महत्वाच्या चालू घडामोडी फेब्रुवरी 2020 करेंट अफ्फैर्स मराठी
सर्व स्पर्धा परीक्षे करिता अतिशय महत्वाच्या चालू घडामोडी फेब्रुवरी 2020 करेंट अफ्फैर्स मराठीतुण --
कोरोना व्हायरसमुळे केरळमध्ये ‘राज्य आपत्ती’ घोषित
कोरोना व्हायरसचा भारतात तिसरा रुग्ण आढळला आहे. तिन्ही रुग्ण केरळमधील आहे. यामुळे केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून राज्यात आपत्तीची घोषणा केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी राज्य आपत्ती घोषित करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारनं राज्य आपत्ती घोषित केलेली असून, सर्वच जिह्यांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे.
दरम्यान, केरळमध्ये चीन आणि कोरोना व्हायरस प्रभावित देशांचा दौरा करणारे 1, हजार 999 लोकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. यापैकी अधिकतर जणांना विशेष वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. तर 75 जणांना वेगवेगळय़ा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.
डिफेन्स एक्स्पोला 2020
आशिया खंडातील सर्वात मोठे संरक्षणविषयक शस्त्रास्त्र प्रदर्शन लखनौ येथे 05 फेब्रुवरी पासून सुरू झाले आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, 25 देशांचे पंतप्रधान या प्रदर्शनाला हजेरी लावणार आहेत. 165 शस्त्रास्त्र कंपन्या आपले सादरीकरण करणार आहेत.
या प्रदर्शनाची संकल्पना ‘भारत ः संरक्षणातील उदयोन्मुख हब’ अशी ठेवण्यात आली आहे. अमेरिकेतील एअरोस्पेस कंपनी लॉकहीड मार्टीनचे आधुनिक एफ-35 लढाऊ जेट, युरोपीयन कंपनी एअरबस सी-295 विमान पहायला मिळणार आहेत. भारताचे तेजस, एअरबोर्न अर्ली वॉर्निंग ऍन्ड कन्ट्रोल सिस्टिम, मानवरहित ड्रोन रुस्तुमसह ऍडव्हान्स्ड पायलटलेस हेवी ड्रॉप सिस्टिम, निर्भय हे क्षेपणास्त्र देखील प्रदर्शनात मांडले जाणार आहेत.
प्रदर्शनात 54 देशांत तयार व सुटय़ा भागांच्या खरेदीसाठी सामंजस्य करार होणे अपेक्षित आहे. अंदाजे 20 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची या प्रदर्शनातून अपेक्षा आहे. 8 व 9 फेब्रुवारी रोजी हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे.
राष्ट्रीय अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धा : मीराबाई चानूचा राष्ट्रीय विक्रम
मीराबाई चानू हिने मंगळवारी राष्ट्रीय वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तिने ४९ किलो वजनी गटात आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत २०३ किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकावले.
मणिपूरच्या २५ वर्षीय मीराबाईने स्नॅच प्रकारात ८८ तर क्लिन आणि जर्क प्रकारात ११५ किलो वजन उचलत एकूण २०३ किलो वजनाचा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी तिने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात थायलंड येथील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत २०१ किलो वजनाचा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता.
रेल्वेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मीराबाईची सहकारी संजिता चानू हिने १८५ किलो वजन उचलत रौप्यपदक पटकावले तर तेलंगणाच्या टी. प्रियदर्शिनी हिने १६८ किलो वजनासह कांस्यपदक प्राप्त केले.
मीराबाईने मंगळवारी साकारलेल्या या कामगिरीमुळे तिने जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी मजल मारली. ती चीनची जियांग हुईहुआ (२१२ किलो) आणि होऊ झिहुई (२११ किलो) आणि कोरियाची री संग गम (२०९ किलो) यांच्यानंतर चौथ्या स्थानी आहे
रामजन्मभूमी विश्वस्त संस्थेची स्थापना
विश्वस्त संस्थेत 15 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. राजजन्मभूमीची भूभी तसेच अवतीभोवतीची 65 एकर अधिग्रहीत भूमी राममंदीराच्या निर्माण कार्यासाठी या संस्थेच्या आधीन केली जाणार आहे, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबर 2019 या दिवशी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयात ही भूमी रामलल्लचीच असल्याचे स्पष्ट पेले होते.
