लॉक डाऊन 2 : गृहमंत्रालयाकडून गाईडलाईन जारी
कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात तीन मे पर्यंत लॉक डाऊन वाढवण्यात आला आहे. मात्र, लॉक डाऊन – 2 मध्ये अनेक क्षेत्रांना सवलतीही दिले आहेत. लॉक डाऊन 2 संदर्भात गृहमंत्रालयाकडून आज मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत.
यामध्ये सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी मास्क करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास तो दंडनीय अपराध असणार आहे.
कुठल्याही संस्थेने किंवा सार्वजनिक ठिकाणच्या व्यवस्थापकाने पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्याची परवानगी देऊ नये. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता 3 मे पर्यंत अन्य सर्व सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये शाळा-कॉलेज, कोचिंग क्लासेस, रेल्वे सेवा, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानसेवा, बस, मेट्रो, शॉपिंग मॉल, जीम, धार्मिक स्थळे, राजकीय कार्यक्रम, चित्रपट गृहे, स्विमिंग पूल आधी बंद ठेवण्यात येणार आहे.
केंद्र सरकारकडून रुग्णालये, किराणा मालाची दुकाने, शेती, ऑनलाइन टिचिंग, मासेमारी या सर्वांना सवलती देण्यात आल्या आहेत. मात्र या सवलती ग्रामीण भागात आणि हॉटस्पॉट नसलेल्या ठिकाणी असतील.
त्याचबरोबर, 20 एप्रिल नंतर पुढील गोष्टींची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये आयटी कंपन्या 50 टक्के कर्मचाऱ्यांसह काम करू शकतील. ई-कॉमर्स कंपन्या, कुरिअर सेवांना कामास परवानगी देण्यात येत आहे. तसेच लॉक डाऊन मध्ये अडकलेल्या लोकांसाठी हॉटेल व लॉज सुरू केले जातील.