चालू घडामोडी २८ मार्च २०२२ – Chalu Ghadamodi Daily Marathi Marathi Current Affairs
नानार च्या पुनरुज्जीवनाची आशा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे सुतोवाच शिक्षण हे रोजगाराभिमुख करण्याची अपेक्षा.
नानार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत लाखो कोटी रुपयांचे आणि रोजगाराची योगदान देण्याची श्रमदान आहे. गेली काही वर्ष विरोधामुळे तो प्रकल्प रखडला असला तरी आता महाराष्ट्र सरकारचे मनपरिवर्तन होत असल्याचे दिसत असल्याने नानार प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाची आशा असल्याचे सुतोवाच केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसत्ता च्या व्यासपीठावरून स्पष्ट केले. त्याचबरोबर शिक्षण हे पदवी भिमुख नसावे तर रोजगाराभिमुख असावे अशी अपेक्षाही प्रधान यांनी व्यक्त केली.
पुढील चार दिवस दाहक. मार्चच्या पहिल्या टप्प्यातही उत्तरेकडून येणाऱ्या ऊष्ण वाऱ्यांनी राज्याच्या विविध भागात उष्णतेची लाट आली असतानाच आता शेवटच्या टप्प्यात हि राज्याच्या विविध भागात उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे.
त्यामुळे मार्च चे शेवटचे चार दिवस राज्यासाठी दाहक ठरण्याची शक्यता आहे. या चार दिवसांमध्ये विदर्भ मराठवाडा उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात उष्णतेची उष्णतेची लाट येणार असून उर्वरित भागातील दिवसाच्या कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या रजा मध्ये वाढ.
राज्यभरातील पोलिसांना वर्षभरात 12 किरकोळ राजा मिळत होत्या पोलिसांना मिळणाऱ्या किरकोळ राजांमध्ये वाढ करण्यात आली असून पोलिसांना आता वीस किरकोळ रजा मिळणार आहेत कायदा-सुव्यवस्था गंभीर गुन्ह्यांचा तपास तसेच मोर्चा आंदोलने राजकीय नेत्यांचा बंदोबस्त सांभाळणाऱ्या पोलिसांवरील दानाचा तान विचारात घेऊन पोलिसांच्या हक्कांचा रजा वाढविल्या पाहिजेत असा प्रस्ताव होता व त्यास मंजुरी मिळालेली आहे.
आयआयटीने उद्योजक निर्माण करावेत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आवाहन नव्या वसतिगृहाचे उद्घाटन.
वेगाने बदलणाऱ्या भौगोलिक व राजकीय परिस्थितीत भारताला वरचे स्थान मिळावे यासाठी आयआयटी मुंबई ने प्रमुख भूमिका हाती घ्यावी एकविसाव्या शतकातील समस्यांचं आढावा घेऊन त्यावर उत्तरे शोधण्याचे काम आय टी ने करावे. आय आय टी ने नुसतेच नोकरदार कर्मचारी घडवू नयेत नोकरी देणारे उद्योजक जगाला दिशा देणारे संशोधक निर्माण करावे असे आवाहन बेंद्रे शिक्षण व कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले.
पवई येथील आयआयटी कॅम्पस मधील वस्तीगृहाची धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन करण्यात आले यावेळी आयआयटी मुंबईचे संचालक प्राध्यापक सुभाशिष चौधरी आणि प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर पवन गोयंका उपस्थित होते. अभ्यासासाठी चांगले वातावरण असेल तर विद्यार्थ्यांचा उत्साह वाढतो त्यामुळे काहीतरी नवीन शोधण्याची संशोधन करण्याची प्रेरणा मिळते असे प्रधान म्हणाले. तसेच बदलणाऱ्या भू-राजकीय परिस्थिती मुळे आणि साथीच्या आजारांमुळे सर्व जगात पुढे वेगवेगळ्या समस्या उभ्या राहिल्या आहेत आर्थिक नैसर्गिक आरोग्यविषयक अशा अनेक समस्या असून या बदलत्या अर्थव्यवस्थेत भारताला पुढे नेण्याची भूमिका बजवावी अशी आवाहन त्यांनी केले. येत्या 25 वर्षात भारताला कोणत्या गोष्टीची गरज लागू शकते याचा वेध घेऊन त्याची निर्मिती करण्याचे आव्हान आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी पेलावे असे त्यांनी स्पष्ट केले.
