Current Affairs In Marathi (चालू घडामोडी मराठी )
- २१ फेब्रुवारी २०२२
27 फेब्रुवारी च्या मराठी भाषा दिनाआधी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी नामवंत लेखक विचारवंत आणि मराठी कलाकार यांच्या स्वाक्षरीचे पत्र केंद्र सरकारला देण्यात येणार आहे सुभाष देसाई मराठी भाषा मंत्री.
संपकाळात एसटीचे 1600 कोटींचे नुकसान प्रवाशांचे हाल कायम उद्या उच्च न्यायालयात सुनावणी असून बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या नऊ हजार 251 आहे.
मुद्रा कर्ज योजनेत राज्यात महिला खातेदारांची संख्या लक्षणीय आहे तीन वर्षात 90 लाख महिला खातेदारांना 38 हजार कोटींचे अर्थसाह्य. महिलांना उद्योग क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी तसेच त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी ही योजना प्रभावी साधन ठरले आहे. महिलांना व्यवसाय सुरू करावयाचा म्हंटले किंवा व्यवसायात अधिक गुंतवणूक करायची म्हटले तर भांडवल प्रमुख समस्या असते या योजनेमुळे हा अडसर दूर झाला व त्याचा फायदा महिला सक्षमीकरण यासाठी झाला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव यांच्यात आंतरराज्य प्रश्नावर चर्चा. महाराष्ट्र बरोबर तेलंगणाची सुमारे 1000 किलोमीटरची सीमा असून राज्याचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकार्याची अपेक्षा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी केली असता महाराष्ट्राच्या सख्या शेजाऱ्याला जलसंपदा, उद्योग आणि पायाभूत सुविधा संबंधित क्षेत्रात सहकार्य करण्याची ग्वाही मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
महा ज्योतीच्या ऑनलाइन कोचीनचा फज्जा... अकरावी विज्ञान शाखेच्या बारा हजार विद्यार्थ्यांचे अर्ज. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महा ज्योतीने जेईई आणि नीट चे ऑनलाइन कॉचींग तीन महिन्यापासून सूर गेले परंतु त्यासाठी आवश्यक टॅब आणि इंटरनेट डेटा उपलब्ध न केल्याने ग्रामीण भागातील तसेच गरीब विद्यार्थी या निशुल्क कोचिंग पासून वंचित राहत आहेत.
निधी असूनही स्वाधार योजनेचे विद्यार्थी लाभापासून वंचित राहत आहेत. ज्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना पात्र असूनही समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाहीत अशा विद्यार्थ्यांना भोजन निवास व निर्वाहभत्ता देता यावा म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जाते.
युक्रेन सीमेवर तणाव कायम.. नेपाळमध्ये अमेरिकेच्या अधिक मदत योजनेला विरोध संसदेत प्रस्ताव पण काठमांडूच्या रस्त्यावर निदर्शने होत आहेत.
सेंद्रिय कापसाच्या उत्पादनावर राष्ट्रीय शिखर परिषद मंथन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व स्वीस लँड येथील सेंद्रिय संशोधन संस्थेचा उपक्रम.
राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेचे आज उद्घाटन चंद्रपूर येथे केंद्रावर एकूण आठ नाटके सादर होणार.
भारताचा वेस्ट इंडिजला पुन्हा एकदा क्लीन स्विप भारताने अखेरच्या सामन्यात वेस्टइंडीज चा 17 धावांनी पराभव करत तीन सामन्याची टी-ट्वेंटी मालिका जिंकली.
केंद्रीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांची अकरा हजार पदे रिक्त महाराष्ट्र राज्यात सुद्धा दहा हजार पदे रिक्त आहेत.
राज्य कामगार विमा योजना गुंडाळण्याच्या हालचाली कामगारांसाठी मेडिक्लेम चा पर्याय संकलन निधी कपात करून 6.5 टक्क्यांवरून चार टक्क्यांपर्यंत. कामगार आणि मालक यांच्या योगदानातून जमा झालेल्या निधीतून डी एस आय योजना सुरू झाली. कुठल्याही औद्योगिक क्षेत्रात व्यापार क्षेत्रात दहा टक्क्यांपेक्षा जास्त कामगार असतील तिथे ही योजना लागू होते.
----------------------------------------------------
Current Affairs In Marathi Prashn Uttre - (चालू घडामोडी मराठी प्रश्न उत्तरे )
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर - 21 फेब्रुवारी
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 2022 ची थीम काय आहे?
उत्तर - बहुभाषिक शिक्षणासाठी तंत्रज्ञान वापरणे "आव्हान आणि संधी"
तुंगभद्रा आरतीची घोषणा नुकतीच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली ?
उत्तर - कर्नाटक
हरिहर, कर्नाटक येथे तुंगभद्रा आरती प्रकल्पाचा एक भाग म्हणून किती योग मंटपांच्या बांधकामाची पायाभरणी झाली?
उत्तर - 108
इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचे नवीन संचालक म्हणून कोणाची निवड झाली आहे?
उत्तर - चेतन घाटे
इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचे संचालक अजित मिश्रा यांच्या जागी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर - चेतन घाटे
उत्तर - चेतन घाटे
गेमिंग अॅप A23 चा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
उत्तर - शाहरुख खान
दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022 पुरस्कार कधी आयोजित करण्यात आला?
उत्तर - 20 फेब्रुवारी
दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला देण्यात आला?
उत्तर - रणवीर सिंग