दैनिक चालू घडामोडी मराठी - 27 फेब्रुवरी 2022 - Marathi Daily Current Affairs - estudycircle
27/02/2022 च्या चालू दैनंदिन घडामोडी
युद्ध बळींची संख्या 198 रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी किव्ह चा नाजिक पोहचले. मी झुकणार नाही युक्रेन च्या जेलेन्सकी चे रशियाला प्रत्युत्तर अति शास्त्र घेऊन नागरिकांनी केला सामना. आम्ही रशिया समोर कदापीही चुकणार नाही अशी रणगर्जना यांचे राष्ट्राध्यक्षांनी केली आहे. रशियाचा मुकाबला करण्यासाठी युक्रेन च्या भूमीवर पाय रोवून आहे. मी कुठेही पळून गेलेलो नाही असा संदेश लष्करी गणवेशातील युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला संदेश दिला. युक्रेनची राजधानी कीव्ह च्या परिसरात असंख्य नागरिक हाती शस्त्र घेऊन रशियन सैनिकांशी लढत आहेत. जेलेनस्की म्हणाले की आम्ही युक्रेन चे प्राणपणाने रक्षण करू शस्त्रे हेच आमचे सामर्थ्य आहेत.
युनोतील ठरावाला रशिया चा व्हेटो: तर भारत तटस्थ.
फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांवर गुन्हा 22 जणांचे फोन टॅपिंग: पाच ते सहा राजकीय व्यक्तींचा यात समावेश. पुणे येथे पोलीस आयुक्त असताना बेकायदेशीरपणे फोन टॅप केल्याप्रकरणी तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुकला यांच्यावर भारतीय तार अधिनियम कलम 26 अन्वये बँड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपीचंद सानप ने परीक्षार्थींना केले एकत्र आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरण: पोलीस तपासात निष्पन्न. आरोग्य विभागाच्या गट ड च्या परीक्षेच्या पेपर साठी गोपीचंद सानप याने विद्यार्थ्यांना पुण्यातील शिरूर येथे एकत्र आणले असल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे.
सुधारलेले राहणीमान एसटी जातीच्या प्रमाणपत्राला अपात्र ठरवत नाही. जात नाही ती जात: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निकाल.
बीट कॉइन सारखे क्रिप्टो चलन भारतात वैध की अवैध याबाबत भूमिका स्पष्ट करा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारला दिले आहेत.
डॉ. भूषण पटवर्धन नॅक च्या अध्यक्षपदी महाराष्ट्रातील दुसरे व्यक्ती. सोळा वर्षानंतर प्रथमच राज्याला मान मिळाला आहे. नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिदिटेशन कौन्सिल च्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी विद्यापीठ अनुदान आयोगाने यूजीसी चे माजी उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मराठा समाज आरक्षणासाठी संभाजी राजेंचा पुन्हा एल्गार आझाद मैदानावर उपोषण सुरू. माझा लढा हा गरीब मराठ्यांसाठी खासदार संभाजीराजे भोसले यांचे प्रतिपादन.
शिक्षकाने विद्यार्थ्यांना मारल्यास मुख्याध्यापकाला जबाबदार धरले जाऊ शकत नाही नागपूर खंडपीठाचा निर्णय शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल होणार.
एल आय सी या योजनेत 20 टक्के परकीय चलन गुंतवणुकीला मंजुरी. परकीय गुंतवणूकदारांना घेता येणार आई पी ओ चा लाभ.
भारताने वेस्टइंडीज पाठोपाठ श्रीलंके विरुद्ध ची ट्वेंटी-ट्वेंटी मालिका देखील जिंकली. भारताचा श्रीलंकेवर दुसऱ्या सामन्यात सात गडी राखून विजय. श्रेयस चे नाबाद अर्धशतक. सलग अकरावा विजय. मायदेशात पाठोपाठ सातवी मालिका जिंकली.
खाजगी संस्थांनी वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात उतरावे नरेंद्र मोदींचे आवाहन. वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक जमीन खाजगी संस्थांना मिळावी, भाशिक अडथळा असतानाही भारतीय विद्यार्थी हे मोठ्या संख्येने छोट्या छोट्या छोट्या देशात वैद्यकीय शिक्षणासाठी जात आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील खाजगी संस्थांनी मोठ्या प्रमाणात वैद्यकीय क्षेत्रात उतरावे असे आव्हान पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
मराठी भाषेचा अभिजात दर्जा गुजराती ने रोखला? दर्जाप्रक्रिया मोडीत काढण्याचा केंद्राचा विचार. पुढील मराठी भाषा दिनानिमित्त मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी अपेक्षा दरवर्षी मराठी भाषा दिनी राज्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात असली तरी मराठी भाषेला दर्जा मिळण्यात गुजराती भाषेचा अडसर ठरत असल्यानेच केंद्राकडून हात आखडता घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यातील ग्रंथालय ही अनुदानाच्या प्रतीक्षेत. दोन वर्ष खंड कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ.
current affairs