•भारताने FDI चा नियम बदल केले
- करोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकानं आपल्या थेट परकीय गुंतवणुकीच्या धोरणात बदल केला आहे.
•भारताच्या शेजारील देशांना आता भारतात गुंतवणूक करण्यापूर्वी केंद्र सरकारची परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
•भारताला ज्या देशांच्या सीमा लागून आहेत अशा देशातील कोणतीही कंपनी किंवा व्यक्ती भारतातील कोणत्याही क्षेत्रात आता सरकारची मंजुरी मिळाल्यानंतरच गुंतवणूक करू शकेल असं ‘उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन मंडळा’कडून (डीपीआयआयटी) सांगण्यात आलं आहे.
•पाकिस्तान, चीन, नेपाळ, भूटान, बांगलादेश आणि म्यानमार या देशांच्या सीमा भारताला लागून आहेत.