भूगोल - खडक व खडकाचे प्रकार
खडक - खणीज्यांच्य मिश्रणाला खडक म्हणतात
खडकामध्ये लोह, सिलिका, मॅग्नेशियम, अल्युमिनियम,लोह ही खनिजे आढळतात
खडकांचे तीन प्रकार आहे
१)अग्निजन्य,अग्निज, मुळक
२) गाळाचे खडक/स्तरित खडक
३)रूपांतरित खडक
अग्निजन्य खडक - ज्वाला मुखीच्या उद्रेक दरम्यान भूपृष्टखली
शिलारस (magma) आणि भूपृष्ठावरील लावरस थंड होत जाऊन त्यांचे घानिभवण होते या प्रक्रियेतुन तयार होणाऱ्या खडकाला अग्निजन्य खडक म्हणतात, महाराष्ट्र पठार व सह्याद्री अग्निजन्य खडकाने बनले आहे, त्यामध्ये बेसौल्ट हा प्रमुख खडक आहे
महत्वाची माहिती
प्युमिस खडक अग्निजन्य खडक असून ज्वालामुखी मधून येणाऱ्या फेसापासून खडक तयार होतो तो सच्छिद्र असतो आणि घनता कमी असल्याने पाण्यावर तरंगतो
महाराष्ट्र मधील डोंगरावर तळी खाणे किंवा हतिखाने आढळतात, वास्तविक हे दगडाच्या खाणींचे खड्डे आहे यातून निघालेल्या दगडाचा उपयोग किल्ले बांधायला होतो खणी मध्ये पाणी साठवून तळे किंवा तलाव तयार केले गेले आहे
गाळाचे खडक- तापमानातील होणाऱ्या फरकामुळे खडक तुटतात आणि खडक मधून पाणी झिरपाल्यामुळे खनिजे विरघळतात त्यामुळे बारीक खडक किंवा भुगा तयार होतो नदी हिमनदी मुळे
खडकाचे कण इकडे तिकडे सखल प्रदेश मध्ये वाहतात त्यामुळे एकावर एक असे थर साचतात
यामुळे खाली संचानावर प्रचंड दाब तयार होतो आणि थर एकसंध होतो व त्यातून च गाळाचे खडक तयार होतात यांनाच स्तरीत खडक असेंहि म्हणतात यात वनस्पतीचे मृत प्रण्यचे अवशेष गडल्या जातात त्यामुळे अश्या खडकांना जीवाश्म खडक असेही म्हणतात हे खडक वजनाला हलके ,सच्छिद्र असतात वाळूचा खडक, चुन खडक , पंक अशम (शेल) प्रवाळ हे गाळाचे खडक आहे ,यात कोळशाचे थर ही आढलतात
जीवाश्म खडक - गाडल्या गेलेल्या मृत प्राणी व वनस्पती
यांच्या अवशेष वर प्रचंड दाब पडल्याने त्यांचे ठसे उमटत असतात व ते कालांतराने ते घट्ट होता म्हणून
त्यांना जीवाश्म म्हणतात,जीवश्यामच्या अभ्यासाने त्या काळातील सजीवांची माहिती कळते
महत्वाची माहिती
राजस्थान मध्ये जयपूर जवळ लाल रंगाचा खडक आढळतो,हा एक प्रकारचा गाळ चा खडक आहे आणि यापासून च लाल किल्याचे बांधकाम करण्यात आले आहे
रूपांतरित खडक
पृथ्वीवर ज्वालामुखी व इतर हालचाली सतत घडत असतात तेथील अग्निजन्य स्तरित खडक मोठ्या प्रमाणावर दाब व उष्णता प्रक्रियेतून जातात, परिणामी खडकाचे मूळ स्वरूप व रासायनिक गुणधर्म बदलतात मूळ खडकाचे स्फटिकरण होते म्हणजेच खडकात रूपांतरन होते, अशा प्रकारे तयार झालेल्या खडकांना रूपांतरित खडक असे म्हणतात रूपांतरित खडकात जीवाश्म आढळत नाही हे खडक वजनाला जड व कठीण असतात
आग्रा येथील ताजमहाल हा संगमवर या खडकान बनला आहे हा रूपांतरित खडक असून राजस्थान मधील मक्राना या खाणीतून आणला आहे,
जांभा खडक - कोकण रत्नगिरी भागात आढळतो ,
ग्रॅनाईट हा खडक महाराष्ट्राच्या पूर्वेला दक्षिण कोकणात आढळतो
लेखक - रूपाली पाटील