चालू घडामोडी 29 मार्च 2022 - Chalu Ghadamodi Daily Marath Current Affairs
शैक्षणिक कर्जाच्या थकबाकीत वाढ देशभरात 89 हजार 477 कोटींचे कर्ज थकीत एक लाखाहून अधिक खातेदाराचे परतफेड कडे केले दुर्लक्ष. आर्थिक मंदी चा बँकांच्या कर्ज वसुलीवर ही परिणाम झाला असून बँकांच्या शैक्षणिक कर्जाची थकबाकी वाढली आहे एकट्या महाराष्ट्रात 31 डिसेंबर 2021 पर्यंत 190000 खातेदार कडे 8282 कोटी रुपयांची थकबाकी होती. राज्य स्तरीय बँकर्स समितीच्या माहितीनुसार 31 डिसेंबर 2021 पर्यंत संपूर्ण देशातील 22 लाख 56 हजार 470 कोटी रुपयांचे शैक्षणिक कर्ज थकीत आहे यात महाराष्ट्रातील एक लाख 90 हजार खातेदारांना कडील 8882 कोटी रुपयांच्या कर्जाचा समावेश होता.
सामान्यपणे शैक्षणिक कर्जाची उचल केल्यापासून दोन वर्षानंतर त्याची परतफेड हप्ते सुरू होतात कर्ज धारक नोकरीवर लागल्यावर कर्जाची परतफेड करतात मात्र बँकेचे व्याजाची आकारणी कर्जाची उचल झाल्यापासून सुरू होते त्यामुळे थकबाकीची रक्कम मोठी वाटते. सध्या युक्रेन मधून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडून आले आहेत यापैकी बहुतांश जणांनी शिक्षणासाठी कर्ज घेतले आहे. त्यांचे कर्जत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शासनाच्या परिपत्रक बाबत शिक्षण क्षेत्रातून नाराजी. शालेय पोषण आहारा सह अनेक समस्या शाळांना भेडसावत असताना एप्रिल अखेरपर्यंत राज्यभरातील शाळा भरवायचे कशा असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातून उपस्थित करण्यात येत आहे शासनाच्या परिपत्रकामुळे गोंधळ निर्माण होत असून हे परिपत्रक रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
युक्रेनमधील विद्यार्थ्यांना आरोग्य विद्यापीठात समावून घेणे अशक्य कुलगुरूंची स्पष्ट स्पष्टोक्ती.
युक्रेन मधून महाराष्ट्रात भरलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक मध्ये समावून घेणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य वाटते कारण युक्रेन आणि भारतातील वैद्यकीय अभ्यासक्रम अगदीच भिन्न आहेत असे स्पष्ट मत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक च्या कुलगुरू व लेफ्टनंट जनरल निवृत्त माधुरी कानिटकर यांनी व्यक्त केले. विद्यापीठ कायद्यात सुधारण्यासाठी समिती. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कायदा खूप जुना आहे या कायद्याचा संपूर्ण अभ्यास करून त्यात सुधारण्यासाठी वैद्यकीय शिक्षण खाते सोबत समन्वय साधून काम होणार आहे त्यासाठी विद्यापीठाकडून निधी वित्त आणि परीक्षेचा अभ्यास असलेल्या प्रत्येकी एका अधिकारी चे नाव वैद्यकीय शिक्षण विभागाला सुचविण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण खात्याकडून या सुधारणेबाबत पुढे निघणार या यादीत ही नावे असतील या कायद्याचा सूक्ष्म अभ्यास करून वैद्यकीय शिक्षण विभाग आणि आरोग्य विद्यापीठ या सुधारणा संयुक्तरित्या करेल असेही कानेटकर यांनी सांगितले.
गैरप्रकार दडपण्याचा प्रयत्न केल्यास शाळा सह आरोपी.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ह्या अनेक ठिकाणी सीसीटीव्ही सुरक्षा गजर बसवून ते कायम सुरू राहतील याची काळजी घ्यावी तसेच सीसीटीव्ही रेकॉर्डिंग जतन करून ठेवावे उपाययोजना करूनही गैरप्रकार घडल्यावर ती दडपण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित शाळेला सह आरोपी करण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे तसेच जिल्हा स्तरावर महिला दक्षता समिती प्रत्येक शाळेत विद्यार्थिनी सखी विद्यार्थी मित्र नेमण्याचा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
पीएचडी च्या नवीन नियमावलीला विरोध दर्जाचे संशोधन वाढण्याची भीती. विद्यापीठ अनुदान आयोग यूजीसी पीएचडी च्या संदर्भात नवीन नियमावली आणणार असून तसा मसुदा यूजीसीने प्रसिद्ध करून त्यावर सूचना मागवले आहेत मात्र नवीन सुधारणांना शैक्षणिक वर्तुळातून विरोध होत असून यामुळे पीएचडीच्या दर्जामध्ये आणखी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यूजीसीने 2009 व 2016 मध्ये पीएचडी च्या संदर्भात अधिसूचना काढल्या होत्या परंतु या पूर्वीचे आधी सूचनेची अंमलबजावणी अद्यापही बऱ्याच विद्यापीठात झालेली नाही त्यामुळे नवीन नियमावली तयार करून फारसा फरक पडणार असल्याची चर्चा उच्चशिक्षण वर्तुळात आहे. संशोधनाकडे विद्यार्थ्यांचा अधिकाधिक कल वाढावा म्हणून यूजीसीने पीएचडीच्या नवीन नियमावली संदर्भात नुकताच मसुदा प्रसिद्ध केला या व 31 मार्चपर्यंत सूचना आणि आक्षेप मागविले नवीन नियमावलीनुसार आता चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पीएचडी ला प्रवेश मिळणार आहे त्यामुळे पदवीधर विद्यार्थी पीएचडी सारख्या महत्त्वपूर्ण संशोधन अभ्यासात यशस्वी होईल का हा संशोधनाचा विषय आहे.
