दैनिक चालू घडामोडी 2022 01 March Daily Current Affairs – March 01 2022
शांतता चर्चा सुरू, दोन शहरांवर रशियाचा कब्जा, आगेकुछ रोखण्यात युक्रेन ला काही प्रमाणात यश. भारतीयांच्या मदतीसाठी चार मंत्री युरोपकडे. राजस्थानी किव्हसह अन्य महत्वाच्या शहरांकडे होणाऱ्या रशियन सैन्याच्या घोडदौडिचा वेग कमी करण्यात या युक्रेन च्या सैन्याला काही प्रमाणात यश आले असले तरी रशियाच्या रॉकेट हल्ल्यात खाकिव्ह शहरात मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. दरम्यान युक्रेन आणि रशिया यांच्यात शांतता चर्चा सुरू झाली असून त्यातून काय निष्पन्न होते याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
विकास दरात घट ती माहितील अर्थवृद्धि 5.4 टक्के,: चालू वर्षासाठीचा अंदाज घसरून 8.9 टक्क्यांवर.
राज्याच्या मुख्य सचिव पदी मनुकुमार श्रीवास्तव. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव पदी मनुकुमार श्रीवास्तव यांची सोमवारी नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठतेनुसार मनुकुमार श्रीवास्तव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
मराठा समाजाला अतिरिक्त शंभर कोटी. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यापूर्वी सरकारी नोकरीत नियुक्तीसाठी पात्र ठरलेल्या मराठा समाजातील तरुणांना अधिसंख्य पदे निर्माण नोकरी देण्याचे काही सरकारने दिले आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 100 कोटी रुपये दिले आहे.
राज्यावर भारनियमनाचे सावट ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे संकेत.
राज्यातील आदिवासी व आदिवासीबहुल जिल्ह्यातील शासकीय सेवेतील छोट्या संवर्गासाठी सुधारित आरक्षण लागू करण्यात आले आहे. याआधी एकूण आरक्षणामध्ये समाविष्ट करण्यात आले 13 टक्के एस ई बी सी मराठा आरक्षण वगळून बिगर आदिवासी जिल्ह्यांमध्ये एकूण 62 टक्के व आदिवासी जिल्ह्यांमध्ये सरासरी 70 टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. राज्यातील 2001 च्या आरक्षण कायद्यानुसार शासकीय सेवेतील पदांसाठी व शिक्षणातील प्रवेशासाठी 52 टक्के आरक्षण लागू करण्यात आले .
मानसिक तणाव नियंत्रणासाठी पाणी उपयुक्त. मानसिक तणाव चिंता कमी करण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे हे उपयुक्त ठरू शकते यातून माणसाची सकारात्मक भावना वाढीस लागू शकते असे दे यकीन विद्यापीठातील संशोधकांचे म्हणणे आहे.
माधवी पुरी बुच सेबी च्या पहिल्या महिला अध्यक्षा. भांडवली बाजाराची नियामक संस्था सेबी चे नेतृत्व पहिल्यांदाच महिलेकडे येत असून सोमवारी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार माधवी पुरी बुच या सेबी च्या पहिल्या नवीन अध्यक्षा म्हणून कारभार पाहतील.
बालविवाहाच्या नोंदीत ति पटीने वाढ. प्रगत राज्य म्हणून नावलौकिक असलेल्या महाराष्ट्रात 2016 ते 2020 या कालावधीत बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 अंतर्गत नोंदविलेल्या बालविवाहाच्या प्रकरणात 16 टक्क्यांवरून पन्नास टक्के म्हणजे तिप्पट वाढ झाल्याचे दिसून येते.
महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव पदी …. यांची सोमवारी नियुक्ती करण्यात आली.
>> मनुकुमार श्रीवास्तव
…… या सेबी च्या पहिल्या नवीन अध्यक्षा म्हणून कारभार पाहतील.
>>माधवी पुरी बुच