खडक व खडकांचे प्रकार – खडकांची संपूर्ण माहिती : mahiti Stone Mahiti marathi आज च्या लेखात खडकची सपूर्ण माहिती घेऊ या . आपणास इयता सहावीत खडकांचे प्रकार आहेत ते सुधा आपण यात पाहणार आहोत व आपणास स्वाध्याय करिता प्रश्न व त्यांची उत्तरे सुद्धा दिली आहेत . आपणास खडक माहिती आहे परंतु त्याचे प्रकार उपप्रकर माहिती नाही तर या लेखात संपूर्ण माहिती घेऊ या . अधिक माहिती करिता भेट द्या – https://marathijobs.in
खडक व खडकांचे प्रकार – Khadak Stone Mahiti
खडक -:
खडक : जमिनीवर व जमिनीच्या आता आढळणार्या खनिजांच्या मिश्रणाला खडक असे म्हणतात. खडकात असलेल्या खनिज नुसार त्याचे प्रकार ठरतात . खडकांत सिलिका, अॅल्युमिनिअम, मॅग्नेशिअम तसेच लोह यांचे प्रमाण जास्त आढळते .
खडक मध्ये खालील महत्वाची खनिजे आढळतात –
खडकमध्ये विशेषतः खालील प्रकारचे खनिजे असतात
खडकामध्ये लोह, सिलिका, मॅग्नेशियम, अल्युमिनियम,लोह ही खनिजे आढळतात
खडक व खडकांचे प्रकार :-
खडकांचे एकून तीन प्रकार
- अग्निजन्य,अग्निज, मुळक
- गाळाचे खडक/ स्तरित खडक
- रूपांतरित खडक
अग्निजन्य खडक माहिती –
अग्निजन्य खडक :ज्वाला मुखीच्या उद्रेक दरम्यान भूपृष्टखली शिलारस (magma) आणि भूपृष्ठावरील लावरस थंड होत जाऊन त्यांचे घानिभवण होते या प्रक्रियेतुन तयार होणाऱ्या खडकाला अग्निजन्य खडक म्हणतात, महाराष्ट्र पठार व सह्याद्री अग्निजन्य खडकाने बनले आहे, त्यामध्ये बेसौल्ट हा प्रमुख खडक आहे
अग्निजन्य खडकांचे प्रकार ?
अग्निजन्य खडकचे एकूण दोन प्रकार पडतात ते खलील प्रमाणे आहेत
- ज्वालामुखी खडक
- पातालिक खडक
अग्निजन्य खडकांचे उपप्रकार ?
अग्निजन्य खडकांचे उपप्रकार खाली प्रमाणे आहेत
- बाथोलिक,
- लाकोलिथ,
- डाइक,
- स्टॉक. इ.
रासायनिक गुणधर्मांवर आधारित अग्निजन्य खडकांचे प्रकार?
a) आम्लधर्मीय- हा खडक वजनाने हलका व पिवळा रंग
b) अल्कधर्मीय- याचा रंग काळा असतो व लवकर झिजतो
महत्वाची माहिती —
प्युमिस खडक अग्निजन्य खडक असून ज्वालामुखी मधून येणाऱ्या फेसापासून खडक तयार होतो तो सच्छिद्र असतो आणि घनता कमी असल्याने पाण्यावर तरंगतो
महाराष्ट्र मधील डोंगरावर तळी खाणे किंवा हतिखाने आढळतात, वास्तविक हे दगडाच्या खाणींचे खड्डे आहे यातून निघालेल्या दगडाचा उपयोग किल्ले बांधायला होतो खणी मध्ये पाणी साठवून तळे किंवा तलाव तयार केले गेले आहे
गाळाचे खडक-
तापमानातील होणाऱ्या फरकामुळे खडक तुटतात आणि खडक मधून पाणी झिरपाल्यामुळे खनिजे विरघळतात त्यामुळे बारीक खडक किंवा भुगा तयार होतो नदी हिमनदी मुळे खडकाचे कण इकडे तिकडे सखल प्रदेश मध्ये वाहतात त्यामुळे एकावर एक असे थर साचतात यामुळे खाली संचानावर प्रचंड दाब तयार होतो आणि थर एकसंध होतो व त्यातून च गाळाचे खडक तयार होतात यांनाच स्तरीत खडक असें हि म्हणतात यात वनस्पतीचे मृत प्रण्यचे अवशेष गडल्या जातात त्यामुळे अश्या खडकांना जीवाश्म खडक असेही म्हणतात हे खडक वजनाला हलके ,सच्छिद्र असतात वाळूचा खडक, चुन खडक , पंक अशम (शेल) प्रवाळ हे गाळाचे खडक आहे ,यात कोळशाचे थर ही आढलतात
