25 FEB 2022 च्या चालू दैनंदिन घडामोडी - Daily Marathi Current Affairs eStudycircle MPSC SSC RRB TALATHI MIDC EXAM
युद्ध पेटले! रशियाच्या हल्ल्यात युक्रेन चे 74 लष्करी तळ उध्वस्त चाळीस सैनिकांसह 50 ठार. रशिया युक्रेन युद्धाची भीती अखेर खरी ठरली रशियाने गुरुवारी युक्रेन वर चौफेर हल्ले केले त्यात चौऱ्याहत्तर लष्करी तळ उध्वस्त झाले असून चाळीस सैनिकांसह दहा नागरिक ठार झाले.
या युद्धाचा निषेध करत पाश्चात्य देशांनी रशियावर आणखी निर्बंध लागू करण्याची घोषणा केली असून या घडामोडींमुळे युद्धाचा झाकोळ जगभर पसरला आहे.
रशियाचे कृत्य आहे नाझी जर्मनीने दुसऱ्या महायुद्धादरम्यान केलेल्या हल्याण प्रमाणे आहे पण युक्रेन चे नागरिक या हल्ल्याचा प्रतिकार करतील अखेरपर्यंत लढून आणि युक्रेन चे स्वातंत्र्य अबाधित राखू. युक्रेन चे अध्यक्ष व्होलोव्दिमिर झेलेन्सकी.
बाजारात हल्लाकल्लोळ.. गुंतवणूकदारांना 13 .44 लाख कोटींचा फटका, रुपया घसरला खनिज तेल 103 डॉलरवर तर सोने 52 हजार च्या पुढे.
भारतीय विद्यार्थ्यांची पालखीसाठी हाक सर्व भारतीय एकमेकाच्या संपर्कात आम्ही भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहोत . एअर इंडियाची विमाने उपलब्ध करून देणे बाबत त्यांनी पुढाकार घेतला आहे. युक्रेन मधील भारतीय विद्यार्थी.
बारावीचे दोन पेपर लांबणीवर. प्रश्नपत्रिका नष्ट झाल्याचा परिणाम, वेळापत्रकात अंशतः बदल.. प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या गाडीला आग लागल्याने 25 विषयांच्या प्रश्नपत्रिका नष्ट झाल्यात त्यामुळे आता राज्यभरासाठीच नव्या प्रश्न पत्रिका तयार करावे लागतील.
ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार.
आयपीएल साखळी सामने 26 मार्च पासून महाराष्ट्रात होणार असून स्टेडियम मध्ये प्रेक्षकांना परवानगी मिळेल.
भारताचा श्रीलंकेवर विजय श्रीलंकेवर 62धावांनी मात.
आरटीई प्रवेशाच्या जागांमध्ये घट. राज्यातील 9000 शाळांनी नोंदणी केली आहे. शिक्षण हक्क कायद्याच्या अंतर्गत आर टीई पंचवीस टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने आर टी ई प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून प्रवेशासाठी राज्यातील नऊ हजार 69 शाळांनी नोंदणी केली आहे. राज्यात आर टी ई च्या 1 लाख 1853 जागा असून त्यापैकी आतापर्यंत 1 लाख 630 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत.
राज्याचे कृषी निर्यात धोरण आज पुण्यात जाहीर होणार धोरणात्मक बाबीला केंद्राच्या सूचना. पणन मंत्री बाळासाहेब पाटील.
पंजाब मध्ये त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येणार? अकाली आम आदमी पार्टी हातमिळवणी करण्याची शक्यता.
राज्यात 11 कोटी 37 लाख लिटर इथेनॉल तयार यंदाच्या गाळप हंगामात साखर कारखाने कडून हंगामाच्या मध्यापर्यंत 11 कोटी 37 लाख लिटर इथेनॉल चे उत्पादन झाले आहे. केंद्र सरकारने राज्याला इथेनॉलचे 90 कोटीं लिटर चे उद्दिष्ट दिले आहे.
टीईटी घोटाळ्याने तीन महिने उलटूनही निकष लागेना, दोन लाख विद्यार्थी अडचणीत नोकरीसाठी अर्ज ही करता येत नाही.
---------------------------------------------------------------------------------------------------------
आजच्या दैनंदिन चालू घडामोडी / MARATHI DAILY CURRENT AFFAIRS Prashn Uttre / ESTUDYCIRCLE
.............................................................................................................................................
अलीकडे कोणत्या देशाने देशव्यापी आणीबाणी जाहीर केली आहे?
उत्तर - रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईनंतर युक्रेनने देशव्यापी आणीबाणी जाहीर केली आहे.
कोणत्या राज्याने आपल्या अर्थसंकल्पात जुनी पेन्शन बहाल करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर - राजस्थान
अलीकडेच IDBI बँकेचे MD आणि CEO कोण बनले आहे?
उत्तर- राकेश शर्मा
केंद्र सरकारने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान योजनेला किती काळासाठी मुदतवाढ देण्याची घोषणा केली आहे?
उत्तरः 31 मार्च 2026 पर्यंत
युरोपियन युनियन आणि अमेरिकेने कोणत्या देशावर पहिल्या टप्प्यातील आर्थिक निर्बंध लादले आहेत?
उत्तरः रशिया
भारत देशाबाहेर आपली पहिली IIT कोणत्या देशात स्थापन करणार आहे?
उत्तर - संयुक्त अरब अमिराती