चालू घडामोडी Current Affairs Daily Chalu Ghadamodi 18 March 2022
चक्रीवादळामुळे उष्णतेची लाट, बंगालच्या उपसागरात लवकरच कमी दाबाचे क्षेत्र. हिंदी महासागर आणि लगतच्या नैऋत्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. येत्या काही दिवसात ते चक्रीवादळात परावर्तित होईल त्याचा परिणाम तापमान वाढीवर होणार आहे त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागू शकतो. विदर्भाला सर्वाधिक झड. वाढत्या तापमानाची सर्वाधिक झळ विदर्भाला बसली आहे. गेल्या दोन दिवसापासून तापमान सातत्याने वाढत असून बुधवारी 42.9 अंश सेल्सियस सह अकोला तर गुरुवारी 43 अंश सेल्सिअस सह चंद्रपूर राज्यातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले.
रशियाच्या हल्ल्यात मारी युपोल शहर उद्ध्वस्त चित्रपटगृहात शेत्र अडकले. पुतीन यांनी आपल्याच नागरिकांना धमकावले. रशियाने युक्रेन वरील हल्ले अधिक तीव्र केले आहे रशियन सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यात मारियु पोल शहर उद्ध्वस्त झाले येथील एका चित्रपटगृहात क्षेत्र नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आपल्याच नागरिकांना धमकावले युद्धाचा विरोध कराल तर गोळ्या घालू अशी धमकी त्यांनी दिली दरम्यान एका मॉडेलने पुतिनवर टीका केली होती तर तिचा मृतदेह एका बॅग मध्ये आढळला होता.
नेट, जे आर एफ पात्रता धारकांसाठी 60 टक्के जागा राखीव. यूजीसीच्या बैठकीमध्ये नवीन आराखडा सादर. नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून विद्यापीठ अनुदान आयोग यूजीसी चार वर्षाचा नवीन पदवी अभ्यासक्रम सुरू करणार असून हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट पीएचडी ला प्रवेश मिळणार आहे तसेच यापुढे पीएचडीच्या 60 टक्के जागा नेट आणि जी आर एफ पात्र उमेदवारांसाठी राखीव राहणार आहेत. तर उर्वरित 40 टक्के जागा विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा मधून भरल्या जातील. युसी चे नुकसान झालेल्या बैठकीमध्ये या सुधारणांबाबत चर्चा करण्यात आली या सुधारणांबाबत आराखड्याला बैठकीत मंजुरी देण्यात आली असून ते जनतेच्या सुचनांसाठी ही ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी च्या वतीने नेट आणि जे आर एफ परीक्षा घेतली जाते यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना थेट प्रवेश दिला जातो मात्र अनेक विद्यापीठांमध्ये मार्गदर्शकांची त्रुटीचे कारण दिल्यामुळे पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना नाही पी. एचडी ला प्रवेश मिळत नाही. त्यामुळे आता नवीन सुधारणा नुसार नेट आणि जीआरएफ पात्र विद्यार्थ्यांसाठी पीएचडीच्या 60 टक्के जागा राखीव ठेवल्या जाणार आहेत तर 40 टक्के जागा या प्रवेश परीक्षा मधून भरल्या जाणार आहेत. तसेच नव्या पदवी अभ्यासक्रमाचे फायदे… पदवी अभ्यासक्रम हा तीन किंवा चार वर्षाचा राहणार आहे चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी एक वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किंवा पीएचडी प्रवेशासाठी पात्र ठरेल. हा नवा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम तयार करताना विद्यार्थ्यांना प्रवेशाचे अनेक पर्याय उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्याला अभ्यासक्रम मधात सोडता येईल म्हणजेच जर एखाद्या विद्यार्थ्याने चार वर्षे अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असेल आणि मध्येच त्यांनी अभ्यासक्रम सोडला तर त्याला सोडलेल्या वर्षापासून पुन्हा या अभ्यासक्रमात प्रवेश मिळू शकेल.
