पार पाडून त्या दाखल झाले आहेत. देशातील पहिल्या सैनिक स्कूल मध्ये महिला अधिकारी घडवण्याचे काम आता सुरू झाले आहे. जागतिक महिला दिनानिमित्त सैनिक स्कूल मध्ये दहा मुलींशी संवाद साधला. संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने 23 जून 1961 रोजी देशातील पहिली सैनिकी शाळा सातारा सुरू झाले असून याठिकाणी 6 वी ते 12 वी पर्यंत शिक्षण दिले जाते.

See also 7 जून 2022 Marathi Daily Current Affairs - दैनिक चालू घडामोडी 7 जून 2022

भारताची अपंग बॅडमिंटनपटू मानसी जोशी मंगळवारी महिलांच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी घेत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे.

भारतीय क्रिकेटच्या प्रगतीत श्री शरद पवार यांचे महत्त्वाचे योगदान, बीसीसीआय माजी पदाधिकारी रत्नाकर शेट्टी यांचे मत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपद भूषवताना शरद पवार यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यांच्या निर्णयाचा भारतीय क्रिकेटला आज फायदा होत आहे. असे मत बीसीसीआय चे माजी पदाधिकारी प्राध्यापक रत्नाकर शेट्टी यांनी व्यक्त केले.

यु पी आय ला सर्वसमावेशक रूप, 40 कोटी फोन धारकांना डिजिटल सेवांची प्रांगण खुले.

चालू घडामोडी - Chalu Ghadamodi Prashn uttre


चालू घडामोडी – Chalu Ghadamodi Prashn uttre

अलीकडेच चांद्रयान-2 चंद्रावर कोणत्या वायूचा शोध लागला आहे?
उत्तर – ऑर्गन 40

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त किती महिलांना “नारी शक्ती पुरस्कार” देऊन सन्मानित केले?
उत्तर – 29 महिला

अलीकडेच ग्रँडिस्कोची कॅटोलिका आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खुल्या स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले?
उत्तर – एसएल नारायणन

अलीकडेच कोणी डिजिटल पेमेंटसाठी UPI 123 Pay लाँच केले आहे?
उत्तर – RBI

पुसाचा प्रसिद्ध वार्षिक मेळा (भारतीय कृषी संशोधन संस्था) केव्हा आयोजित केला जाईल?
उत्तर – 9 ते 11 मार्च दरम्यान

आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
उत्तरः ८ मार्च


Leave a Comment