कोरोनाच्या फैलावाची अमेरिकेकडून सखोल चौकशी
चीनमधील वुहानच्या प्रयोगशाळेतून कोरोना विषाणूंचा फैलाव झाल्याच्या वृत्ताची अमेरिकेकडून पडताळणी करण्यात येत आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थाही याचा तपास करत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
ट्रम्प म्हणाले, चीनच्या वुहान शहरातून कोरोनाचा फैलाव जगभर झाला आहे. वटवाघूळांपासून हा विषाणू आल्याचे चीन सांगत आहे. मात्र, ही वटवाघळे वुहानच्या त्या बाजारात नसतात. ती वुहानपासून 40 मैल अंतरावर असतात. त्यामुळे, चीनच्या या दाव्यामध्ये तथ्य वाटत नाही. कोरोना विषाणूंचा फैलाव वुहानच्या प्रयोगशाळेतून झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले आहे. अनेक जण याविषयी विचार करत आहेत. त्यामध्ये काही तरी तथ्य आहे, असे वाटते. त्यामुळे अमेरिका या वृत्ताचा सखोल तपास करत आहे.तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘वुहान इन्स्टिस्ट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’ला अमेरिकात देत असलेले अनुदान थांबवणार असल्याची घोषणाही ट्रम्प यांनी केली आहे.
अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव जगात सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 7 लाख 38 हजार 830 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 39 हजार 014 जणांचा मृत्यू झाला आहे.