भारताचा जीडीपी दर 9.1 टक्के राहणार. आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था मुडिज ने भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकास दर अंदाजात घट केली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार असून चालू आर्थिक वर्षात जीडीपी दर हा 9.1 टक्के इतका राहू शकतो, असे मूडीज ने म्हटले आहे. याआधी मुडीजने 9.5% जीडीपी दराचा चा अंदाज हा लावला होता. परंतु महागडे इंधन आणि खत आयातीचा खर्च वाढल्यामुळे सरकारचा भांडवली खर्च मर्यादित होऊ शकतो तसेच कोरोना संकटातून देशाची अर्थव्यवस्था सावरल्या च्या पार्श्वभूमीवर मुडीजने गतवर्षी साडेनऊ टक्के दराचा अंदाज व्यक्त केला होता.
सरसंघचालका कडून काश्मीर फाइल्स चे कौतुक. सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरलेल्या काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरावर आधारित द काश्मीर फाइल्स चित्रपटाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कौतुक केले. या चित्रपटात आता सत्य दाखवले आहे – बघेल. या चित्रपटात अर्धसत्य दाखवण्यात आले त्यात हिंसा अधिक आहे असा आरोप छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केला. बघेल यांनी बुधवारी रायपूर मध्ये मंत्रिमंडळातील सदस्य व पक्षाचे आमदारांसोबत हा चित्रपट पाहिला त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. 1990 च्या दरम्यान काश्मिरी पंडितांच्या स्थलांतर झाले त्यावेळी केंद्रात बीपी सिंग यांचे सरकार होते व त्याला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा होता मात्र त्यावेळी भाजपने काश्मिरी पंडितांचे स्थलांतर रोखले नाही.
पोलांड ची कॅरोलीना मिस वर्ल्ड 2021. हॉलांड च्या कॅरोलीना बिलावस्काने मिस वर्ल्ड 2021 चा किताब आपल्या नावे केला तर भारतीय वंशाची अमेरिकन नागरिक असलेली श्री सैनी फस्ट रनार अप ठरली. तर भारताची माणसा वाराणसी या स्पर्धेत अकराव्या क्रमांकावर पोहोचली.
होळी मथुरा येथील उत्तर प्रदेश येथील होळी व धुळवड संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे गुरुवारी येथे होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
एम बी ए, एम एम एस, एम सी ए. सीईटीसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष सि ई टी मार्फत एम बी ए, एम एस एस, आणि एमसीए या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश पूर्व सामायिक परीक्षेचे अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. 17 मार्च पासून सीईटी साठी नोंदणी सुरू होणार असून विद्यार्थ्यांना सात एप्रिल पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. अर्ज कसा कराल? एम बी ए प्रवेश प्रक्रिया साठी महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल या संकेत स्थळावर जाऊन अर्ज करता येईल. त्यानंतर होम पेज वरील लिंक वर क्लिक करावे व विचारले ते माहिती भरल्यावर ती जमा करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकून नोंदणी अर्ज भरावा त्यानंतर शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे त्यानंतर अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर त्याची प्रिंट आउट स्वतःजवळ ठेवावी.
राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया रखडली पात्र उमेदवारांनी मध्ये नाराजी. राज्यातील अनुदानित तसेच विना अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत पवित्र पोर्टल च्या माध्यमातून होणारी शिक्षक भरती आरक्षण बदल व करोणा मुळे पुन्हा रखडली आहे. शिक्षकांच्या चार हजाराहून अधिक जागांची भरती प्रक्रिया होणे बाकी आहे. सरकारला या भक्तीचा अजूनही मुहूर्त न सापडल्यामुळे पात्र उमेदवारांना मध्ये नाराजी पसरली आहे.
राज्यातील 228.81 हेक्टर वनक्षेत्र अतिक्रमना खाली. महाराष्ट्र राज्यातील एकूण वनक्षेत्रात पैकी 228 .81 हेक्टर वनक्षेत्र अतिक्रमण खाली आहे. पर्यावरण वने आणि हवामान बदल विभागाने आज संसदेत खुलासा केला आहे. देशात एकूण तीन लाख सात हजार 713 चौरस किलोमीटर क्षेत्रासह एकूण क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात 61 हजार 952 चौरस किलोमीटर इतके नोंदणीकृत वनक्षेत्र आहे. यात 50 हजार 865 चौरस किलोमीटर क्षेत्रावर राखीव जंगले आणि 4 हजार 654 चौरस किलोमीटर क्षेत्रावर बिगर वर्गीकृत जंगले आहेत. महाराष्ट्र राज्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ हे तीन लाख सात हजार 713 चौरस किलोमीटर आहे. संरक्षित जंगल हे 50 हजार 865 चौरस किलोमीटर आहे. तसेच प्रतिबंधित जंगल हे 6 हजार 433 चौरस किलोमीटर आहे. तसेच अ वर्गीकृत जंगल चार हजार 654 चौरस किलोमीटर आहे ऐकून वनक्षेत्र हे 61 हजार 952 चौरस किलोमीटर एवढे आहे.
