चालू घडामोडी – 27-03- 2022 // आज च्या महत्वाच्या चालू घडामोडी 27 मार्च 2022 // Chalu Ghadamodi
कौशल्य विकासाला सी एस आर ची जोड.
राज्यातील युवक महिला दिव्यांग व्यक्ती विधवा आदींच्या कौशल विकासाला गती देण्यासाठी व्यवसायिक सामाजिक जबाबदारी सीएसआर फंडातूनही मदत घेण्यात येणार आहे. राज्यातील संस्था उद्योग यांच्या एकत्रित सहभागातून कौशल्य विकास विषयक कार्यक्रम राबविण्यात येणार असून यासाठी राज्यस्तरीय कौशल्य विकास सामाजिक दायित्व निधी आणि स्वेच्छा देणगी समिती स्थापन करण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिली या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये राज्य शासनही योगदान देणार आहे.
महाराष्ट्रात चार नववी पुस्तकांची गावे! पश्चिम महाराष्ट्रातील औदुंबर मराठवाड्यातील वेरूळ विदर्भातील नवेगाव बांध आणि कोकणातील पोंभूर्ले ही महाराष्ट्रातील नवी चार पुस्तकांची गावे ठरणार आहेत. मराठी भाषा राज्यमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम यांनी ही माहिती लोकसत्ताला दिली राज्यात प्रथमच आकारास आलेल्या सातारा जिल्ह्यातील भिलार पाठोपाठ या चार गावांना पुस्तकाचे गाव असा मान मिळत आहे.
चीनी विद्यापीठातील ऑनलाइन शिक्षण अग्राह्य यूजीसी , ए आय सी टी ई करून विद्यार्थ्यांना स्पष्ट इशारा.
भारतीय विद्यार्थ्यांना चीनमधील विद्यापीठांची निवड करताना काळजी घ्यावी लागणार आहे कारण पूर्वपरवानगीशिवाय केवळ ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण करून प्राप्त केलेली पदवी ड्रायव्हर ठरली जाणार नसल्याचे विद्यापीठ अनुदान आयोग यूजीसी आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने एआय सी टी ई ने स्पष्ट केलेले आहे.
चीनमध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या फार मोठी आहे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी वीस हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्या ची आकडेवारी चीन मधील भारतीय दूतावासाने जाहीर केली आहे .नियमानुसार पूर्वपरवानगीशिवाय अभ्यासक्रम केवळ ऑनलाइन पद्धतीने पूर्ण केल्यास ती पदवी ग्राह्य धरता येणार नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी भविष्यातील नोकरी आणि उच्च शिक्षणात अडचणी येऊ शकतात.
देशातील 97 . 84 दशलक्ष हेक्टर जमीन निकृष्ट.
देशातील एकूण वनक्षेत्रात 12294 चौरस किलोमीटर ने वाढ झाली परंतु यातील 97 .84 दशलक्ष हेक्टर जमीन निकृष्ट झालेली आहे. 2011-13 मध्ये देशात 96.32 दशलक्ष हेक्टर जमीन निकृष्ट होती त्यात आता 1.52 दशलक्ष हेक्टर ची भर पडली आहे.
राज्यात सीएनजी स्वस्त किलोमागे सात ते आठ रुपयांची घट एक एप्रिलपासून अंमलबजावणी.
राज्य सरकारने व्ह्यट मध्ये दहा टक्के कपात केल्याने सीएनजी प्रति किलो सात ते आठ रुपयांनी स्वस्त होईल येत्या शुक्रवारपासून त्याची अंमलबजावणी केली जाईल.
गोंडवाना विद्यापीठाला फॉरेस्ट व ट्रायबल दर्जा.
विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आग्रही भूमिका घेतल्यानंतर राज्यसरकारने गोंडवाना विद्यापीठाला फॉरेस्ट व ट्रायबल दर्जा देण्याची तयारी दर्शविली आहे आमदार मुनगंटीवार यांनी विनियोजन व विधेयकावर बोलताना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत लक्ष वेधले होते. 2011 मध्ये गडचिरोली व चंद्रपूर या मागास आदिवासीबहुल भागांसाठी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती आदिवासीबहुल भाग असल्याने गोंडवाना विद्यापीठाला विशेष दर्जा देण्यात यावा अशी मागणी आमदार मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली. विशेष दर्जा प्राप्त झाल्यास गोंडवाना विद्यापीठाला केंद्र सरकारही निधी देऊ शकते असे त्यांनी नमूद केले होते गोंडवाना विद्यापीठ याबाबत आमदार मुनगंटीवार यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सोमवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या विद्यापीठाला फॉरेस्ट व ट्रायबल दर्जा देण्यात येईल असे जाहीर केले पुढील अधिवेशनापर्यंत याबाबतची आवश्यक कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही उदय सामंत यांनी दिली.
महादीप मधील छत्तीस यशस्वी विद्यार्थ्यांना विमान वारी.
चार लाख विद्यार्थ्यांची शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षेची तयारी. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेची कमी नाही हे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने घेतलेल्या महादीप परीक्षेतून सिद्ध झाले आहे महादिप च्या अंतिम परीक्षेत जिल्ह्यातील 36 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले या विद्यार्थ्यांना लवकरच विमान वारी आणि दिल्लीचे दर्शन ची भेट मिळणार आहे.
संप मागे घ्या राज्यातील विद्यार्थ्यांची एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन.
राज्यातील एसटी सेवा सुरळीत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत असून ग्रामीण भागातील शाळा गाठण्यासाठी तासन तास पायपीट करावी लागते विद्यार्थ्यांची हाल थांबवण्यासाठी ग्रामीण भागातील एसटी फेर्यांची नियोजन केले जाईल असे आश्वासन महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी दिले असले तरी सध्या धावत असलेल्या 5000 बस गाड्यांमधून राज्यातील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची समस्या कधी सुटणार असा सवाल उपस्थित होत आहे.