भारताला अमेरिकेकडून 5.9 मिलियन डॉलरची मदत जाहीर
कोरोना विषाणूला रोखण्यासाठी अमेरिकेने भारताला आरोग्य सहाय्यता
निधीच्या रुपात 5.9 मिलियन डॉलरची मदत केली आहे. अमेरिकेच्या परदेश
मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे.
भारतातील कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी, तसेच त्यासाठी आवश्यक
जनजागृती आणि उपाययोजना करण्यासाठी आणि कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी हा
निधी वापरण्यात यावा, असे परदेश मंत्रालयाने म्हटले आहे.
जागतिक साथीच्या
रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिका सुरूवातीपासूनच एनजीओंना सहायता निधी
देत असते.
अमेरिकेकडून मागील 20 वर्षात दिल्या जाणाऱ्या 2.8 बिलियन डॉलरच्या
सहायता निधीतील हा एक भाग आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतानेही
अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांची निर्यात केली आहे.