चालू घडामोडी मराठी - १५ मार्च २०२२ - chalu Ghadamodi
दैनंदिन चालू घडामोडी.
राज्यभरात उन्हाचे चटके, मुंबईचा कोकणात उष्णतेची तीव्र लाट. निरभ्र आकाश आणि देशाच्या वायव्येकडून येणाऱ्या ऊष्ण वाऱ्यांमुळे राज्यात ऊण तडपू लागले आहे. मुंबई ठाणे परिसरासह कोकणात तर उष्णतेची तीव्र लाट आली आहे.
सीआयडी चौकशी, वकिलाचा ही राजीनामा देवेंद्र फडणवीस यांची आरोपांबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची घोषणा. भाजप नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी सरकारने षडयंत्र रचल्याच्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाबाबत राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत सीआयडी चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी विधानसभेत केली. तसेच चित्रफिती तील सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी राजीनामा दिल्याचे ही वळसे पाटील यांनी जाहीर केले.
दहावीची परीक्षा आजपासून. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा आज मंगळवार पासून सुरू होत आहे. राज्यात 16 लाख 39 हजार 872 विद्यार्थ्यांनी परीक्षेची नोंदणी केली असून ओके केंद्र आणि उपकेंद्र मिळून 21384 ठिकाणी परीक्षा होणार आहे राज्य मंडळाचे सचिव डॉक्टर अशोक भोसले यांनी परी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
एअर इंडियाच्या अध्यक्षपदी चंद्रशेखरन. एअर इंडियाच्या अध्यक्षपदी टाटा संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती हवाई वाहतूक उद्योगक्षेत्रातील सूत्रांनी सोमवारी दिली. जवळपास सर्व प्रकारच्या उत्पादनांमध्ये आणि सेवांमध्ये आघाडीवर असलेल्या टाटा समूहाने गेल्यावर्षी 8 ऑक्टोबरला कर्जबाजारी असलेली एअर इंडिया 18 हजार कोटी रुपयांना खरेदी केली होती.
हिजाब प्रकरणी आज निकाल आणि शक्यता. तिचा प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालय आज मंगळवारी निकाल देण्याची शक्यता आहे.
ओबीसी बाबत अहवाल तीन महिन्यात द्या! राज्य सरकारची आयोगाला सूचना. माजी मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखालील समर्पित आयोगाने तीन महिन्याच्या आत इतर मागासवर्गीयांच्या ओबीसी राजकीय मागासलेपणाचा अहवाल सादर करावा. अशी सूचना राज्य सरकारने केली आहे.
1000 तलाठ्यांची लवकरच भरती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची विधानसभेत घोषणा. राज्यातला त्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने महसूल यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन 3165 तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठ्याची भरती करण्यात येणार आहे अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात महसूल मंत्री यांनी विधानसभेत दिली.
विधानसभा अध्यक्ष निवड निवडणुकीसाठी राज्यपालांच्या मान्यतेची प्रतीक्षा. राज्य सरकारकडून सोळा तारीख निश्चित केले आहे.
12 ते 14 वयोगटातील लसीकरण उद्यापासून. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची घोषणा कोब्व्याक्स चा वापर. देशातील 12 ते 14 वयोगटातील मुलांचे मुलांचे करोना लसीकरण बुधवार 16 मार्चपासून सुरू करण्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्री मंसुख मंडविया यांनी सोमवारी घोषणा केली.
अभियांत्रिकी पदवी तंत्रज्ञान प्रवेशांसाठी ए आय सी टी इ कडून सुधारित पात्रता जाहीर. पदवी. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने तंत्रज्ञान बी टेक आणि अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाला थेट द्वितीय वर्षात समस्तर पद्धतीने प्रवेश घेण्यासाठी ची सुधारित किमान पात्रता जाहीर केली आहे. पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम या 45 टक्के किमान गुण आवश्यक असून अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रम पदविका समस्तर पद्धतीने प्रवेशासाठी व्यवसायिक अभ्यासक्रमाची पदवी बीव्होक अभियांत्रिकी पदविका विज्ञान शाखेतील पदवी ला समकक्षता देण्यात आली आहे.
लोकसभेत मोदींचा जयघोष! पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या जय घोषा मुळे लोकसभेचे सभागृह सोमवारी सकाळी दणाणून गेले मोदी मोदीचा उद्घोष केला आणि बाके वाजवून त्याचे स्वागत केले.
युक्रेनमधील विमान कारखान्यावर हल्ला दोन ठार. रशियन फौजांनी युक्रेनमधील विमानाचे ऐका कारखान्यावर केलेल्या हल्ल्यात दोन जण ठार तर सात जण जखमी झाले याशिवाय एका निवासी इमारती वर गोळीबार करण्यात आल्या मुळे एक जण मारला गेला.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ उल्हास वाघ यांचे निधन. ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्थेचे एनसीसीएस संस्थापक संचालक डॉक्टर उल्हास वाघ यांचे नुकतेच निधन झाले.
दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा 238 धावांनी दणदणीत विजय. श्रेयस अय्यर कामगिरीने प्रभावित.
महागाई वाढीचा दुहेरी वार. फेब्रुवारीत किरकोळ आणि घाऊक दरात चिंताजनक वाढ. सर्वसामान्यांचे कंबरडे मोडून काढणारा महागाई दरात वरच्या दिशेने वाढीचा क्रम कायम असून सरलेल्या फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाई दर 6.0 7 टक्के असा होता.
Current Affairs In Marathi - Chalu Ghadamodi Marathi Prash
भगवान बुद्धांची जगातील सर्वात उंच मूर्ती कोठे बांधली जात आहे?
उत्तर भारत
नुकतीच चारधाम प्रकल्प समितीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - न्यायमूर्ती एके सिकरी
अलीकडेच, शिक्षण मंत्रालयाने कोणाच्या सहकार्याने 'कन्या शिक्षा प्रवेश उत्सव' मोहीम सुरू केली आहे?
उत्तरः युनिसेफ
कोणत्या राज्य सरकारने 'मुख्यमंत्री श्रमिक कल्याण संकल्प' योजना सुरू केली आहे?
उत्तर - त्रिपुरा
कोणत्या राज्य सरकारने आपल्या वार्षिक आर्थिक योजनेचा भाग म्हणून प्रथमच '‘बाल बजट' सादर केला?
उत्तर - मध्य प्रदेश