तीन महिन्यांच्या आत एका विश्वस्त संस्थेची स्थापना करून या संस्थेकडे राममंदीरचे उत्तरदायित्व सोपवावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्या आदेशाचे पालन बुधवारी केंद्र सरकारने केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा लोकसभेत केली. त्याआधी केंद्रीय मंत्रिमंडळाने या संस्थेच्या स्थापनेला संमती दिली होती. या संस्थेची नोंदणीही करण्यात आली आहे. संस्थेच्या स्थापनेमुळे रामजन्मभूमीच्या स्थानी भव्य राममंदीराच्या निर्मितीचे शतकोटी हिंदूचे ध्येय आता लवकरच साकारणार आहे.
15 सदस्यांचा समावेश
या विश्वस्त संस्थेत 15 सदस्य असून त्यातील एक दलित समाजातील आहे. कोणत्याही राजकारणी व्यक्तीचा यात समावेश करण्यात आलेला नाही. एका शंकराचार्यांना स्थान देण्यात आले आहे. तसेच केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि या विश्वस्त संस्थेने नामनिर्दिष्ट केलेले सदस्यही यात आहेत. या संस्थेचे मुख्य कार्यालय येथील गेटर कैलाश भागात असेल.
मुस्लीमांना पाच एकर जागा
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुस्लीम समाजाला अयोध्येत रामजन्मभूमीचे स्थान वगळता इतरत्र कोठेही पाच एकर जागा देण्याचे बंधन सरकारवर आहे. त्यानुसार मुस्लीमांना भूमी देण्याची घोषणाही करण्यात आली आहे .अशा तऱहेने केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन केले आहे.
महाराष्ट्रातील वाढवण येथे मोठे बंदर उभारायला तत्वतः मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील डहाणूजवळील वाढवण येथे बंदर उभारायला तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे.
जावडेकर म्हणाले, हे बंदर ‘लँड लॉर्ड मॉडेल’ च्या धर्तीवर विकसित केले जाईल. प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) सह 50 टक्के किंवा त्याहून अधिक इक्विटी भागीदारीसह प्रमुख भागीदार म्हणून ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’ (एसपीव्ही) ची स्थापना केली जाईल.
दरम्यान, या प्रकल्पाचा एकूण खर्च 6 हजार 544 कोटी इतका येण्याची शक्यता आहे असंही प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं. वाढवणमध्ये होणारे बंदर हे भारतातले सर्वात मोठे बंदर ठरणार आहे. वाढवण बंदरातून कंटेनरची 90 टक्के वाहतूक होणार आहे. वाढवण बंदरातून संपूर्ण देशात माल वितरीत होणार आहे असंही प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं.
मिराबाई चानूला वैयक्तिक उच्चांकासह सुवर्ण
माजी वर्ल्ड चॅम्पियन मिराबाई चानू हिने मंगळवारी नवा वैयक्तिक उच्चांक नोंदवला. चानूने कोलकातात सुरु असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत एकूण 203 किलोग्रॅम वजन उचलत सुवर्णपदकाची कमाई केली. ती 49 किलोग्रॅम वजनगटातून प्रतिनिधीत्व करत आहे.
मूळ मणिपूरच्या असलेल्या 25 वर्षीय मिराबाईने स्नॅचमध्ये दुसऱया प्रयत्नात 87 किलोग्रॅम वजन उचलले तर क्लीन व जर्कमध्ये 115 किलोग्रॅम वजन उचलत एकत्रित 203 किलोग्रॅम वजनाचा उच्चांक नोंदवला. या कामगिरीमुळे नव्या विश्व मानांकन यादीत ती चौथ्या स्थानी झेपावली आहे. पहिल्या तीन स्थानी चीनची जियांग हुईहुआ (212 किलोग्रॅम), होऊ झिहुई (211 किलोग्रॅम) व कोरियाची री साँग गूम (209 किलोग्रॅम) अनुक्रमे विराजमान आहेत.
मिराबाईचा यापूर्वीचा वैयक्तिक उच्चांक 201 किलोग्रॅमचा होता. थायलंडमध्ये गतवर्षी संपन्न झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिने ही कामगिरी साकारली होती. त्या स्पर्धेत ती चौथ्या स्थानी राहिली होती.
रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर जैसे थे
भारतीय रिझर्व्ह बँकेने आज, गुरुवारी पतधोरण जाहीर केले. त्यात सलग दुसऱयांदा रेपो रेट 5.15 टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट 4.90 टक्के एवढा कायम ठेवला आहे. सहाव्या द्वि-मासिक पतधोरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
आर्थिक स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली पतधोरण समितीने रेपो रेटमध्ये बदल न करण्याचा निर्णय आज जाहीर केला.
चालू आर्थिक वर्षातील हा सहावा पतधोरण आढावा आहे. पतधोरण आढाव्यात चलनवाढीचा दर आटोक्मयात असल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले.
Very nice sir.
उत्तर द्याहटवा