एम फिल अभ्यासक्रम कायमस्वरूपी बंद. संशोधन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण असा एप्रिल अभ्यासक्रम देखील सत्र 2022-23 पासून बंद करण्यात येणार असल्याचे मसुद्यामध्ये नमूद आहे मुळात एमफील अभ्यासक्रमात मूलभूत संशोधन संशोधन पद्धती संशोधन प्रबंधिका यावर आधारित अभ्यासक्रम असतो त्यामुळे संशोधकांची पीएचडी ची पूर्वतयारी ही एमफील मध्येच पूर्ण होत होती मात्र शासनाने अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला पूर्वी एम फिल चा अभ्यासक्रम एक वर्षाचे होते. त्यानंतर ते दोन वर्षाचे करण्यात आले मात्र आता एम फिल चा अभ्यासक्रम कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे.
नानार प्रकल्प कोकणातच!
स्थळ निश्चितीबाबत केंद्र व राज्य यांच्यात चर्चा सुरू.
कोकणातील तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत महाराष्ट्र सरकारचे मतपरिवर्तन झाले असल्याने या प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा झाल्याची सुतोवाच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोकण दौऱ्यावर आलेले पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही सकारात्मक भूमिका मांडली . दुसरीकडे प्रकल्प स्थळ निश्चितीबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात चर्चा सुरू असून सहमती नंतरच निर्णय जाहीर करण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे हा प्रकल्प कोकणात होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
देशातील अन्य उच्चशिक्षण संस्थांनी सी यु ई टी चा वापर करण्याचे आवाहन. यूजीसी चे उच्च शिक्षण संस्थांना पत्र. केंद्रीय विद्यापीठातील पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समाईक विद्यापीठ प्रवेश परीक्षा सी यू ई टी आयोजित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता विद्यापीठ अनुदान आयोगाने यूजीसी देशभरातील अन्य विद्यापीठांनीही ही परीक्षा स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. देशभरातील अन्य विद्यापीठे उच्च शिक्षण संस्थांनी ही प्रवेश परीक्षा स्वीकारल्यास विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या परीक्षेत देण्यापासून सूट का होईल असेही तिने स्पष्ट केले आहे.
देशभरात जवळपास 54 केंद्रीय विद्यापीठे 441 राज्य विद्यापीठे तर एकशे तीस अभिमत विद्यापीठे आणि जवळपास 350 खाजगी विद्यापीठे आहेत तसेच जवळपास एक हजार स्वायत्त दर्जा मिळालेले महाविद्यालय आहेत यूजीसीच्या पत्रानुसार राज्य विद्यापीठ अभिमत विद्यापीठे आणि स्वायत्त महाविद्यालयांनी पदवीपूर्व प्रवेशासाठी सी यु ई टी चा वापर करावा .
आस्कर मध्ये कोडा सर्वोत्कृष्ट ड्यून ला सर्वाधिक सहा पुरस्कार. करोना नंतरच्या मनोरंजन समीकरणे बदलत असलेल्या ऑस्कर सोहळ्यात यंदाही कुणा एका चित्रपटाला महत्वाचे आणि मानाच्या पुरस्कारांवर वर्चस्व राखता आले नाही बहुतांश पुरस्कार विविध चित्रपटांमध्ये विखुरले गेले बारा आणि दहा मानांकन असलेल्या चित्रपटांना भरीव कामगिरी करता आली नाही तर तीन मानांकने असलेल्या कोडा या चित्रपटाने तिन्ही गटातील पुरस्कार पटकावत सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या सन्मानानं नाव कोरले असल्याने सर्वांना आश्चर्यचकित केले
नीरज चोप्रा, प्रमोद भगत पद्मश्री पुरस्काराने संबंधित.
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावणारा भालाफेक पटू नीरज चोप्रा आणि प्यारा बॅडमिंटन पटू प्रमोद भगतला पद्मश्री पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नीरज चोप्रा आणि प्रमोदला देशाचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.