एमआरसेम चांदसर या लष्करी आवृत्तीची यशस्वी चाचणी.
जमिनीवरून हवेत मारा करणार्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची एम आर सेम या लष्करी आवृत्तीची शनिवारी भारताने ओडिशातील चांदीपूर एकात्मिक चाचणी तळावरून यशस्वी चाचणी केली दीर्घ पल्ल्याची निकष पूर्ण करून सकाळी दहा वाजता या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली असे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने डी आर डी ओ यांनी सांगितले. एम आर सेम आर्मी मिसाईल सिस्टीम फ्लाईट ची बालासोर येथील चाचणी तळावरून चाचणी करण्यात आली या क्षेपणास्त्राने अतिशय वेगाने मार्गक्रमण करून लांब अंतरावरील हवेतील एक लक्ष ठेवले थेट मारा करून या क्षेपणास्त्राने लक्ष नाष्टा केले असे डीआरडीओने सांगितले.
भारताची आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक पूर्ववत करोणा साथीच्या दोन वर्षाच्या खंडानंतर सरकारचा निर्णय. भारताने रविवारी सर्व आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक पूर्ववत सुरू केली करोणा साथीमुळे महत्त्वाच्या बहुतेक सर्व आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीस भारताने दोन वर्षापासून बंदी घातली होती या निर्णयाने जगाशी भारत जोडला जाईल अशी प्रतिक्रिया केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिले. येत्या उन्हाळ्यात 1783 परदेशी विमानांची व साप्ताहिक उडाने होतील तर 1466 भारतीय विमाने दर आठवड्याला परदेशी जातील.
भारताची दोन ऑलिंपिक पदक विजेते बॅडमिंटन पटू पी.व्ही. सिंधू ने रविवारी स्वीस खुल्या स्पर्धेतील महिला एकटीचे विजेतेपद पटकावले तर पुरुष एकेरीत भारताच्या एच एस प्रणय ला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
Chalu Ghadamodi GK Prashn Uttre
पर्यटनासंबंधी दिल्ली सरकारने कोणते मोबाईल ॲप तयार केले?
उत्तर : देखो मेरी दिल्ली
● कोणत्या अंतराळ संशोधन संस्थेने गुरु ग्रहाच्या सभोवताली फिरणाऱ्या ‘ट्रोजन’ नामक लघुग्रहांचा अभ्यास करण्यासाठी ‘ल्युसी’ नामक पहिले अंतराळयान तयार केले?
उत्तर : NASA
● कोणती व्यक्ती ट्युनिशिया देशाची पहिली महिला पंतप्रधान ठरली?
उत्तर : नजला बौडेन रोमधाने
● कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस’ साजरा करतात?
उत्तर : ०१ ऑक्टोबर
● कोणत्या व्यक्तीने २९ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या ३८ व्या प्रगती बैठकीचे अध्यक्षपद भूषविले?
उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी
● कोण IFSC येथे ‘सस्टेनेबल फायनॅन्स हब’च्या स्थापनेसंदर्भात शिफारस प्राप्त करण्यासाठी नेमेलेल्या तज्ञ समितीचे अध्यक्ष असतील?
उत्तर : सी. के. मिश्रा
● कोणत्या व्यक्तीची नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (NSDL) याच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती झाली?
उत्तर : पद्मजा चुंडुरू
● खालीलपैकी कोण “क्रॉनिकल्स फ्रॉम द लँड ऑफ द हॅप्पीएस्ट पीपल ऑन अर्थ” हे शीर्षक दिलेल्या कादंबरीचे लेखक आहे?
उत्तर : वोले सोयिंका