11/03/2022 – चालू घडामोडी / Current Affairs 11 March 2022 In Marathi
भाजपाचीच लाट, बाकी भुईसपाट पुन्हा एकदा विजयी चौकार: पंजाबचा आप ला हात, काँग्रेसचा पाचही राज्यात धुवा. शेतकरी आंदोलन करोना हाताळणी, बेरोजगारी आदी मुद्द्यांवरून विरोधकांनी उभे टाकले ले आव्हान मोडीत काढून भाजपने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा विजय चौकार लगावला. उत्तर प्रदेशात प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवलेल्या भाजपच्या बुलडोझर ने विरोधकांना भुईसपाट केलेच, पण उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये सत्ता ही राखत पक्षाने आपलीच लाट कायम असल्याचे सिद्ध केले. पंजाबने काँग्रेसचा झाडू न धुवा उडवला. आप ने दिल्लीपाठोपाठ तिथेही एक हाती सत्ता मिळवून राष्ट्रीय राजकारणाच्या दिशेने घोडदोड केली. पक्षांतर्गत गटबाजी, नेत्यांच्या पक्षांतराने जेरीस आलेल्या काँग्रेसच्या आणि उत्तर प्रदेशात चार वेळा सत्तास्थानी राहिलेल्या बसप च्या अस्तित्वावर या निकालाने प्रश्नचिन्ह उभे केले. हा 2024 चा कौल: पंतप्रधान नरेंद्र मोदी.
राज्यातील 5706 महिलांना मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ मिळणार. महिलांना दस्त नोंदणीतून 40 कोटींची सूट. महिलेचे नावे सदनिका खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत राज्य सरकारकडून देण्यात आली होती यानुसार राज्यभरातील पाच 5706 महिलांनी सदनिका खरेदी करून या सवलतीचा लाभ घेतला आहे. राज्यात सर्वाधिक लाभ पुण्यातील 15 96 महिलांनी घेतला असून त्यापाठोपाठ मुंबई शहर आणि उपनगरातील 14 93 महिलांनी या सवलतीचा लाभ घेतला आहे.
मुलाखतीच्या दिवशीच एम पी एस सी कडून निकाल जाहीर. राज्याच्या आरोग्य सेवेतील अधिष्ठाता, उपसंचालक पदासह विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रिक्त असणाऱ्या प्राध्यापकांच्या अति विशेषीकृत 34 पदांची भरती प्रक्रियेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुलाखतीच्या दिवशीच निकाल जाहीर केला आहे, भरती प्रक्रिया गतीमान करण्यावर आयोगाचा भर असल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांनी दिली.
करोणा काळात खाजगी सावकारीत वाढ, कर्जदारांची संख्या 26 टक्के तर कर्जवाटपात टक्क्यांनी वाढ.
करोना काळात कर्जवाटपात सहकारी तसेच व्यापारी बँकांकडून होणाऱ्या आडकाठी मुळे अडचणीत सापडलेल्या लोकांना खाजगी सावकारी चा आधार घ्यावा लागला, त्यामुळे गेल्या वर्षभरात खाजगी सावकारांकडून कर्ज घेणाऱ्यांची संख्या तब्बल 26 टक्क्यांनी तर कर्जाचे प्रमाण 42 टक्क्यांनी वाढल्याचे खाजगी सावकारी ला सुगीचे दिवस आल्याचे आर्थिक पाहणीत समोर आले आहे.
राज्याची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर, विकास दर 12.1 टक्के अपेक्षित, कृषी क्षेत्रात 4.4 टक्के, उद्योग क्षेत्रात 19.9 टक्के तर सेवाक्षेत्रात 13.5 त्यांच्या वाढीचा अंदाज.
राज्याच्या शिक्षण आयुक्त पदी सुरज मांढरे. राज्याच्या शिक्षण आयुक्तपदी सुरज मांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मांढरे शिक्षण आयुक्तपदाची सूत्रे 11 मार्च पासून स्वीकारणार आहेत.
भारताचा पराभव न्युझीलँडचा सलग दुसरा विजय. सलामीवीरासह मधल्या फळीने केलेल्या सुमार कामगिरीमुळे भारतीय संघाला गुरुवारी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्युझीलँड कडून 62 धावांनी पराभव पत्करावा लागला.
कमी घनतेच्या प्लास्टिकचे जैवाविघटन करणाऱ्या बुरशीचा शोध. संपूर्ण जगाला सध्या प्लास्टिक प्रदूषणाचा प्रश्न भेडसावत आहे, हा प्रश्न निकाली काढण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मूळ विदर्भातील आणि सध्या भोपाळच्या सैफिया महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान विभागाचे प्रमुख असलेले प्राध्यापक डॉक्टर शारिक अथर अली यांनी केलेल्या संशोधनात पेनिसिलियम सायट्रेन या प्रजातीच्या बुरशीचा शोध लागला. ही बुरशी कमी घनतेच्या प्लास्टिकचे निम्मे जैवविघटन करते.
Chalu Ghadamodi Prashn Uttre
राज्याच्या शिक्षण आयुक्तपदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे?
सुरज मांढरे
10 मार्च रोजी पाच राज्यांचे निकाल जाहीर झाले, त्यात भारतीय जनता पक्षाने किती राज्यात विजय मिळवला?
उत्तर – 4 राज्यांमध्ये
उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाने किती जागा जिंकल्या?
उत्तर – 273 जागा
उत्तराखंडमध्ये भाजपने किती जागा जिंकल्या?
उत्तर – 48 जागा
अलीकडेच टी राजा कुमार यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे?
उत्तर – फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स
10 मार्च रोजी साहित्य महोत्सव “साहित्योत्सव” कोठे सुरू झाला?
उत्तर : नवी दिल्ली
साहित्य अकादमीतर्फे साहित्य महोत्सव “साहित्योत्सव” केव्हा होणार आहे?
उत्तर – 10 ते 15 मार्च