100+ भरपूर नवीन उखाणे - Marathi Navin Chan Ukhane 2022
छन छन बांगड्या, छुम छुम पैंजन,
… रावांचे नांव घेते, ऐका सारे जण.
गोकुळा सारखं सासर, सारे कसे हौशा,
.. रावांचे नांव घेते, तिळ संक्रांती च्या दिवसी.
मंदिरात वाहाते, फुल आणि पान,
… रावांचे नांव घेते, ठेऊन सर्वांचा मान.
रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा,
… रावांचे नांवाचा, भरला हिरवा चुडा.
खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध,
… रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.
पंच पक्वांनाच्या ताटात, वाढले लाडू पेडे,
… रावांचे नांव घेतांना, कशाला आढे वेढे.
मंदिराचे वैभव, परमेश्वराची मुर्ती,
… रावांचे नांव घेऊन करने इच्छापूर्ती.
सावित्रीने नवस केला-पती मिळावा सत्यवान,
… रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान.
रला यांनी हात, वाटली मला भिती,
हळूच म्हणाले… राव अशीच असते प्रिती.
नववधु आले मी घरी, जीव माझा गेला बावरुन,
…रावांनी मारली हाक, शिणच गेला निघुन,
कपाळावर कुंकु, हिरवा चुडा हाती,
…रावं माझे पति, सांगा माझे भाग्य किती.
हृदयात दिले स्थान, तेव्हा दिळा हातात हात,
… रावांच्या जीवनात लाविते प्रितीची फुलवात.
नव्हती कधी गाठ मेट, एकदाचं झाली नजरा नजर,
आई-वडी विसरले…रावांसाठी सुटला प्रितीचा पाझर,
चांदीचे जोडवे पतीची खुन,
.. रावांचे नांव घेते,… ची सुन.
दारी होता टेबल, त्यावर होता फोन,
… रावांनी पिक्चर दाखवला हम आपके हैं। कौन?
मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,
… रावांच नाव घेते निट लक्ष ठेवा.
अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी,
आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे..रावांची राणी.
गुलाबाचे फुल दिसायला ताजे,
… रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे.
डाळिंबाचे झाड, पानोपानी दाटले,
… रावांचे नांव घेतांना, आनंदी मला वाटले,
…रावांच्या नावाने, भरला हिरवा चुडा,
त्यांच्यावर करेल मी प्रेमाचा सडा.
- मंगल माते मंगल देवी वंदिते मी तुला _______ रावांना आयुष्य घालून सौभाग्य दे मला
- हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशि _______ रावांचं नाव घेते हळदी-कुंकवाच्या दिवशी
- मनी मंगळसूत्र सौभाग्याची खून _______ रावांचं नाव घेते _______च्या कुटुंबाची सून
- जय जवान जय किसान कर्ज तो सारा देश _______रावांच्या जीवा करता घातला सौभाग्याच्या वेश
- वडिलांचा आशीर्वाद मातेची माया _______ रावांची पती मिळाले ही ईश्वराची दया
- दत्तात्रय शोभे गाय, महादेवाला शोभे नंदी_______ रावांच्या जीवनावर मी आनंदी
- माहेरच्या ओढीने डोळे भरून _______ रावांच्या संसारात मन घेते वळून
- राम लक्ष्मण हनुमान तात्यांचा दास_______रावांच नाव घेते तुमच्यासाठी खास
- सागराच्या हृदयी अंतरंग लपले_______ रावांसाठी जीवन सर्वस्व अर्पिले
- पानाच्या अंड्यावर फुलांचे झाकण_______रावांच्या हातात सोन्याचे कंकण
- सांबाच्या पिंडीला बेल वाहिला हिरवागार आणि _______ रावांच्या जीवासाठी केला संसार
- सौभाग्यवतीचा अलंकार म्हणजे काचेचे चूडे _______ रावांचे नाव घेते मंगळागौरी पुढे
- अलंकार अलंकार श्रेष्ठ मंगळसूत्र _______रावांच्या हाती माझे जीवन सूत्र
- मंगळसूत्राच्या वाटीत संगम सासर माहेरचा _______ रावांचे नाव घेऊन मान राखते सर्वांचा
- हृदय रुपी शिंपल्यात प्रीतीचे पाणी _______ रावांच्या नावाने बांधले मंगल मनी
- कमुनितीज आश्रमात शकुंतलेची माहेर _______ रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर
- गौतमाची गौतमी वसिष्ठांच्या अरुंधती _______ रावांची मी सौभाग्यवती
- दया-क्षमा-शांती हेच तिचे माहेर _______ रावांच्या चरणावर केला पंचप्राणांच्या आहेर
- रातराणीच्या सुगंधाने नीशिगंध झाला मोहित मागते आयुष्य _______ रावांच्या सहित
- शिवाजी राजा जिजाई होती माता_______ रावांचे नाव घेऊन येते मी आता
- अमृत मूर्तीला स्वरूप देतो कलाकार_______ रावांचे सद्गुन हेच माझे अलंकार
- हळद लावते किंचित कुंकु लावत ठसठशीत_______ रावांचे पती मिळाले हेच माझे पूर्व संचित
- रुसलेला राधेला कृष्ण म्हणतो हास_______ रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास
- साडे झाले समूह झाले आता निघाली वरात_______ रावांचे नाव घेते लक्ष्मी आली घरात
