24/02/2022 आजच्या दैनंदिन चालू घडामोडी / MARATHI DAILY CURRENT AFFAIRS / ESTUDYCIRCLE
रशियाचा युक्रेन वर हल्ला .युक्रेनच्या चार शहरांवर मिसाईल हल्ला झालेला असून युक्रेनमध्ये आणीबाणी लागू झाली आहे तसेच सर्व विमानतळही बंद झालेत.
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडी ची कारवाई 3 मार्च पर्यंत कोठडी.
जगातील सुंदर पर्यटन स्थळाच्या यादी महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा सिंधुदुर्ग असून लंडन सिंगापूरच्या पंगतीत सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्थान मिळाले आहे.
बारावीच्या प्रश्नपत्रिका आगीत नष्ट... संगमनेर जवळ वाहनाला अपघात दहा दिवसांनी परीक्षा, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची वाहतूक करणाऱ्या वाहनाला आग लागल्यामुळे या वाहना सोबतच संपूर्ण प्रश्नपत्रिका ही जळून खाक झाल्या दहा दिवसांवर परीक्षा असल्याने या प्रश्नपत्रिका शिक्षण मंडळाचा पुन्हा छापाव्या लागणार आहेत.
हिजाब बाबत चा वाद अनावश्यक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका.
वीस वर्षात हरित ऊर्जा क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण होणार मुकेश अंबानी यांचे मत.
अमेरिकेचे रशियावर नवे व्यापार निर्बंध, युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्याचा निर्णय म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन . बाईडन यांची टीका.
सर्वांनाच लोकल प्रवासासाठी रेल्वेची सज्जता राज्य सरकारच्या अधिसूचनेची प्रतिक्षा.
दहावी व बारावीच्या ऑफलाइन परीक्षा रद्द करण्याची मागणी फेटाळली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा सह सी बी एस ई. इतर अनेक मंडळाच्यावतीने यावर्षी घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या प्रत्यक्ष ऑफलाइन परीक्षा रद्द करण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. अशी याचिका विद्यार्थ्यांना खोटी आशा दाखवतात तसेच या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करतात असे न्यायालयाने सांगितले.
रामसेतू चा राष्ट्रीय वारसा स्मारकाचा दर्जा देण्याची मागणी. रामसेतू ला राष्ट्रीय वारसा स्मारकाचा दर्जा देऊन संरक्षित करावे अशी मागणी करणारी याचिका भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली असून यावर 3 मार्च रोजी सुनावणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चालू आर्थिक वर्षात विकास दर हा 8.6 टक्क्यांवर सीमित राहील... इंडिया रेटिंग तिमाही वाढीचा वेग घटणार.
क्रिप्टो जाहिरात बाजींवर अंकुश लावणार, जोखीम विषयक ठडक अस्वीकृती बंधनकारक.
महिंद्र इलेक्ट्रिक ची ग्रामीण सेतू केंद्राशी भागीदारी. विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी महिंद्र इलेक्ट्रिक मोबिलिटी ने जनसेवा सीएससी सेतू केंद्राशी भागीदारी ची घोषणा केली आहे ग्रामीण भागातील ग्राहकांना ट्रीओ व अल्फा ही ई- वाहने उपलब्ध होऊन ग्राहकाची मोठी बचत शक्य होऊन जीवनमान उंचावेल.
पीक कर्जाबाबत वाणिज्य बँकांचे योगदान चिंताजनक.
भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर ची आयपीएलच्या आगामी हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाच्या प्रशिक्षक पदी नेमणूक करण्यात आली आहे.
भारत-श्रीलंका यांच्यात आज पहिला ट्वेंटी-ट्वेंटी सामना होणार, दावेदार रांची चाचपणी होणार.
चेल्सीचा दमदार विजय यु व्हेंटसची बरोबरी गतविजेत्या चेल्सी ने चॅंपियन्स लीग फुटबॉल मध्ये दमदार विजयाची नोंद केली आहे.
लसीकरणाचा वेग मंदावला, करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याचा परिणाम दिसत आहे.
मुंबईत विद्युत वाहन कक्ष पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण 2027 पूर्वी 100% विद्युत बसेस धावणार.
मुंबईत विद्युत वाहन कक्ष पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण 2027 पूर्वी 100% विद्युत बसेस धावणार.
..........................................................................................................................................
24/02/2022 आजच्या दैनंदिन चालू घडामोडी / MARATHI DAILY CURRENT AFFAIRS Prashn Uttre / ESTUDYCIRCLE
.............................................................................................................................................
अलीकडे कोणत्या देशाने देशव्यापी आणीबाणी जाहीर केली आहे?
उत्तर - रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईनंतर युक्रेनने देशव्यापी आणीबाणी जाहीर केली आहे.
कोणत्या राज्याने आपल्या अर्थसंकल्पात जुनी पेन्शन बहाल करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर - राजस्थान
अलीकडेच IDBI बँकेचे MD आणि CEO कोण बनले आहे?
उत्तर- राकेश शर्मा
केंद्र सरकारने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान योजनेला किती काळासाठी मुदतवाढ देण्याची घोषणा केली आहे?
उत्तरः 31 मार्च 2026 पर्यंत
युरोपियन युनियन आणि अमेरिकेने कोणत्या देशावर पहिल्या टप्प्यातील आर्थिक निर्बंध लादले आहेत?
उत्तरः रशिया
भारत देशाबाहेर आपली पहिली IIT कोणत्या देशात स्थापन करणार आहे?
उत्तर - संयुक्त अरब अमिराती