31/03/2022 च्या दैनंदिन चालू घडामोडी / Current Affairs 31 March 2022
महागाई भत्त्यात 3% वाढ केंद्र आणि राज्य सरकारचा निर्णय.
केंद्रीय आणि राज्य सरकारी कर्मचारी निवृत्तीवेतन धारकांच्या महागाई भत्त्यात बुधवारी तीन टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34% झाला असून तो पूर्वलक्षी प्रभावाने 1 जानेवारी 2022 पासून लागू होईल. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने जुलै 2021 पासून भत्ता वाढ होणार असून चालू मार्च महिन्याच्या वेतनात थकबाकीसह ही वाढ देण्यात येईल.
राज्यात उन्हाच्या झळा तीव्र चंद्रपूरचा 44.2, देशातील उच्चांकी तापमानाची नोंद. मध्य भारतासह महाराष्ट्रात उन्हाच्या जाणवत आहेत विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट सुरू झाली असून या भागांसह मराठवाड्यात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. चंद्रपूर येथे राज्यातीलच नव्हे तर देशातील उच्चांकी 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद बुधवारी झाली.
शिष्यवृत्ती मधील इतर शुल्क शासनाने वाढवले माफसू च्या विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक फटका. पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ माफसू च्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती मध्ये इतर शुल्क राज्य शासनाने कुठलीही पूर्वसूचना न देता मागील वर्षापासून अचानक बंद केले त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे.
PAN व आधार संलग्नता नसल्यास दंड जोडणी करण्यासाठी कब्जा त्यांना आज अखेरची मुदत. करदात्याला आधार आणि प्राप्ती कराचा कायम खाते क्रमांक अर्थात PAN आणि आधार संलग्न न करणाऱ्या करदात्यांना 500 ते 1000 रुपयांचा दंड भरावा लागेल असे प्राप्तीकर विभागाकडून बुधवारी सांगण्यात आले.
सुवर्ण महोत्सवी पिंजरा मराठी चित्रपट सृष्टीला पिंजरा नावाच्या कलाकृतीचं स्वप्न पडलं त्याला 31 मार्च 2020 रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत मराठी चित्रपट विश्वाला सोनेरी कार्ड दाखवणारा पिंजरा चित्रपट आता सुवर्णमहोत्सवी वर्षात पोहोचला आहे पण सोपं नव्हतं प्रसिद्ध निर्माते आता सुवर्णमहोत्सवी वर्षात दिग्दर्शक व्ही शांताराम यांनी ते शिव धनुष्य सांभाळला त्याला अनेक अडचणी आल्या पण 31 मार्च 1972 रोजी तो प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांनी अक्षरश त्याला डोक्यावर घेतला दाबहार गाणी आणि लावण्याचा सुरेल अविष्कार या बरोबरच सामाजिक सामाजिक संदेश देणार्या पिंजऱ्याची चित्रपटाची जादू आजही कायम आहे.