Current Affairs - Chalu Ghdmodi 13 March 2022 - चालू घडामोडी 13 मार्च 2022
नोकरदारांना धक्का! पीएफ व्याजदर 8.1 टक्के गेल्या 40 वर्षांतील नीचांक. निवृत्तीनंतरचे जीवन अर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी गुंतवणूक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या भविष्य निर्वाह निधीच्या ठेवीवरील व्याज दरात कपातीचा निर्णय शनिवारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ई पी एफ ओ संघटनेने घेतला. चालू आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ईपीएफ वरील व्याजदर 8.5 टाक्यावरून 8.1 टक्क्यापर्यंत कमी करण्यात आला. 8.1 टक्के हा गेल्या चार दशकांतील सर्वात कमी व्याजदर आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सुमारे पाच कोटी सदस्य असून त्यांना या व्याजदर कपातीचा फटका बसणार आहे.
युक्रेन रशिया युद्धाची तीव्रता वाढली. युक्रेनमधील मारिया फॉल्स या बंदराच्या शहराला रशियन सैन्याने लक्ष केले असून मुलांसह 80 जणांनी आश्रय घेतलेल्या एका मशिदीवर हि तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला असे युक्रेन ने शनिवारी सांगितले.
शेतकऱ्यांनी भरलेल्या वीज बिलातून 2841 कोटींचा निधी यंत्रणा सक्षमीकरणासाठी. थकबाकीत 50 टक्के सवलतीची योजना 31 मार्चपर्यंत.
भुमी अभिलेख विभागातील भरती प्रक्रियेला मुदतवाढ. भूमी अभिलेख विभागाच्या वतीने भूकरमापक या सरळसेवा पद्धतीने होणाऱ्या 1000 पदांच्या भरती मधील अर्ज छाननी ला रविवार 13 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
आर टी इ प्रवेशासाठी विक्रमी प्रवेश अर्ज. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर टी इ खाजगी शाळातील 25% राखीव जागांवरील प्रवेश गेल्या काही वर्षातील विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. शिक्षण विभागाने दिलेल्या मुदतीत गेल्या काही वर्षातील सर्वाधिक म्हणजे दोन लाख 85 हजार 322 अर्ज दाखल झाले असून आता पुढील प्रक्रियेचे वेळापत्रक येत्या काही दिवसात जाहीर केले जाईल.
एमपीएससी कडून लवकरच सतराशे जागांसाठी जाहिरात. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने विविध पदांच्या रिक्त जागा भरण्याकरिता येत्या आठवड्यात सतराशे जागांसाठी जाहिरात काढण्यात येणार असून ही प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाणार आहे अशी माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय धामणे यांनी दिली ते म्हणाले की एमपीएससीच्या कामाला आता वेग आला आहे. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा मुलाखती आणि प्रत्यक्ष नियुक्ती ही सर्व प्रक्रिया आता वेगाने पार पाडले जात आहे. यापूर्वी एमपीएससी ची प्रक्रिया रेंगाळत होती. दिरंगाईमुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होते अनेक विद्यार्थ्यांना वय उलटून गेले तरी परीक्षा देता येत नव्हती आता मात्र अशी स्थिती उद्भवणार नाही.
बिरसी तून आज पहिले प्रवासी विमान उडणार. गेल्या अनेक वर्षापासून रेंगाळलेल्या गोंदिया येथील बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतुकीला मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आज 13 मार्च पासून प्रत्यक्ष प्रवासी वाहतुकीला सुरुवात होत आहे बिरसी विमानतळावरून पहिले प्रवासी विमान इंदूर गोंदिया हैदराबाद असे उड्डाण भरणार आहे या सेवेविषयी जिल्हावासीयांना प्रचंड उत्सुकता आहे.
स्मृति मानधना आणि हनुमान प्रीत कौर या अनुभवी जोडीने झळकावलेल्या शतकाच्या बळावर भारतीय महिला संघाने शनिवारी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजला 155 धावांनी नेस्तनाबूत केले. भारताची वेस्टइंडीज वर मात.
श्रेयसच्या झुंजीनंतर श्रीलंकेची तारांबळ भारताची पहिल्या डावात 252 धावांत पर्यंत मजल. भारताचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत असताना श्रेयस अय्यर ने दडपण झुगारत 92 धावांची झुंजार खेळी साकारली. त्यामुळेच भाताला शनिवारी श्रीलंकेविरुद्धच्या प्रकाश झोततील दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी 252 धावांचे पर्यंत मजल मारता आली त्यानंतर श्रीलंकेची पहिल्या डावात 20 षटकात 5 बाद 51 अशी तारांबळ उडाली.
मुंबई पोलीस आयुक्त पांडे यांची सीबीआय चौकशी. माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने सीबीआय मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची शुक्रवारी सहा तास चौकशी केली.
सायबर पोलिसांकडून आज फडणवीस यांचा जबाब. गुप्तवार्ता विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांचा पोलीस बदल यांतील भ्रष्टाचार बाबतचा अहवाल फोडल्याप्रकरणी विधान सभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब पोलीस आज रविवारी नोंदविणार आहेत. त्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील कार्यालयात हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी त्यांना बजावली होती मात्र यानिमित्ताने भाजपाचे शक्तिप्रदर्शनाची तयारी केल्याने पोलिसांनी फडणवीस यांच्या घरी जाऊन जबाब नोंदविण्याचे भूमिका घेतली.