हरभजन सिंग माजी क्रिकेटपटू यांना आप राज्यसभेत पाठवणार. आम आदमी पक्ष आप ने पंजाब मधून माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांना राज्यसभेवर पाठवण्याचे संकेत दिले आहेत. पंजाब मध्ये बहुमत प्राप्त केल्यानंतर आप ने राज्यसभेतही स्थान मिळवले आहे. भगवांत सिंह मान यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्या च्या काही तासातच आप च्या सूत्रांनी राज्यसभेत पाठवण्यात येत असलेल्या नावावर चर्चा झाल्याचे सांगितले.
भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाइन पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची घोषणा.
स्टील, प्लास्टिकचे दर वाढल्याने पाणीपुरवठा योजनांवर परिणाम. 30 टक्क्यांनी किंमत वाढण्याची शक्यता. लोखंड व प्लास्टिकचे दर वाढल्याने वाहिन्यांचे दर आता तीस टक्क्यांनी वधारले आहेत त्यामुळे जल जीवन मिशन मधील पाणीपुरवठा योजनांसाठी पुन्हा अधिक तरतूद करावी लागणार आहे.
महापालिकेतील विद्यार्थी शिक्षणात अधिक मागावले 81 टक्के मुलांना उतारा वाचनात गति नसल्याचे निष्कर्ष.
चिखलदारा स्कायवॉक उभारणीचा मार्ग मोकळा. विदर्भाचे नंदनवन असलेल्या मेळघाटातील चिखलदरा येथील स्काय वॉक विकासाचा मार्ग आता मोकळा झाला असून वन मंत्रालयाने घालून दिलेल्या अटी आणि शर्तीची पूर्तता करून प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी वन विभागाकडे सादर करण्यात आल्याने स्कायवॉकचे काम लवकरच पूर्णत्वास जाण्याची चिन्हे दिसत आहेत.
चालू घडामोडी Current Affairs Daily Chalu Ghadamodi 18 March 2022 Prashn Uttre Marathi
अलीकडेच एअर इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर :- एन चंद्रशेखरन
भारतातील पहिल्या व्हर्च्युअल स्मार्ट ग्रिड नॉलेज सेंटरचे नुकतेच उद्घाटन कोणत्या राज्यात झाले?
उत्तर :- मानेसर, हरियाणा
नुकताच जागतिक ग्राहक हक्क दिन 2022 कधी साजरा करण्यात आला?
उत्तर :- १५ मार्च
अलीकडे चर्चेत असलेले ‘पेंद्रथान मंदिर’ कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- जम्मू काश्मीर
अलीकडेच कोणत्या भारतीय खेळाडूने सर्वात वेगवान कसोटी अर्धशतक करण्याचा कपिल देव यांचा विक्रम मोडला आहे?
उत्तर :- ऋषभ पंत
नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन 2022 कधी साजरा केला जातो?
उत्तर :- १४ मार्च
अलीकडे डिजिटल शॉपिंग 2021 मधील जागतिक गुंतवणूकीत कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे?
उत्तर :- अमेरिका
नुकतेच जर्मन ओपन बॅडमिंटन 2022 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने रौप्य पदक जिंकले आहे?
उत्तर :- लक्ष्य सेन
अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने वार्षिक आर्थिक योजनेचा भाग म्हणून प्रथमच ‘मुलांचा अर्थसंकल्प’ सादर केला आहे?
उत्तर :- मध्य प्रदेश
अलीकडेच ऑइल इंडिया लिमिटेड (OIL) चे पुढील अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाचे नाव घेतले आहे?
उत्तर :- रणजित रथ