5 नैसर्गिक गोष्टींनी केस काळे करा, जाणून घ्या घरगुती केसांचा रंग कसा बनवायचा
वाढत्या वयाबरोबर केस पांढरे होणे सामान्य गोष्ट आहे, परंतु वयाच्या 25 व्या वर्षी जर तुमचे केस पांढरे होऊ लागले असतील तर काळजी करणे स्वाभाविक आहे. केस पांढरे होण्याची अनेक कारणे असू शकतात. हे सहसा पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे आणि कधीकधी अनुवांशिक कारणांमुळे केस पांढरे होते. पण तंबाखूचा अतिवापर, धूम्रपान आणि मानसिक ताण हे देखील कारण असू शकतात. पांढऱ्या केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय देखील आहेत, ज्याचा तुम्ही अवलंब करू शकता.या लेखात आपण काही सोप्या व प्रभावी घरगुती केस काळे करण्याची पद्धत उपाय पाहणार आहोत
आवळा:-
कृती : आवळ्या ची गुटली काढून टाका व नन्तर त्याची पेस्ट बनवून डोक्याला लावा. केसांच्या मुळांवर मसाज करा.
कृती : खोबरेल तेलात कढीपत्ता टाकून ते तडतडेपर्यंत गरम करा. त्यानंतर ते गाळून केसांना मसाज करा. सुमारे 30-45 मिनिटांनी आपले डोके धुवा. आठवड्यातून दोनदा ही प्रक्रिया करा.
काळा तीळ:-
पांढरे केस काळे करण्यासाठी देखील हे खूप उपयुक्त आहे.कृती : कच्चे तीळ दररोज रिकाम्या पोटी पाण्यासोबत खाल्ल्यास फायदा होईल.
कृती: अर्धा कप कोरडी मेंदी आणि तमालपत्र दोन कप पाण्यात मिसळून उकळवा. हे मिश्रण काही वेळ तसेच राहू द्या. आता ते गाळून घ्या आणि शॅम्पूने केस धुतल्यानंतर त्यावर चांगले लावा. 15-20 मिनिटांनी केस पुन्हा धुवा. हे दर आठवड्याला करा.
कांद्याची पेस्ट
कांद्याची पेस्ट मुळे केसांना पोषण मिळते.
कृती : कांद्याची पेस्ट केसांना लावा. तासाभरानंतर धुवून टाका. असे केल्याने पांढरे केसही काळे होतील.