चालू घडामोडी : 26 डिसेंबर 2021
प्रोजेक्ट सीबर्ड/ IHQ MoD (नौसेना) याचे नवीन महासंचालक - व्हाइस अॅडमिरल तरुण सोबती.
- केंद्रीय गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ‘सुशासन निर्देशांक 2021’ याच्या ‘गट अ’ राज्यांच्या श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक - गुजरात (त्याखालोखाल महाराष्ट्र आणि गोवा).
- ‘सुशासन निर्देशांक 2021’ याच्या ‘गट ब’ राज्यांच्या श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक - मध्य प्रदेश.
- ‘सुशासन निर्देशांक 2021’ याच्या ‘उत्तर-पूर्व आणि पर्वतीय’ राज्यांच्या श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक - मिझोरम.
- ‘सुशासन निर्देशांक 2021’ याच्या ‘केंद्रशासित प्रदेश’ श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक - दिल्ली.
- _____ कंपनीला CII तर्फे प्रतिष्ठित ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2021 प्राप्त झाला - नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO).
- भारताचा माजी ऑफस्पिनर _____ याने वयाच्या 41व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली - हरभजन सिंग.
- ______ मंत्रिमंडळाने तेल, वायू, खत इत्यादी कंपन्यांमधील गुंतवणुकीचे पोर्टफोलिओ ठेवण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी इन्वेस्टमेंट होल्डिंग कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला - आसाम.
- ______ सरकारने माजी सैनिकांसाठी श्रेणी-3 आणि श्रेणी-4 पदांमध्ये 2 टक्के आरक्षण मंजूर करण्याचा निर्णय घेतला - आसाम.
- आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी _____ येथे 'अटल उद्यान'चे उद्घाटन केले - गुवाहाटी.
- मध्य प्रदेश सरकारच्या अंतर्गत राज्य जनसंपर्क विभागाचे नवीन प्रधान सचिव आणि आयुक्त - राघवेंद्र कुमार सिंह.
- ______ संस्थेने 25 डिसेंबर 2021 रोजी 'जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप' नामक जगातील सर्वात मोठी आणि सर्वात शक्तिशाली अंतराळ दुर्बीण प्रक्षेपित केली - NASA, अमेरिका.