11 Admission 2023 Online Apply – 11 वि चा ऑनलाईन अर्ज कसा करावा

दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची अकरावी करिता प्रवेशाची धामधूम सुरू होणार असून प्रवेश क्षमता आणि दहावीची परीक्षा पास होणारे विद्यार्थ्यांची संख्या बघता यंदा नागपूर विभागात अकरावी मध्ये जो प्रवेश मागेन त्याला मिळेल

आता अकरावीत मागील त्याला मिळेल । 11 Admission 2023 Online Apply – अर्ज कसा कराल

अकरावीचे प्रवेश हे केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होणार असून प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे मात्र प्रवेशाची तयारी शिक्षण विभागामार्फत झालेली असून शहरांमध्ये 204 कनिष्ठ महाविद्यालय मध्ये अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणाली द्वारे होणार आहेत यामध्ये तब्बल 55 हजार 800 जागा असणार

विद्यार्थ्यांनी दिली दहावीची परीक्षा

नागपूर जिल्ह्यातून तब्बल 59238 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली यामधून 32,112 शहरी तर 27,126 ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे

गतवर्षी तब्बल वीस हजार 853 जागा होत्या अकरावीचा रिक्त

मागच्या वर्षी 11 वी च्या 55800 जागांपैकी शहरामध्ये 34,947 जागांवर प्रवेश निश्चित झाले तर 20853 जागा शिल्लक राहिल्या होत्या

अकरावी प्रवेश प्रक्रिया PART 1 – 2023 अर्ज कसा करावा | Std. 11th Centralized Online Admission Apply Process 2023-24 Maharashtra

  1. अकरावी प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या अधिकृत संकेतस्थळावर ती जावे लागेल.
  2. https://11thadmission.org.in/
  3. आता आपला डिव्हिजन म्हणजेच विभाग निवडावा
  4. आता स्टुडन्ट रजिस्ट्रेशन वर क्लिक करा
  5. आता तुमच्यासमोर तीन ऑप्शन आले असतील जर तुम्ही महानगरपालिका एरियामध्ये तुमची शाळा असेल तर पहिलं ऑप्शन निवडा जर महानगरपालिका क्षेत्रात तुमची शाळा येत नसेल तर दुसरा ऑप्शन निवडा जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थी असाल तर तिसरा पर्याय निवडा
  6. जर तुमचं नुकताच दहावी झाला असेल तर प्रेशर सिलेक्ट करा जर तुम्ही पुन्हा दहावी परीक्षा दिली असेल तर रिपीटर सिलेक्ट करा किंवा जर तुम्ही या वर्षाच्या आधी पास झाला असेल तर प्रिव्हियसली पास सिलेक्ट करा
  7. दहावीच्या कोणत्या बोर्डातून तुम्ही परीक्षा पास केली आहे ते निवडा (ssc/cbsc)
  8. आता दहावीच्या परीक्षेचे सर्व माहिती खाली विचारल्याप्रमाणे भरा
  9. सर्वप्रथम तुमचा दहावीचा सीट नंबर व्यवस्थित भरा
  10. नंतर परीक्षा कोणत्या महिन्यामध्ये झाली तो महिना निवडा
  11. त्यानंतर परीक्षेचे वर्ष निवडा
  12. त्यानंतर सेक्युरिटी क्वेश्चन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे जे तुम्हाला आठवण राहील त्या पद्धतीने सिलेक्ट करा आणि सोबत असलेल्या पेपरवर लिहून ठेवा
  13. आता तुमचा पासवर्ड निवडा पासवर्ड सहज सोपा न विसरणारा ठेवावा जेणेकरून विसरणार नाही
  14. एकदा पासवर्ड टाकून कन्फर्म करावे
  15. आता CAPTCHA Code कोड टाकावा
  16. व रजिस्टर बटन वर क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्यावे
See also नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर - NET EXAM TIME TABLE 2023

अकरावी प्रवेश प्रक्रिया PART 2 – 2023 अर्ज कसा करावा

  1. अकरावी प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या अधिकृत संकेतस्थळावर ती जावे लागेल.
  2. https://11thadmission.org.in/
  3. आता आपला डिव्हिजन म्हणजेच विभाग निवडावा
  4. उदाहरणार्थ. अमरावती
  5. आता लॉगिन करावे
  6. अकरावी प्रवेश प्रक्रियेचा भाग 1 भरत असताना तुम्हाला जो स्टुडन्ट आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
  7. आता 11 वी प्रवेश प्रक्रिया भाग 2 तुम्हाला डॅशबोर्ड येईल
  8. सिलेक्ट स्ट्रीम म्हणजे शाखा निवडा -Arts/Commerce/Science/Hsvc यापैकी तुम्ही ज्या शाखेला प्रवेश घेऊ इच्छितात त्यावर ती क्लिक करायचे आहे.
  9. आता सिलेक्ट मिडीयम विचारेल म्हणजे तुम्हला कोणत्या माध्यमातून शिकायचे आहे याची निवड करावी जसे – MARATHI/-HINDI/-ENGLISH/-GUJRATI/-URDU
  10. SAVE AND NEXT वर क्लीक करावे
  11. महाविद्यालयाच्या निवडीसाठी सर्च बार वर शाळेचे नाव टाका किवा

शाखा Straem/मिडीयम MIDIUM /स्टेटस STATUS /कॉलेज प्रकार TYPE /एरिया ,क्षेत्र ,ठिकाण AREA

ज्या शाळेत किवा विद्यालयात प्रवेश घायचा आहे तेच टाका , अनुदानित व विनानुदानित निवडताना काळजी घ्या कारण विनानुदानित मध्ये फीज जास्त लागेल

११ वी प्रवेश संदर्भात नेहमीचे प्रश्न –

11 वी प्रवेश प्रक्रिया मध्ये नेमके काय करायचे असते

तुम्हला तुमचे कागदपत्र घेऊन online अर्ज दाखल करणे आवश्यक असते

11 वी प्रवेश प्रक्रिया मध्ये नेमके कोणते कागदपत्रे लागतात

१० वी ची marksheet
शाळा सोडल्याचा दाखला
आधार कार्ड
cast
उत्पन व domocial अधिवास प्रमाणपत्र
फोटो
सही
रेशन कार्ड इत्यादी

११ वी मध्ये कोणत्या शाखा आहेत

आर्ट, कॉमर्स, सायन्स की एच एस वी सी अश्या शाखा ११ वीत आहे

११ वी चे अध्ययनाचे माध्यमकोणते आहे

मराठी , इंग्रजी , उर्दू , हिंदी असे माध्यम ११ वी प्रवेशाचे उपलब्ध असतात

११ वी च्या विद्यालयाचा प्रकार व फी

यात दोन प्रकार असतात अनुदानित व विनानुदानित , जर अनुदानित मध्ये प्रवेश मिळाला तर फी खूप कमी लागेल व विनानुदानित मध्ये प्रवेश मिळाला तर कॉलेज नुसार फी कमी जास्त असते यात ५००० पासून १००००० पर्यंत फीज असू शकते

See also NEET JEE NET Exam Time Table 2024 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

11 वी option form bhrtana कोणती काळजी घ्यावी

जेव्हा तुम्ही फोर्म मध्ये option भराळ तेव्हा काळजी ने जे कॉलेज हवे ते आधी निवडा व त्या प्रमाणे पसंती क्रम नुसार निवडा. गडबड करू नका कोणी ज्याला online फोर्म भरायचा अनुभव आहे तेथून option क्रम घरी कागदावर तयार करून मग online टाकून घ्यावे

Leave a Comment