शनिवार दिनांक 19/02/2022 च्या चालू घडामोडी Current Affairs in Marathi – GK in Marathi – सामान्य ज्ञान 19-02-2022
630 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 392 वि जयंती. विनम्र अभिवादन! शिवाजी महाराज हे भारतातील हजारो वर्षात निर्माण झालेले महान राजे होते. ज्यावेळी आपल्या समाजाला आणि धर्माला धोका निर्माण झाला होता त्यावेळी त्यांनी समाजाला आणि धर्माला वाचविण्याचे महत्वपूर्ण कार्य केले. भारताच्या अस्मितेचे यथार्थ प्रतीक असणारा भारत भूमी चा खराखुरा पुत्र म्हणून शिवाजी महाराजांचा नामोल्लेख करावा लागेल आज ना उद्या भविष्यातील भारत कसा असेल अनेक स्वतंत्र राज्य एका सार्वभौम छत्राखाली कशी एकत्र येतील याचे स्पष्ट चित्र दाखवणारे ते एक द्रष्टे राजे होते.
श्री स्वामी विवेकानंद….
1915 महात्मा गांधींचे राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले यांचा आज स्मृतिदिन.
बुलेट ट्रेन प्रकल्पाला सर्वाधिक प्राधान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन.
अहमदाबाद येथे झालेल्या 2008 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील 38 दोषींना विशेष न्यायालयाने शुक्रवारी फाशीची शिक्षा तर अकरा जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली या बाँबस्फोटात 56 जणांचा बळी गेला होता आणि दोनशे नागरिक जखमी झाले होते.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा सीएए विरोधी आंदोलनात झालेल्या सार्वजनिक मालमत्तेच्या भरपाईसाठी आंदोलकांना बजावलेल्या 274 वसुली नोटिसा सर्वोच्च न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने मागे घेतल्या आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदी रजनीश सेठ नवे पोलिस प्रमुख.
दाऊद इब्राहिम चा भाऊ इक्बाल कासकर ला मनी लॉंडरिंग प्रकरणात ईडी कडून अटक.
आदिवासींच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी सरकारने केलेल्या पेसा कायद्याला पंचवीस वर्ष झाली परंतु या कायद्याची अंमलबजावणी सरकारी यंत्रणेच्या हेतू वरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेचा सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर जी डी पी आर्थिक वर्ष 2021- 2022 मधील ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीत 5.8 टक्के राहील भारतीय स्टेट बँकेच्या अहवालात व्यक्त.
वातानुकूलित यंत्रांच्या ए सी निर्मितीतील जागतिक अग्रणी डायकिन इंडियाने आत्मनिर्भर भारत मोहिमेत सहभागी होत आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथे निर्मिती प्रकल्पासाठी एक हजार कोटींची गुंतवणूक केली आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात भारताचा विंडीजवर आठ रन्सने विजय .
शनिवार दिनांक 19/02/2022 च्या चालू घडामोडी Current Affairs in Marathi Prashn Uttre
ठाणे-दिवा रेल्वे मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते कधी झाले?
उत्तर – 18 फेब्रुवारी
मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पाचा भाग असलेला ठाणे-दिवा रेल्वे मार्ग किती कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला?
उत्तर – 620 कोटी
देशातील पहिल्या मोबाईल बायोसेफ्टी लॅबचे उद्घाटन कोठे करण्यात आले?
उत्तर – नाशिक
मोबाईल बायोसेफ्टी लॅब कोणी मिळून तयार केली आहे?
उत्तर – इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अँड बायोसेफ्टी इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर क्लीनझाइड्स
अलीकडेच, कोणत्या राज्यातील जिल्हा जल जीवन मिशनमध्ये सामील होणारा 100 वा जिल्हा ठरला आहे?
उत्तर – हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्हा
महाराष्ट्राचे नवे DGP म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
उत्तर – आयपीएस अधिकारी रजनीश सेठ
नवे डीजीपी म्हणून निवड झालेले रजनीश सेठ कोणाच्या जागी नियुक्त केल्या गेले ?
उत्तर – संजय पांडे
मुंबई राजभवनात नुकतेच दरबार हॉलचे उद्घाटन कोणी केले?
उत्तर – राष्ट्रपतींद्वारे