चालू घडामोडी 29 डिसेंबर 2021
_____ जानेवारी 2022 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) याच्या दहशतवाद प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष असेल - भारत.
- _____ सरकार तीन वर्षांत राज्यभरात बचत गटांसाठी 25 महाकवी भरतियार लाइव्हलीहुड पार्कची स्थापना करणार आहे - तामिळनाडू.
- _______ सरकारच्या ई-प्रशासन विभागाने त्यांच्या शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी 'e-RUPI' नामक कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट देयक सुविधा लागू करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि भारतीय स्टेट बँक (SBI) सोबत भागीदारी केली - कर्नाटक.
- भारताच्या _____ हिने पोलंड येथे आयोजित FIDE वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2021 या बुद्धिबळ स्पर्धेच्या महिला गटात संयुक्त-द्वितीय स्थान मिळवले - कोनेरू हंपी.
- 1 फेब्रुवारी 2022 पासून पंजाब नॅशनल बँकेचे (PNB) MD आणि CEO - अतुल कुमार गोयल.
- केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्ये मंत्रालयाच्या सहकार्याने जम्मू व काश्मीर सरकार आणि गृहनिर्माण व शहरी विकास विभाग यांच्यावतीने ______ येथे प्रथमच ‘रिअल इस्टेट शिखर परिषद 2021’ आयोजित करण्यात आली - जम्मू.