26/02/2022 च्या चालू दैनंदिन घडामोडी // Daily Current Affairs Marathi 26- February 2022
युक्रेन शरण आला तरच चर्चा.. पुतीन यांचे मत. रशियाचे सैन्य युक्रेनचा राजधानीकडे, रशियन सैन्याची आगेकूच सुरूच असून शुक्रवारी युक्रेनची राजधानी किव्ह या भागात क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले तसेच कीव्ह मध्ये स्फोटांचे आवाज होत असून नागरिकांचे स्थलांतर होत आहे. तसेच एका विमानतळावर ताबा घेण्यात आला आहे.
भाजपचे राजकारण देशांनी लोकशाहीसाठी आणि कारक लोकसत्ताच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांचे परखड मत.
हिजाब प्रकरणातील या चिकन वरील निर्णय राखीव. कर्नाटक मधील शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थिनीना हीजाब परिधान करण्यास मनाई करण्याचे आव्हान दिलेल्या याचिकेवरील निर्णय शुक्रवारी कर्नाटक उच्च न्यायालयाने राखून ठेवला असून याप्रकरणी आधी अकरा दिवस सुनावणी झाली आहे.
16000 भारतीयांना सरकार युक्रेनमधून स्वखर्चाने भारतात आननार.
तट रक्षक दलासाठी जी एस एल प्रदूषण नियंत्रण यांची निर्मिती करणार. भारतीय तटरक्षक दलात लवकरच प्रदूषण नियंत्रण जहाजे दाखल होणार आहेत. गोवा शिपयार्ड लिमिटेड ने जी एस एल या जहाजांच्या निर्मितीला सुरुवात केली आहे.
केंद्र आणि राज्य समन्वयातून देशाची प्रगती, दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील शांतता भंग झाली नाही. मात्र नुकत्याच घडलेल्या काही घटनांमुळे जागतिक शांतता धोक्यात आली आहे. या घटनांमुळे भारताच्या विकासाला अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीतही शांतता प्रस्थापित ठेवण्याचे प्रयत्न सुरू झाल्यास शाश्वत पुनरुज्जीवन होईल. निर्मला सीतारमण केंद्रीय मंत्री.
रूपधर जीवन गौरव पुरस्कार रवी परांजपे यांना, दि बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांना रूपधर हा चित्रकला क्षेत्रातील प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये मानपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
आरोग्य भरती प्रश्नपत्रिका प्रकरणात वीस आरोपींवर दोषारोपण.
युक्रेनमध्ये भातापेक्षा अर्ध्या खर्चात वैद्यकीय शिक्षण उपलब्ध असल्याने युक्रेनमध्ये वीस हजारांवर भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची बाब समोर आल्याने यातील सरासरी 80 टक्के विद्यार्थी हे वैद्यकीय शिक्षणासाठी गेली असल्याचे समजते.
एसटी मागण्यांबाबत चा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवा उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश.
वृत्तपत्रांमध्ये अन्नपदार्थ बांधून देण्यास बंदी आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे आदेश.
पोलीस शिपाई यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होणार! निर्णयावर मुख्यमंत्र्यांचे शिक्का मोर्तब’दलाच्या बळकटी करण्यास चालना देणार असून अधिकाऱ्यांवरही ताण कमी होईल. या निर्णयामुळे पोलीस दलांवर व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील पदांची संख्या वाढेल अधिकाऱ्यांवरील ताण कमी होईल कसा विश्वास गृहमंत्री श्री दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केले आहे.
मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र मागासवर्ग आयोग मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय.
फाईव्ह जी सेवेला स्वातंत्र्य दिना चा मुहूर्त? देशात चालू वर्षात 15 ऑगस्ट पर्यंत फाईव्ह जी सेवा सुरू करण्याच्या दिशेने पावले टाकली जावीत असा पंतप्रधान कार्यालयाचा माणस आहे.
कृषी निर्यात वाढीसाठी राज्यात 21 पीकनिहाय केंद्र महाराष्ट्राला कृषी निर्यातीचे प्रमुख केंद्र म्हणून तयार करून राज्याचे कृषी निर्यात धोरण जाहीर झाले आहे.
आयपीएल मध्ये रंगणार 74 सामन्यांच्या थरार, दहा संघाचे दोन गटात विभाजन, 26 मार्च ते 29 मे दरम्यान सामन्याचे आयोजन होणार.
सारथी पुणे करणार विभागातील वसतिगृहाची स्थापना, विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार बाबत प्रशिक्षण देणार.
——————————————————————————-
Current Affairs Marathi Prashn Uttre–
UAE मध्ये कोणता देश पहिला IIT स्थापन करेल?
उत्तर >> भारत
नुकताच केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – 24 फेब्रुवारी
नुकताच जागतिक विचार दिन कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – 22 फेब्रुवारीला
बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर – तनिष्का कोटिया, रिधिका कोटिया
रिलायन्स जिओची नवीन सबसी केबल ‘भारत एशिया एक्सप्रेस’ कोणत्या देशाला जोडेल?
उत्तर : मालदीव
नुकतेच दुसऱ्या “बांगलादेश चित्रपट महोत्सवाचे” उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : आगरतळा
नुकतेच IOC च्या बोर्डात कोण सामील झाले आहे?
उत्तर – सुजॉय चौधरी
IIT रुरकीने किसान मोबाइल अॅप कोठे सुरू केले आहे?
उत्तर – उत्तराखंड
IDBI बँकेचे नवीन MD आणि CEO कोण बनले आहे?
उत्तर – राकेश शर्मा