estudycircle — ठळक महत्वाच्या टॉप 20 बातम्या / न्यूज / चालू घडामोडी 23-एप्रिल-2020
•आरोग्यसेवकांवर हल्ला केल्यास तुरुंगवास
• •डॉक्टर, परिचारिका आणि अन्य आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांवरील सातत्याने होणारे हल्ले रोखण्यासाठी केंद्राने कठोर धोरण राबवण्याचा निर्णय
•हल्लेखोरांना किमान 3 महिने ते 7 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. •तसेच, ५० हजार ते ५ लाख रुपयांची दंडात्मक कारवाईही होऊ शकते.
•हल्लेखोरांविरोधातील दाखल झालेला गुन्हा दखलपात्र व अजामीनपात्र असेल.
•त्याची ३० दिवसांत चौकशी पूर्ण केली जाईल आणि एका वर्षांत दोषींना शिक्षा ठोठावली जाईल.
•१२३ वर्षे जुन्या ‘महासाथीविरोधातील कायदा- १८९७’ मध्ये बदल करण्यात आला असून तसा अध्यादेश तातडीने काढला जाईल
•WHO चा इशारा
•करोना व्हायरस बराच वेळ पृथ्वीवर टिकून राहणार
•अनेक देश अद्यापही करोनाशी लढा देण्याच्या सुरुवातीच्या स्टेजवर
•जे देश आपण करोनावर नियंत्रण मिळवल्याचा दावा करत होते तिथे संख्या वाढत चालली असल्याचं दिसत आहे.
•तसंच आफ्रिका आणि अमेरिकेतही चिंताजनक वाढ झाली आहे”.
•संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य विभागाने अत्यंत योग्य वेळी ३० जानेवारी रोजी जागतिक आणीबाणी जाहीर केली होती.
• •इराणचा पहिला लष्करी उपग्रह अवकाशात
•इराणने लष्करी उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात सोडला असून तो कक्षेत प्रस्थापित करण्यात आला आहे, अशी माहिती इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डने दिली
•गुप्त अवकाश कार्यक्रम सुरू असल्याचे संकेत इराणने वेळोवेळी दिले आहेत.
•रेव्होल्युशनरी गार्डने म्हटले आहे की, आम्ही लष्करी उपग्रह सोडला असून त्याचे नाव ‘नूर’ असे आहे.
•इराणने जो उपग्रह सोडला आहे तो ४२५ कि.मी उंचीवरील कक्षेत असून इराणने सोडलेला तो पहिलाच लष्करी उपग्रह आहे.
•इराणमधील शाररौद येथील तळावरून हा उपग्रह सोडण्यात आला असून हा तळ सिमनान प्रांतात आहे.
विषाणूच्या स्त्रोताबाबत पुरावे चीनने द्यावेत
•चीनने करोना विषाणू नेमका कुठून आला त्याचे खरे पुरावे द्यावेत अन्यथा गंभीर परिणाम होतील, असा इशारा अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी दिला आहे.
•जगात सध्या करोना विषाणू साथीत २५ लाख लोकांना संसर्ग झाला असून १ लाख ७० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.
•हा विषाणू चीनमधील वुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतून बाहेर पडला किंवा प्राण्यांच्या बाजारपेठेतून पसरला असा संशय सुरुवातीपासून व्यक्त केला जात आहे.
•वुहान येथे डिसेंबर २०१९मध्ये हा विषाणू पहिल्यांदा पसरला होता.
•ओब्रायन यांनी ह्य़ुज हेविट यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, हा विषाणू कुठून आला याचे पुरावे देण्याची जबाबदारी चीनवर आहे.
करोना व्हायरसवरील लस निर्मितीमध्ये इस्रायलला महत्वपूर्ण यश
•लस निर्मितीमध्ये इस्रायल महत्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. “आमच्या प्रयोगशाळेमध्ये करोना विषाणूच्या कुटुंबावर काम सुरु आहे. लस बनवण्याच्या दृष्टीने दोन-तृतीयांश काम पूर्ण झालं आहे” असा दावा जोनाथन गेरशोनी यांनी केला आहे.
•‘करोनावरील लस निर्मितीला आणखी वर्षभराचा कालावधी जाईल’ असे त्यांनी सांगितले.
•करोना विषाणूमधील रिसेप्टर बाइंडिंग मोतीफ (RBM) या घटकाला लक्ष्य करणारी लस बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
•RBM हा व्हायरसच्या स्पाइक प्रोटीनमधील छोटासा भाग आहे.