जीवाश्म खडक –
जीवाश्म खडक : गाडल्या गेलेल्या मृत प्राणी व वनस्पती यांच्या अवशेष वर प्रचंड दाब पडल्याने त्यांचे ठसे उमटत असतात व ते कालांतराने ते घट्ट होता म्हणून त्यांना जीवाश्म म्हणतात,जीवश्यामच्या अभ्यासाने त्या काळातील सजीवांची माहिती कळते
महत्वाची माहिती
राजस्थान मध्ये जयपूर जवळ लाल रंगाचा खडक आढळतो,हा एक प्रकारचा गाळ चा खडक आहे आणि यापासून च लाल किल्याचे बांधकाम करण्यात आले आहे
रूपांतरित खडक
रूपांतरित खडक : पृथ्वीवर ज्वालामुखी व इतर हालचाली सतत घडत असतात तेथील अग्निजन्य स्तरित खडक मोठ्या प्रमाणावर दाब व उष्णता प्रक्रियेतून जातात, परिणामी खडकाचे मूळ स्वरूप व रासायनिक गुणधर्म बदलतात मूळ खडकाचे स्फटिकरण होते म्हणजेच खडकात रूपांतरन होते, अशा प्रकारे तयार झालेल्या खडकांना रूपांतरित खडक असे म्हणतात रूपांतरित खडकात जीवाश्म ढळत नाही हे खडक वजनाला जड व कठीण असतात
आग्रा येथील ताजमहाल हा संगमवर या खडकान बनला आहे हा रूपांतरित खडक असून राजस्थान मधील मक्राना या खाणीतून आणला आहे,
जांभा खडक –
- जांभा खडक किवा लॅटेराइट हा खडक आहे.
- हा सहसा उष्ण आणि ओल्या विषुववृत्तीय प्रदेशांत सापडतो.
- भारतात जांभा दगड कोकणात आढळून येतो.
- हा खडक लाल रंगाचा असतो.
- कोकण रत्नगिरी भागात आढळतो ,
ग्रॅनाईट खडक
ग्रॅनाईट हा कडक सर्वस्वी स्फटिकमय कणीदार असतो मुख्यतः यात फेल्स्पार व क्वार्ट्झ खनिजांनी बनलेला असतो . याचे कण डोळ्यांनी ओळखता येये . खडकांचा रंग फिकट (गुलाबी, पांढुरका इ.) असतो.
महाराष्ट्राच्या पूर्वेला दक्षिण कोकणात आढळतो
लेखक – रूपाली पाटील
खडक FAQ :
खडक कशाला म्हणतात?
खडक – खणीज्यांच्य मिश्रणाला खडक म्हणतात
खडकांचे प्रकार किती व कोणते?
१)अग्निजन्य,अग्निज, मुळक
२) गाळाचे खडक/स्तरित खडक
३)रूपांतरित खडक
खडकामध्ये कोणती खनिजे आढळतात?
खडकामध्ये लोह, सिलिका, मॅग्नेशियम, अल्युमिनियम,लोह ही खनिजे आढळतात
अग्निजन्य खडकांचे प्रकार ?
A) भूपृष्ठावरील- ज्वालामुखी खडक
B) भूपृष्ठाअंतर्गत – पातालिक खडक
अग्निजन्य खडकांचे उपप्रकार ?
बाथोलिक, लाकोलिथ, डाइक, स्टॉक. इ.
खडका मध्ये कोण कोणती खनिजे आढळतात ? .
खडकांत सिलिका, अॅल्युमिनिअम, मॅग्नेशिअम तसेच लोह या खाणीजचे प्रमाण जास्त आढळते .
खडकाचे प्रकार लिहा ? .
अग्निजन्य,अग्निज, मुळक
गाळाचे खडक/ स्तरित खडक
रूपांतरित खडक
अग्निजन्य खडक कसा तयार होतो ? .
ज्वाला मुखीच्या उद्रेक दरम्यान भूपृष्टखली शिलारस (magma) आणि भूपृष्ठावरील लावरस थंड होत जाऊन त्यांचे घानिभवण होते या प्रक्रियेतुन तयार होणाऱ्या खडकाला अग्निजन्य खडक तयार होतो
अग्निजन्य खडक कोठे आढळतो ? .
रायगड किल्ला हा अग्निजन्य खडकपासून तयार झाला आहे
गाळाच्या खडकांची उदाहरणे लिहा ? .
वाळूचा खडक, चुन खडक , पंक अशम (शेल) प्रवाळ हे गाळाचे खडक आहे