2/03/2022 च्या दैनंदिन चालू घडामोडी – Daily Current Affairs in Marathi 02-March 2022


2/03/2022 च्या दैनंदिन चालू घडामोडी – Daily Current Affairs in Marathi 02-March 2022
2/03/2022 च्या दैनंदिन चालू घडामोडी - Daily Current Affairs in Marathi 02-March 2022


भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू. युक्रेन मध्ये संघर्ष तीव्र, वेगवान मदत कार्याचे भारतापुढे आव्हान. युद्धग्रस्त युक्रेन मधून विद्यार्थ्यांसह भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा ही विशेष मोहीम सुरू केली असताना खाकीव्ह शहरात मंगळवारी तोफ माऱ्यात भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यामुळे युक्रेन मधून परतण्यासाठी मदतीची याचना करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना पुढील संकट अधोरेखित झाले असून देशापुढे वेगवान मदत करण्याचे आव्हान उभे टाकले आहे.

आजपासून निम्मे राज्य निर्बंधमुक्त. 70 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक लसीकरण झालेल्या जिल्ह्यांना दिलासा. राज्यातील करोनाचा संसर्ग ओसरल्याचे पार्श्वभूमीवर बुधवारपासून मुंबई ,नागपूर ,पुण्यासह निम्मे राज्य निर्बंधमुक्त होणार आहे. राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक लसीकरण झालेला जिल्ह्यातील निर्बंध मागे घेण्यात येणार आहे. त्यानुसार उपाहारगृहे चित्रपट व नाट्य गृह आदी पूर्णश्रमतेने सुरू करण्याची मुभा दिली जाईल.

राज्याच्या जीएसटी संकलनात घट झाली आहे. राज्यातील वस्तू व सेवा जीएसटी संकलनात जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात सुमारे तेराशे कोटींची घट झाली आहे.

वायु प्रदूषणाचे आरोग्यावर घातक परिणाम दोन दशकांत मृत्यूच्या संख्येत 2.5 पटीने वाढ.

परदेशी शिक्षणाच्या मार्गदर्शनासाठी ग्लोबल स्टूडेंट सेंटरची स्थापना. लंडनमधील युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडनचे पुण्यात ग्लोबल स्टूडेंट्स सेंटर हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामार्फत पुणे महाराष्ट्र आणि देशभरातील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण बाबतचे मार्गदर्शन करण्यात येणार असून, विद्यापीठाचे पुण्यातील केंद्र हे दक्षिण आशियातील पहिले केंद्र आहे.

विज आणि विकास कर्जही महाग. वाढीव दरांचा बोजा सामान्यांवर. वातावरणातील आणि अर्थ व्यवस्थेतील बदलाचे चटके आता बसू लागले असून खुल्या बाजारातील विज आठवडाभरात सुमारे दोन रुपये प्रति युनिट ने महाग झाली आहे. त्याच प्रमाणे राज्यांना रोखे विक्रीच्या माध्यमातून उपलब्ध होणारे विकास कर्जेही व्याजदरात काही प्रमाणात वाढ होऊन महाग झाले आहे. विकास कर्ज महागल्याने राज्य सरकारच्या तिजोरीवरील व्याजाचा बोजा तर वीज महागल्याने थेट सामान्य माणसावरील विज बिलाचा बोजा आगामी काळात वाढणार आहे.

See also Daily Marathi Chalu-Ghadamodi 27 April 2022

युनायटेड वेस्टर्न बँकेचे माजी अध्यक्ष पी. एन.जोशी यांचे निधन.

अरबी समुद्राच्या चक्रीवादळाच्या तीव्रतेमध्ये 20 ते 40 टक्‍क्‍यांनी वाढ. आय आय टी एम शास्त्रज्ञांच्या अभ्यासातील निष्कर्ष.

रशिया आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून निलंबित. शेजारील राष्ट्र युक्रेन वर हल्ला केल्यामुळे रशियावर विविध क्षेत्रातून बंदी घालण्यात आली आहे. मंगळवारी फिफा आणि युरोपीय फुटबॉल संघटनांनी मिळून रशियाला आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून निलंबित करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे कतार येथे होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत रशियाला मुकावे लागणार आहे.

Chalu Ghadamodi Prashn Utrre

नुकतेच मॉस्को वुशू स्टार्स चॅम्पियनशिपमध्ये कोणी सुवर्णपदक जिंकले आहे?
उत्तर – सादिया तारिक

कोणता आयोग 4 मार्च 2022 रोजी स्पर्धा कायद्याच्या अर्थशास्त्रावरील 7वी राष्ट्रीय परिषद आयोजित करणार आहे?
उत्तर: भारतीय स्पर्धा आयोग

अलीकडेच कोणत्या मंत्र्याच्या हस्ते देशातील 49 शिक्षकांना राष्ट्रीय ICT पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
उत्तर: केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी

कोणत्या राष्ट्रपतीने अलीकडेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार मागे घेतला आहे?
उत्तरः रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन

UAE मध्ये पॅरा वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या वैयक्तिक प्रकारात रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय पॅरा तिरंदाज कोण बनला आहे?
उत्तर –
पूजा जातयान

भारत आणि दक्षिण आशियामध्ये Twitter च्या सार्वजनिक धोरण संघाचे नेतृत्व कोण करेल?
उत्तर – समीरन गुप्ता


Leave a Comment