04/03/2022 चा दैनंदिन घडामोडी - CHALU GHADAMODI 04 MARCH 2022
ओबीसी आरक्षणाचा पेच कायम. मागासवर्ग आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीयांचे 27 टक्के आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी शिफारस करणारा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळला यामुळे ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा पेच कायम आहे.
एकही भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये नाही. रशियाच्या दाव्याचे भारताकडून खंडन. युक्रेनमध्ये कोणताही भारतीय विद्यार्थी युक्रेनच्या सैन्याकडून ओलीस ठेवला नसल्याचा निर्वाळा भारताकडून देण्यात आला आहे.
बारावीची परीक्षा आजपासून. परीक्षार्थींनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे काळजी करण्याचे काही कारण नाही पालकांनी परीक्षा केंद्रावर गर्दी करू नये. मुलांना मानसिक आधार द्यावा. श्री वसंत काळपांडे शिक्षण तज्ञ. कोरोना महामारीमुळे दोन वर्ष ऑफलाइन परीक्षा होऊ शकली नाही. यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होत आहेत आज पासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे.
अभूतपूर्व: अवघ्या तीन मिनिटांचे अभिभाषण. राज्यपाल आले अन गेले. विधिमंडळ सदस्यांच्या जोरदार गोंधळात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे अवघ्या तीन मिनिटांचे अभिभाषण करून सभागृहाबाहेर पडल्याचा अभूतपूर्व प्रसंग विधिमंडळ अधिवेशनात गुरुवारी घडला त्यावरून सत्ता पक्ष आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.
पुण्यात पहिल्यांदाच लोकसंख्या दर्शक घड्याळ, गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेत स्थापना. पुण्यात प्रथमच दर्शन घड्याळ बसविण्यात आले आहे गोखले संस्थेत लोकसंख्या संशोधन केंद्र आहे. केंद्र सरकारच्या लोकसंख्या आणि आरोग्य विषयक विविध उपक्रमांसाठी एक केंद्र काम करते. त्याअंतर्गत लोकसंख्या दर्शक घड्याळ बसवण्यात येत आहे या घड्याळ द्वारे देशाची आणि महाराष्ट्रातील लोकसंख्या दर्शविले जाईल.
शाळा प्रवेशासाठी वय मर्यादा निश्चित. राज्यातील पूर्व प्राथमिक व प्राथमिक प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांची कमाल वय मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार खेड गटासाठी चार वर्ष पाच महिने 30 दिवस, कनिष्ठ गटासाठी पाच वर्ष पाच महीने तीस दिवस, वरिष्ठ गटासाठी सहा वर्ष पाच महिने 30 दिवस आणि पहिली साठी सात वर्षे पाच महिने 30 दिवस ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या वया पेक्षा अधिक वय असलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित वर्गाऐवजी पुढील वर्गात प्रवेश देण्याची सूचना शिक्षण विभागाने दिली आहे.
मुंबई - नागपूर बुलेट ट्रेन ला गती. सविस्तर प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे सादर. मुंबई ते नागपूर वाया नाशिक बुलेट ट्रेन प्रकल्पाला देण्यात येत आहे. या मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल पूर्ण झाला असून तो मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
टीईटी गैरव्यवहाराचे धागेदोरे दिल्लीपर्यंत. ऑनलाईन पेपर कसे फोडावेत त्याच्या विविध पद्धतीने बाबतचे प्रशिक्षण बिहार मधील पटना येथे दिले जात असल्याचे सायबर पोलिसांनी उघड केल्याचे नंतर आता सायबर पोलिसांनी टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट गैरव्यवहाराचा कट दिल्ली येथे असल्याची माहिती उघडकीस आली आहे.
युद्ध संपवण्यासाठी चर्चेची रशियाची तयारी. युक्रेनची लष्करी आधारभूत संरचना नष्ट करण्याचे प्रयत्न मात्र कायम. रशिया युक्रेन च्या चर्चेसाठी इस्त्रायली पंतप्रधानांचे प्रयत्न. युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी बोलणी करण्यास रशिया तयार आहे. मात्र युक्रेनची लष्करी आधारभूत संरचना नष्ट करण्यासाठी चे प्रयत्न सुरू राहतील असे रशियाचे परराष्ट्रमंत्री यांनी म्हटले आहे.
युक्रेनमधील युद्धात 227 नागरिक ठार तर 525 जण जखमी. एका आठवड्या पूर्वी सुरू झालेल्या रशियाच्या लष्करी आक्रमणात आतापर्यंत 227 नागरिक ठार तर 525 नागरिक जखमी झाले आहेत. असे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयाने म्हटले आहे.
ग्रामीण भागातील खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी खासदार क्रीडा महोत्सव, प्रारंभ धनुर्विद्या ने तर समारोप विदर्भ केसरी अजिंक्यपद स्पर्धेने होणार.
नागपूरच्या दिव्या देशमुख ला राष्ट्रीय जेतेपद, नागपुर मधील सोळा वर्षे दिव्या देशमुख ने 58 व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत महिला गटाचे जेतेपद पटकावले, किशोर वयातच राष्ट्रीय स्पर्धा जिंकणारी ती पाचवी बुद्धिबळपटू ठरली आहे.
महिला विश्वचषकाचे बिगुल आजपासून.
एल आय सी म्युच्युअल फंडाच्या प्रमुखपदी टी एस रामकृष्णन, एलआयसी म्युच्युअल फंडाने व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून टी एस रामकृष्णन यांच्या नियुक्तीची घोषणा सोमवारी केली.
..............................................................................................................
CHALU GHADAMODI 04 MARCH 2022 PRASHN UTTARE
दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षा दिवस कधी साजरा केला जातो?
उत्तर - 4 मार्च
अलीकडेच ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म “WinZo” चा नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - महेंद्रसिंग धोनी
"सागर परिक्रमा कार्यक्रम" नुकताच कोणी सुरू केला?
उत्तर - केंद्रीय मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला
नुकताच जागतिक NGO दिन कधी साजरा करण्यात आला?
उत्तरः २७ फेब्रुवारी
आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो?
उत्तरः ८ मार्च
ISSF विश्वचषक नेमबाजी कोणत्या भारतीय महिलांनी 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक जिंकले?
उत्तर – श्री निवेता, ईशा, रुचिता विनेरकर
दरवर्षी जागतिक वन्यजीव दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर - ३ मार्च
https://www.marathijobs.in/2022/03/03032022-current-affairs-marathi-03.html