08/03/2022 च्या चालू दैनंदिन घडामोडी - Chalu Ghadamodi 08 March 2022
8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन. महिलांवरील अत्याचार विरोधातील शक्ती कायदा दुरुस्ती. गुन्हा नोंदविणे बाबतची संदिग्धता दूर. महिलांवरील अत्याचार नियंत्रणासाठी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या शक्ती कायद्यात विधिमंडळाच्या संयुक्त समितीने सुचवलेल्या सुधारणांचा अहवाल सोमवारी विधानसभेत मांडण्यात आला. त्यामुळे महिला अत्याचारांच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलांची संख्या वाढणार असून गुन्हा नोंदविला बाबतची संदिग्धता संपेल त्यामुळे शक्ती कायदा अधिक प्रभावी होणार आहे.
उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपच? मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज: पंजाब मध्ये सत्तांतर, उत्तराखंड आणि गोव्यात त्रिशंकू स्थिती कार मणिपूरचा सत्ताधाऱ्यांकडेच कल.
राज्यात निवडणुका लांबणीवर 14 महापालिकांची प्रभाग रचना रद्द, विधेयक मंजूर. इतर मागासवर्गीय यांना ओबीसी आरक्षण लागू होईपर्यंत महानगरपालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी प्रभागाची रचना त्यांची हद्द निश्चित करण्याचे अधिकार राज्यशासनाकडे देणारे विधायक विधिमंडळाच्या उभय सभागृहांमध्ये सोमवारी एकमताने मंजूर झाले त्यामुळे मुंबई पुण्यासह चौदा महापालिकांमध्ये अंतिम टप्प्यात असलेली प्रभाग रचना रद्द करण्यात आली असून राज्य शासनाकडून नव्याने प्रभाग रचना केली जाईल.
भारतीयांच्या सुटके बाबत पुतीन यांची मोदींना ग्वाही. युक्रेनच्या सुमि शहरात अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी रशियन सैन्य सर्व प्रकारचे प्रयत्न करीत असलेली ग्वाही रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोमवारी चर्चेदरम्यान दिली. तसेच पुतिन यांच्या कार्यालयातर्फे ही माहिती देण्यात आली.
एसटी संपावर कर्मचारी ठाम, आझाद मैदानात आज आंदोलन. विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम आहेत. या मागणीसाठी राज्यातील विविध भागातून मंगळवारी आझाद मैदानात मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी आंदोलनासाठी येणार आहेत. विलीनीकरणासाठी या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या चार महिन्यापासून संपा पुकारला आहे त्यासाठी शासनाकडून तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली. त्यांच्या अहवालानुसार विलीनीकरण शक्य नसल्याचे स्पष्ट झाले.
अकार्यक्रमतेचा ठपका पुसण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोग आक्रमक. आज ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर बैठक. सर्वोच्च न्यायालयाने राज्य मागासवर्गीय आयोगाची अंतरिम अहवाल फेटाळल्यामुळे इतर मागासवर्गीयांच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न पुन्हा जटिल झाला आहे. न्यायालयाच्या या निकालाने आयोगाचे कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. परंतु त्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
प्राध्यापक भरती चा मुहूर्त सापडेना! उच्च शिक्षण मंत्री चे आश्वासन हवेत. नेट सेट पात्रता धारकांनी राज्यभर पुकारलेल्या आंदोलनाचा धसका घेत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये 2088 सहाय्यक प्राध्यापक पदे मान्यता देत तसा निर्णयही काढला. या शासन निर्णयात शैक्षणिक सत्र बावीस-तेवीस च्या सुरुवातीला नियुक्ती देण्याचे नमूद करण्यात आले होते परंतु निर्णयाला चार महिने उलटूनही अद्याप पदभरतीची कोणतीही जाहिरात प्रसिद्ध झाली नसल्याचे सरकार फसवणूक करीत असल्याचा आरोप होत आहे.
महिलांविरोधातील गुन्ह्यात शिक्षेचे प्रमाण हे 15.3 टक्के. न्यायवैद्यक प्रयोगशाळांमध्ये सुविधा नसल्याने हजारो प्रकरणात तपास रखडला.
आंतरराष्ट्रीय महिला दिन
- दरवर्षी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो
- 1977 पासून संयुक्त राष्ट्र द्वारे केला जातो
- पहिला महिला दिन अमेरिकेत 28 फेब्रुवारी 1990 रोजी साजरा करण्यात आला
- 2020 ची थीम :- I am Generation Equality : Realizing Women's Rights
- 2021 ची थीम :- Women in leadership
- 2022 ची थीम :- Gender Equality Today for a Sustainable Tomorrow
- महिला दिनाचे जांभळा, हिरवा आणि पांढरा असे रंग आहेत
- जांभळा रंग :- न्याय & सन्मानाचे प्रतीक
- हिरवा रंग :- आशेचे प्रतीक
- पांढरा रंग :- शुद्धतेचे प्रतीक
- भारतात राष्ट्रीय महिला दिवस दरवर्षी 13 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो (सरोजिनी नायडू यांचा जन्मदिन)