03/03/2022 आजच्या चालू दैनंदिन घडामोडी – Current Affairs Marathi 03-March-2022
अनुयुद्ध झाल्यास दहा कोटी मृत्यू? रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी दिला गंभीर इशारा. तिसरे महायुद्ध हे अनु युद्ध असेल हे सर्वांनीच नीट लक्षात ठेवावे. तिसरे महायुद्ध झाले असते अनु युद्ध असेल. त्यात महाभयंकर विनाश होईल अशी धमकी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लावरोव्ह यांनी अमेरिका व पाश्चिमात्य राष्ट्रांचे नाव न घेता त्यांना दिली आहे. युक्रेन च्या युद्धामुळे रशिया व पाश्चिमात्य देशांत प्रचंड प्रमाणात तणाव वाढला आहे.
रशियाच्या विमानांना अमेरिकेची बंदी. अमेरिकेने रशियाच्या विमानांना आपली हवाई हद्द बंद केली आहे. तसेच युक्रेनमध्ये अमेरिका सैन्य पाठविला नाही. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्यासारख्या हुकुम शहाला आपल्या गैर कृत्याची किंमत चुकवावी लागेल. जो बायडेन, राष्ट्राध्यक्ष अमेरिका.
भारतीयांसाठी सर्वतोपरी प्रयत्न युक्रेनमधून सर्व भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. विशेष अडचणी न येता युक्रेनमधील भारतीयांना परत आणले जात आहे. याकामी भारतीय लष्कर, हवाई दल ही मदत करत आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान.
राज्यात कोरोना चा शून्य मृत्यू. कोरोणा च्या पहिल्या लाटे नंतर म्हणजेच 1 एप्रिल 2020 नंतर बुधवारी राज्यात पहिल्यांदाच शून्य मृत्यूची नोंद झाली त्याचप्रमाणे सकारात्मक बाब म्हणजे राज्य शासनाने निर्बंध मुक्तीकडे आणखी एक पाऊल टाकले आहे.
एसटी चे विलिनीकरण फेटाळले, मंत्रिमंडळाचे ही शिक्कामोर्तब. राज्य सरकारच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने एसटी महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलीनीकरण करू नये असा स्पष्ट अहवाल दिला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत अहवालास मान्यता देण्यात आली.
युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणाचा मार्ग बंद. युक्रेन मधून परतनाऱ्याना आता भारतात वैद्यकीय शिक्षण: अमित देशमुख. पुढील वर्षापासून नॉन इंग्लिश कंट्रीज मध्ये जाता येणार नाही असे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे त्यामुळे आपोआपच स्वस्तातील वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी भारतातून युक्रेन मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग बंद होणार आहे. परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांना 2023 पासून नॅशनल एक्झिट एक्झाम द्यावी लागणार आहे.
जागतिक विद्यापीठा सोबत विद्यार्थ्यांना कामाची संधी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय साहचर्य या केंद्राची स्थापना.
मुंबई विद्यापीठाच्या सर्व विद्यार्थ्यांना आता जागतिक दर्जाच्या विद्यापीठांची सहकार्य करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत सामंजस्य आणि भागीदारी देखील प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विद्यापीठाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी सहकार्य केंद्राची स्थापना करण्यात आली आहे या केंद्राच्या स्थापनेमुळे प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठ तसेच संस्थांसह आंतरराष्ट्रीय संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी ध्येयधोरणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे अधिक सोयीचे होणार आहे.
सीएनजी नेटवरचे गेटवे ठरेल औरंगाबाद शहर. पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी.
आयपीएल संघाचे सराव सामने 14 मार्च पासून मुंबईत होणार.
ग्रँड मास्टर दिव्या देशमुख राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियन. सोळा वर्षाची विदर्भ कन्या प्रतिभावान बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने बुद्धिबळ स्पर्धेच्या विजय विजेतेपदाचा मान पटकाविला. महिला ग्रँडमास्टर दिव्या देशमुख ही विदर्भाची पहिलीच वरिष्ठ राष्ट्रीय चॅम्पियन आहे.
ऑनलाईन पदवी अभ्यासक्रमामध्ये आठ पट वाढ. देशभरातील उच्च शिक्षण संस्थातील ऑनलाईन पदवी अभ्यासक्रमामध्ये गेल्या वर्षभरात जवळपास आठ पट वाढ झाली आहे. 2020 मध्ये केवळ 50 पदवी अभ्यासक्रम ऑनलाइन उपलब्ध होते तर 2022 मध्ये ही संख्या 375 अभ्यासक्रमांवर पोहोचल्याचे दिसून येत आहे.
एसटीचे दहा हजार कर्मचारी बडतर्फ
…………………………………………………………………………………………
Chalu Ghadamodi Prashn Uttre 03 March 2022
आंतरराष्ट्रीय मान्सून प्रकल्प कार्यालय कोठे सुरू करण्यात आले?
उत्तर – IITM पुणे
सीएम स्टॅलिन यांचे ‘अंग्लिएल ओरुवन’ हे आत्मचरित्र कोणी प्रकाशित केले? ,
उत्तर – राहुल गांधी
कोणती संस्था राष्ट्रीय लिंग निर्देशांक विकसित करत आहे?
उत्तर – नीती आयोग
आंतरराष्ट्रीय महिला दिन सप्ताह कधी साजरा केला जातो?
उत्तर : 1 ते 8 मार्च
फिरकीपटू सनी रामाधीन यांचे नुकतेच निधन झाले, तो कोणत्या देशाचा आहे?
उत्तर : वेस्ट इंडिज
जागतिक NGO दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर – 27 फेब्रुवारी
HUL ने नुकतेच गैर-कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली आहे? ,
उत्तर – नितीन परांजये
अलीकडेच पोलिओ राष्ट्रीय लसीकरण दिवस 2022 कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला?
उत्तरः २७ फेब्रुवारी रोजी