अर्थसंकल्प 2022-23 – महत्वाचे ठळक मुद्दे
अर्थ संकल्प २०२२ -२३ मधील ठराविक व महत्वाचे मुद्दे या लेखात आपण जाणून घेणार आहोत .
कृषी
- रसायन विरहित नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन
- किसान ड्रोन – शेतकी प्रक्रिया सुलभीकरण & डिजिटल भूमापन
- कषी स्टार्ट अप साठी नाबार्ड मार्फत निधी
- भरडधान्य (ज्वारी, बाजरी,इ.) मूल्यवर्ध, वापर & ब्रँडिंगवर भर.
पायाभूत सुविधा
- PM – गतीशक्ति – या योजनेवर मुख्य भर देण्यात आला आहे
- सात इंजिन – रस्ते, रेल्वे, विमानतळ, बंदरे, सामुदायिक वाहतूक, जलमार्ग, लॉजिस्टिक पायाभूत सुविधा मार्फत दळणवळण विकासावर भर
- विना बाधा बहूसाधन प्रवास यावर काम करणार.
- राष्ट्रीय रोप-वे विकास आराखडा
रेल्वे
- 400 – वंदे भारत ट्रेन उत्पादन
- एक स्थानक एक उत्पादन (स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन)
- पार्सल सुविधेसाठी पोस्ट आणि रेल्वे समन्वय.
- टीप – रेल्वे बद्दल जास्त माहितीची उपलब्धता नाही.
अमृतकाळ (2022-2047)
- पचवीस वर्षांचे दीर्घकालीन नियोजन
- वद्धी आणि सर्वसमावेश विकासावर भर
- यात सर्वात जास्त भर PM – गतीशक्तिवर
- टीप – ठोस कार्यक्रम पत्रिका भेटली नाही
आरोग्य आणि पोषण
- सक्षम अंगणवाडी
- मानसिक आरोग्यासाठी ऑनलाईन समुपदेशन – स्वागतार्ह निर्णय
- पोषण 2.0, मिशन वात्सल्य, मिशन शक्ति (विस्तृत माहितीचा अभाव)
- डिजिटल आरोग्य परिसंस्था निर्मिती वर भर
योजना
- हर घर नळ से जल – 3.8 कोटी कुटुंबांना (जल जीवन मिशन सध्या चालू आहे)
- PM – आवास योजना – निधी कमतरता- फक्त 55 हजार प्रती घर इतका निधी.
- पोस्ट ऑफिस – 100% बॅंकिंग सुविधा (आर्थिक समावेशनासाठी आवश्यक)
- डिजिटल व्यवहार – 75 जिल्ह्यांत 75 बॅंकिंग युनिट
- PM-DevINE – ईशान्य भारत पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास
- Vibrant Village Program – उत्तर भारतातील सीमा भागातील खेड्यांच्या विकासासाठी (ही योजना ईशान्य भारतात प्रथम राबवली पाहिजे होती, कारण चीन)
- Aspirational Block Program – Aspirational District योजनेतील तालुक्यासाठी
शिक्षण
- डिजिटल विद्यापीठ
- ई- प्रयोगशाळा
- One class – One TV ही योजना 200 चॅनल पर्यन्त विस्तारने. (पण या चॅनल च्या गुणवत्तेच्या संदर्भात काही निरीक्षण नोंदवण्यात आले नाहीत.)
- डिजिटल शिक्षक प्रशिक्षण
इतर काही महत्वाची मुद्दे
◾️RBI – डिजिटल रुपी आणणार ते एकमेव डिजिटल चलन असेल, त्यामुळे त्याच्यातील व्यवहारांवर कर नाही.
◾️Crypto currency – डिजिटल संपत्ती म्हणुन गृहीत धरली जाणार, त्यामुळे त्यावर 30% कर आणि तिच्यातील व्यवहारांत 1% TDS
◾️निर्गुंतवणूक – 2020-21 चे लक्ष 1.75 लाख कोटी वरून 78 हजार कोटींवर. (त्यामुळे कदाचित LIC IPO पुढील वित्तीय वर्षात येण्याची शक्यता.
तसेच 2021-22 साठी लक्ष 65 हजार कोटी म्हणजे निर्गुंतवणूक वेग कमी करण्या कडे कल दिसतोय.
◾️सहकारी संस्था – MAT 18.5% वरून 15% वर
◾️डरोन शक्ति – स्टार्ट अप साठी नवीन योजना
◾️कन – बेटवा नदीजोड प्रकल्प