- राधे च्या मनात कृष्ण चिंतन _______ रावांचे नाव घेऊन बांधते मी कंकण
- लग्नाचे बंधन जन्माच्या गाठी _______ रावांचे नाव घेते तुमच्यासाठी
- गर्व नसावा पैशाचा अभिमान नसावा रूपाचा _______ रावांना घालते वरण भात तूपाचा
- परमेश्वराचे सोबती सुख-दुःखाचे भागीदार, _______ च्या जीवनात मी आहे साथीदार
- शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी_______ राव माझे जीवन साथी
- शुभमंगल प्रसंगी गणेशाची साथ _______ रावांच्या नावाने आज केली सुरुवात
- देवरूपी निरंजनात प्रेमरुपी बात_______ रावांचे नावाला आज केली सुरुवात
- जन्म दिला मातेने पालन केले पित्याने _______ रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने
- यमुनेच्या तीरावर ताजमहालाची सावली _______ रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली
- सोन्याची घागर अमृताने भरावे _______ रावांची सेवा मी जन्मभर करावी
- सत्यभामेने श्रीकृष्णाची केली सुवर्णतुला _______ रावांचे नाव घेते अशिर्वाद द्यावा मला
- दारात अंगण, अंगणात काढलेली रांगोळी _______ रावांचे नाव घेऊन बांधते मुंडावळी
- शंकर पार्वतीच्या पोटी जन्मले गणराज _______ रावांचे नाव घेते गौरी बसली आज
- गजाननाची कृपा गुरूचा आशीर्वाद _______ रावांचे नाव घ्यायला आज करते सुरुवात
- आई-वडील सोडताना पाऊल होतात कष्टी _______ रावांच्या संसारात मी करीन सुखाची सृष्टी
- आकाशाच्या अंगणात ब्रह्मा विष्णू आणि महेश रावांचे नाव घेऊन करते हो गृहप्रवेश
- महादेवाला बेल विष्णूला तुळस_______ रावांचे नाव घ्यायला कसला हो आळस
- मंगळसूत्र आहे सासरची प्रीती,_______ रावांचे नाव घेऊन समाधान चित्ती
- नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलतीची इच्छा _______ रावांच्या संसारी आपणा सर्वांच्या शुभेच्छा
- शंकराच्या पिंडीवर बेलाची पार,_______ रावांचे नाव घेते सर्वांचा मान
- सौभाग्य चालेना काळी पोत, _______ रावांच्या जीवनात उजळीन जीवन ज्योत
- चंदनाच्या झाडा बसला मोर _______राव यांच्या जीवावर मी आहे थोर
- सर्व देवांमध्ये श्रेष्ठ ब्रह्मा-विष्णू-महेश,_______ रावांचे नाव घेऊन करते हो गृहप्रवेश
- सुख समाधान तेथे लक्ष्मीचा वास, _______ रावांना देते मी जिलबीचा घास
- पदस्पर्शाने लवंडते उंबरठ्यावरलं माप, _______ रावांची भाग्य पती म्हणून गृह प्रवेश करते आज
- घराला असा व अंगण अंगणात डोलावी तुळस, _______ रावांच्या जीवनात चढवीन आनंदाचा कळस
नवरदेवासाठी उखाणे
- आंबा गोडच गोड त्याहीपेक्षा _______ चे नाव आहे अमृतापेक्षा ही गोड
- चंद्र आहे रोहिणीचा सांगाती, _______ आहे माझी जिवनसाथी
- सायंकाळच्या आकाशाचे निराळे रंग, _______ पण असते घरात कामात दंग
- आंबेवनात कोकिळा गाते गोड, _______ आहे माझ्या तळहाताचा फोड
- शंकरासारखा पिता अन गिरीजेसारखी माता, _______ राणी मिळाली स्वर्गाला हाता
- निळे पाणी निळे डोंगर हिरवे हिरवे रान, _______ चे नाव घेतो राखून सर्वांचा मान
- बशीत बशी कप बशी, _______ ला सोडून बाकी सगळ्या म्हशी
- इंग्रजी भाषेला महत्त्व आले फार, _______ ने फुलवला माझा संसार
- सिते सारखे चरित्र रंभे सारखे रूप, _______ मला मिळाली आहे अनुरूप
- वेरूळची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर आहे,_______ माझी सर्वांपेक्षा सुंदर
- गणेशाच्या भेटीसाठी गौरी येते नटून, _______आली माझ्या संसारात आणि मी गेलो फुलून
- रुक्मिणीने पण केला कृष्णाला वरीन, _______ च्या साथीने आदर्श संसार करीन
- कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास, _______ ला देतो मी लाडवाचा घास
- पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले,_______ चे नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले
- सोन्याची सुपली मोत्यानं गुंफली, _______ माझी राणी घरकामात गुंतली
- हिमालय पर्वतावर शंकर-पार्वती ची जोडी, _______ च्या जीवनात आहे मला गोडी
- चांदीच्या पाटावर अमृताचा कलश,_______ आहे माझी खूप सालस
- दही चक्का तूप, _______ आवडते मला खूप
- मस्का वरील फुल घेतले दुधा-तुपात बुडविले, _______ च्या कपाळी कुंकुमतिलक लावले
- जोडीने आंबा शिंपला आता निघेल वरात, _______ च्या साथीने केली संसाराची सुरुवात
- श्रीगणेशाच्या भेटीसाठी गौरी येते नटून, _______ रावांच्या नावाने आले सुख माझे फुलून