•पेशींमध्ये घुसखोरी करण्यासाठी व्हायरस वेगवेगळया प्रोटीन्सचा वापर करतो.
•‘ “मानवी रोगप्रतिकारक शक्तीपासून RBM लपवून ठेवण्यासाठी व्हायरसकडून पुरेपूर काळजी घेतली जाते. पण व्हायरसच्याच RBM ला लक्ष्य करणारी लस बनवणे हाच युद्ध जिंकण्याचा उत्तम मार्ग आहे” असे गेरशोनी म्हणाले.
सर्व आवश्यक सहकार्य करु, खराब टेस्टिंग किटसवर चीनची भूमिका
•चीनमधून आयात करण्यात आलेले काही रॅपिड टेस्टिंग किटस सदोष
•“निर्यात करण्यात येणाऱ्या वैद्यकीय उत्पादनांचा दर्जा आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. •याविषयी भारतातील संबंधित यंत्रणांच्या आम्ही संपर्कात राहू व सर्व आवश्यक सहकार्य करु” असे चिनी दूतावासातील प्रवक्त्या जी रोंग यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
•करोन व्हायरसची लागण झाल्याचे जलदगतीने निदान करण्यासाठी हे रॅपिड टेस्टिंग किटस चीनकडून आयात करण्यात आले आहेत.
•पण या किटसमधून चुकीचे निदान होत असल्याची तक्रार राजस्थान सरकारने केली.
•त्यानंतर आयसीएमआरने पुढील दोन दिवस या चाचण्या न घेण्याचा सल्ला राज्यांना दिला. जलद चाचणीसंच (किट) निर्दोष असल्याची खात्री करून घेतल्यानंतरच त्यांचा वापर करण्याची सूचना ‘आयसीएमआर’ने केली आहे.
ओडिशामध्ये आता मृत कोरोना योद्धय़ांना हुतात्म्याचा दर्जा
•कोरोना महामारीविरोधात कार्यरत असणाऱया योद्धय़ांचा सन्मान करण्याच्या दृष्टीने ओडिशा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
•या लढय़ामध्ये दुर्दैवाने मृत्यु आल्यास त्याला हुत्मात्याचा दर्जा देण्यात येणार असून अंतिम संस्कार शासकीय इतमामात केले जातील, असे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी जाहीर केले आहे.
•मुख्यमंत्री पटनायक यांनी या योद्धय़ांना 50 लाखाचे विमा संरक्षणही जाहीर केले आहे.
•खासगी आणि शासकीय सेवेत असणाऱया सर्व डॉक्टर्स, कर्मचारी आणि अन्य अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱयांसाठी ही योजना लागू केली आहे
दहावी, बारावीच्या निकालासाठी जुलै उजाडणार!
• •टाळेबंदीमुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका परीक्षा केंद्र, परीक्षक, नियमक आणि टपाल कार्यालयात पडून आहेत.
•त्यामुळे निकालाची संपूर्ण प्रक्रिया रखडली असून ३ मे रोजी टाळेबंदी संपली तरी यंदा निकालाला जुलै महिना उजाडणार असा अंदाज शिक्षण मंडळाने व्यक्त केला आहे.
•उत्तरपत्रिका जमा झाल्यानंतरही दहावी इतिहासाच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणे तर बारावीचा निकाल तयार करण्यासाठी शिक्षण मंडळाला किमान दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
वर्धा जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के कोणतेही नुकसान नाही
•वर्धा जिल्ह्यातील काही भागात बुधवारी दुपारी सौम्य प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवले.
•२.६ रिश्टर स्केल इतक्या कमी तीव्रतेचा हा भूकंप असल्याने यामध्ये कोणतेही नुकसान झालेले नाही.
•मात्र, नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली होती.
सरकारी कर्मचारी, शिक्षकांना एप्रिलचे पूर्ण वेतन मिळणार, राज्य सरकारचा निर्णय
•राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन दोन टप्प्यात देण्यात येणार असेल तरी एप्रिल महिन्याचे वेतन नेहमीप्रमाणे एकाच टप्प्यात देण्यात येईल अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.
•सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर शिक्षकांनाही एप्रिल महिन्याचा पूर्ण पगार एकाच टप्प्यात मिळणार आहे.
•मार्च महिन्यातील पहिल्या टप्प्याचे वेतन देण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. दुसऱ्या टप्प्याच्या वेतनासाठीही लवकरच आदेश काढण्यात येईल.
•राज्य सरकारने परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.