एक रुपयाच्या पिक विमा तून शेतकऱ्याला हजार रुपये मिळणार

राज्यातील शेतकऱ्यांना कमीत कमी हजार रुपये पीक विमा रक्कम मिळेल विमा कंपन्यांनी रक्कम कमी दिली तर उर्वरित रक्कम राज्य सरकार देईल अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी विधान परिषदेमध्ये दिली

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न मांडला होता मुंडे यांनी खरीप हंगाम 2022 ची आकडेवारी मांडली या हंगामात 3180 कोटी इतकी पिक विमा रक्कम मंजूर झाली त्यापैकी सुमारे 3148 कोटी वितरित केल्याचे त्यांनी सांगितले तसेच तुषार व ठिंबक सिंचन योजनेसाठी 20 गुंठ्याची अट 10 गुंठे करण्यासाठीची पाठपुरावा करण्याचे आश्वासन सुद्धा दिले

72 तासाऐवजी 92 तासांसाठी केंद्राकडे शिफारस

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानाची माहिती शेतकऱ्यांना 72 तासाचे आज संबंधित विमा कंपनीला कळवावी लागते त्यानंतर मिळालेली नुकसानाची माहिती पीक विमा करिता कंपनीकडून ग्राह्य धरली जात नाही या नियमात बदल करून नुकसानाची माहिती कळवण्यासाठी शेतकऱ्यांना 72 तासाजी 92 तासाचा वेळ विमा कंपनीकडून दिला जावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची कृषिमंत्री मुंडे म्हणाले

See also भारताचा तिरंगा चंद्रावर । चंद्रायन 03 मोहीम यशस्वी

Leave a Comment