Chalu Ghadamodi Prashn Uttre / 17/03/2022 चालू दैनंदिन घडामोडी
कॉपी आढळल्यास शाळांची खैर नाही मान्यता रद्द करण्याचा शिक्षण मंत्री चा इशारा. बोर्डाचे पेपर मध्ये विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक किंवा इतर कर्मचाऱ्यांनी प्रोत्साहन दिल्याचे दिसून आल्यास किंवा त्यांचा प्रत्यक्ष सहभाग आढळून आल्यास अशा खेळांची मान्यताच रद्द केली जाईल अशी घोषणा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत बोर्डाच्या परीक्षा त्यांच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत या सुरळीतपणे पार पाडाव्यात व विद्यार्थ्यांना निर्भीडपणे सामोरे जाता यावे यासाठी पालक शाळा प्रसार माध्यमे लोक प्रतिनिधी आणि सर्व जनतेने सहकार्य करावे वर्षा गायकवाड शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य.
वन रैंक वन पेंशन बाबतचा निर्णय वैध सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा. सशस्त्र दलासाठी वन रैंक वन पेंशन बाबत केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. राज्य घटनेतील तरतुदींच्या दृष्टीनेही हा वैध निर्णय आहे. असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.
फेसबूक ट्विटरचे सरकारशी संगनमत सोनिया गांधी यांचा लोकसभेत आरोप. सत्तारूढ पक्ष आणि संबंधित संघटनांशी संगनमत करून फेसबूक ट्विटर सह सोशल मीडिया लोकशाहीचे अपहरण करीत आहे लोकशाही आणि देशासाठी हे धोकादायक असे राजकीय वातावरण देशात निर्माण करण्याचे काम करीत आहे असा परखड आरोप काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी लोकसभेत शून्य प्रहरात केला. तसेच सरकारने हा प्रकार तात्काळ ओळखावा अशी मागणीही त्यांनी केली.
टी ई टी मध्ये सतराशे एक अपात्र उमेदवार झाले पात्र 2018 ची परीक्षा अध्यक्षाची संगणमत बारा आरोपींवर 2615 पाणी दोषारोपपत्र. शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी 2018 च्या परीक्षेत राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्षांनीच इतरांशी संगणमत करून 1701 अपात्र परीक्षार्थींना पात्र केले असल्याचा ठपका सायबर पोलिसांनी दोषारोपपत्रात ठेवला आहे. सायबर पोलिसांनी बुधवारी टीईटी परीक्षा 2018 मध्ये बारा आरोपींवर 2615 पाणी दोषारोपपत्र पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी न्यायालयात दाखल केले आहे.
युक्रेन वर कब्जा करण्याची इच्छा नाही पुतिन. युक्रेन वर कब्जा करण्याची रशियाची अजिबात इच्छा नाही स्वरक्षणासाठी आमच्यापुढे काही पर्याय न उरल्याने आम्ही यूक्रेन वर आक्रमण केले असा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी बुधवारी केला. पुतीन म्हणाले की क्रिमी यासह दोन भागांवर हल्ला करण्यात आल्याचा कट आम्ही उधळून लावला आम्ही केलेल्या नियोजनाप्रमाणे युक्रेन विरोधातील कारवाई सुरू आहे.
बँकांना आले अच्छे दिन! एकही सरकारी बँक तोट्यात नाही 48 हजार कोटींचा नफा. देशातील सरकारी बँकांचे अच्छे दिन सुरू झाले आहेत चालू वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात म्हणजेच एप्रिल ते डिसेंबर 2021 या कालावधीत एकही सहकारी बँक तोट्यात नाही या बँकांनी एकूण 48 हजार 874 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. केंद्रीय राज्य वित्तमंत्री भागवत कराड यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की 2020-21 या वित्त वर्षात सरकारी बँकांनी एकूण एकतीस हजार आठशे वीस कोटी रुपयांचा नफा कमावला होता चालू वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यातच बँकांनी यापेक्षा अधिक नफा कमावला आहे.
शेअर बाजारातील तुमच्या कमाईवर सरकार चा डोळा. भांडवली लाभ कराच्या कॅपिटल गेन टॅक्स नियमात बदल करण्याची तयारी केंद्र सरकार ने चालवले आहे. त्यामुळे यांना शेअर बाजारातून नफा मिळतो त्यांना अधिक कर द्यावा लागण्याची शक्यता आहे. अर्थ मंत्रालयाच्या समोर असलेल्या प्रस्तावात म्हटले आहे की शेअर बाजारात मिळणारे उत्पन्न आहे पॅसिवे इन्कम मत असते त्यामुळे त्यावर लागणारा कर व्यवसायिक उत्पन्नावरील करापेक्षा कमी असता कामा नये. व्यवसायिक उत्पन्नात अनेक जोखीम असतात त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण होतात. शिवाय सरकार काही नवीन कल्याणकारी योजनांचा विचार करीत असल्यास त्यासाठी अतिरिक्त महसूल निर्माण करण्याची गरज आहे. भांडवली नाव करात बदल करण्यासाठी सरकारला कायद्यात बदल करावा लागेल त्यासाठी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सर्वाधिक उपयुक्त वेळ आहे तोपर्यंत वित्त मंत्रालय यावर गांभीर्याने विचार ही करेल.
chalu ghadamodi prashn uttre march 2022
नुकताच “राष्ट्रीय लसीकरण दिवस” कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – १६ मार्च
अलीकडेच शालेय मुलांसाठी युवा वैज्ञानिक कार्यक्रम “युविका” कोणी आयोजित केला आहे?
उत्तर – इस्रो
अलीकडेच रिलायन्स रिटेलने बिग बाजार ऐवजी कोणता लॉन्च करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर – स्मार्ट बाजार
कोणत्या WWE दिग्गजाचे नुकतेच निधन झाले आहे?
उत्तर – स्कॉट हॉल
अलीकडेच भारताने युक्रेनमधून आपला दूतावास तात्पुरता अन्य कोणत्या देशात हलवला आहे?
उत्तर: पोलंड
नुकतेच भगवंत मान यांनी पंजाबच्या कोणत्या क्रमांकाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे?
उत्तर: १८ वा
देशातील पहिले AI आणि रोबोटिक टेक्नॉलॉजी पार्क नुकतेच कोठे सुरू करण्यात आले आहे?
उत्तर – बंगलोर
प्र. अलीकडेच एअर इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर :- एन चंद्रशेखरन
प्र. भारतातील पहिल्या व्हर्च्युअल स्मार्ट ग्रिड नॉलेज सेंटरचे नुकतेच उद्घाटन कोणत्या राज्यात झाले?
उत्तर :- मानेसर, हरियाणा
प्र. नुकताच जागतिक ग्राहक हक्क दिन 2022 कधी साजरा करण्यात आला?
उत्तर :- १५ मार्च
प्र. अलीकडे चर्चेत असलेले ‘पेंद्रथान मंदिर’ कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- जम्मू काश्मीर
प्र. अलीकडेच कोणत्या भारतीय खेळाडूने सर्वात वेगवान कसोटी अर्धशतक करण्याचा कपिल देव यांचा विक्रम मोडला आहे?
उत्तर :- ऋषभ पंत
प्र. नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन 2022 कधी साजरा केला जातो?
उत्तर :- १४ मार्च
प्र. अलीकडे डिजिटल शॉपिंग 2021 मधील जागतिक गुंतवणूकीत कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे?
उत्तर :- अमेरिका
प्र. नुकतेच जर्मन ओपन बॅडमिंटन 2022 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने रौप्य पदक जिंकले आहे?
उत्तर :- लक्ष्य सेन
प्र. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने वार्षिक आर्थिक योजनेचा भाग म्हणून प्रथमच ‘मुलांचा अर्थसंकल्प’ सादर केला आहे?
उत्तर :- मध्य प्रदेश
प्र. अलीकडेच ऑइल इंडिया लिमिटेड (OIL) चे पुढील अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाचे नाव घेतले आहे?
उत्तर :- रणजित रथ