दैनंदिन चालू घडामोडी – Daily Current Affairs 24/03/2022
31 मार्च पासून निर्बंधमुक्त! केंद्र सरकारचा निर्णय, मुखपट्टी अंतर नियम पालन मात्र आवश्यक. देशात दोन वर्षांपूर्वी करोनाच्या शिरकावा नंतर लागू करण्यात आलेले सर्व प्रतिबंधात्मक निर्बंध 31 मार्च पासून मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. करोणा रुग्ण संख्येत मोठी घट झाल्याने हा निर्णय घेण्यात आला असला तरी मुखपट्टीचा वापर आणि अंतर नियमाचे पालन यापुढेही करावे लागणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे.
इन्स्पायर या स्पर्धेसाठी राज्यातील 31 बालवैज्ञानिक यांची निवड. इन्स्पायर या राष्ट्रीय पातळीवरील विज्ञान स्पर्धेसाठी राज्यातील 31 बाल वैज्ञानिकांची निवड करण्यात आली आहे त्यातील सर्वाधिक सहा विद्यार्थी पुणे जिल्ह्यातील आहेत. राज्य विज्ञान 7 शिक्षण संस्थेने ही माहिती दिली. इन्स्पायर स्पर्धेसाठी राज्य पातळीवर स्पर्धा यंदा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली राज्य पातळीवरील स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थ्यांनी एकूण 311 प्रकल्पाचे सादरीकरण केले राज्यपातळीवरील या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला सदर झालेल्या प्रकल्पातून एकतीस विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
विनाअनुदानित शाळांबाबत दोन दिवसात बैठक अनुदानावर विधान परिषदेत गदारोळ. विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याच्या मागणीवरून विधान परिषदेत बुधवारी गदारोळ झाला आणि कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले याप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर दोन दिवसात बैठक घेण्यात येईल असे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
आय एन एस शिवाजीचा केंद्र सरकारकडून गौरव. भारतीय नौदलाचे सर्वात मोठे प्रशिक्षण केंद्र असा लौकिक असलेल्या लोणावळा येथील आय एन एस शिवाजी या संस्थेला केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाकडून गौरविण्यात आले आहे सागरी अभियांत्रिकी या विषयातील प्रशिक्षण देणारे सर्वोत्कृष्ट केंद्र म्हणून हा सन्मान करण्यात आला आहे. आय एन एस शिवाजी या तळावरील पायाभूत सुविधा तसेच भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासासाठी केले जाणारे प्रयत्न मित्र देशाच्या नवदल विषयक प्रशिक्षण संस्था यांच्या तपासणीनंतर हा गौरव करण्यात आला आहे केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योग मंत्रालयाचे सचिव राजेश अग्रवाल यांनी आयएनएस शिवाजी चे कमांडिंग ऑफिसर कमोडॉर्स अरविंद रावल यांना यासंबंधीची प्रमाणपत्र प्रदान केले. आय एन एस शिवाजी या नौदल तळावर असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात भारतीय नौदल तसेच तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते 1945 मध्ये या स्थळाची स्थापना करण्यात आली 2014 मध्ये येथे समुद्र अभियांत्रिकी केंद्राची स्थापना करण्यात आली. भारतीय तसेच मित्र देशांनी नवोदय गाणी संपूर्ण नवोदय व्यवस्थेतील कर्मचारी आणि अधिकारी यांच्या कौशल विकास साठी हे केंद्र कार्यरत आहे.
एसटी महामंडळाचे विलीनीकरण नाहीच त्रीसदस्य समितीचा अहवाल मंत्रीमंडळाने स्वीकारला. राज्य परिवहन महामंडळाचे एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नसल्याचे स्पष्ट करणारा त्रिसदस्यीय समाज समितीचा अहवाल बुधवारी मंत्रिमंडळाने स्वीकारला. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या त्रिसदस्यीय अहवालात एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी समजणे आणि महामंडळाचा प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय सरकारच्या विभाग मार्फत मार्फत करणे ही मागणी मान्य करणे कायद्यातील तरतुदीनुसार तसेच प्रशासकीय आणि व्यावहारिक बाबी विचारात घेता शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार आता मराठीत राज्य सरकारकडून कायद्यात सुधारणा. राज्याची राजभाषा मराठी असतानाही कायद्यातील पळवाटा शोधत प्रशासकीय कारभारात इंग्रजीला प्राधान्य आणि मराठीकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका नियोजन प्राधिकरण लवकरच कारवाईच्या कचाट्यात सापडणार आहेत राज्यातील ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद महापालिका अशा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मराठीची सक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यानुसार कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहेत त्यामुळे यापुढे मुंबई महापालिका एम एम आर डी सिडको यांना आपला कारभार मराठीतच करावा लागेल. मराठीचा राजभाषा म्हणून स्वीकार करण्यात आल्यानंतर सण 1964 चा महाराष्ट्र राजभाषा अधिनियमानुसार एक मे 1966 पासून राज्यातील सर्व शासकीय कामकाजात मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे आणि त्यानुसार विधिमंडळाचे कामकाज सरकारचे कायदे तसेच शासकीय कामकाज मराठीत केले जाते.
जम्मू-काश्मीरमध्ये 890 केंद्रीय कायदे लागू तर 250 राज्य कायदे रद्द केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून राज्यसभेत माहिती. जम्मू काश्मीर मध्ये अनुच्छेद 370 रद्द केल्यापासून दहशतवादी घटना कमी झाले असून तेथे गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याचा दावा केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी राज्यसभेत केला.
पुष्कर सिंह धामी यांना उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी शपथ. पुष्कर सिंह धामी यांनी बुधवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांचा या पदावरील दुसरा कार्यकाळ सुरू झाला परेड ग्राऊंडवर झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या नव्या मंत्रिमंडळातील आणखी आठ सहकाऱ्यांना शपथ देण्यात आली.
टेनिसपटू बार्टीची आश्चर्यकारक निवृत्ती. तीन ग्रँडस्लॅम विजेती ऑस्ट्रेलियन खेळाडू एशले बार्टी वयाच्या पंचविसाव्या वर्षी टेनिस मधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे दोन महिन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा जिंकणाऱ्या बार्टी ने अचानक केलेल्या या घोषणेमुळे चहाते आणि अन्य टेनिसपटूंना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Chalu Ghadamodi Prashn Uttare
नागरी उड्डयन मंत्रालय आणि FICCI द्वारे अलीकडेच कोणत्या शहरात “विंग्ज इंडिया 2022” चे आयोजन करण्यात आले होते?
उत्तर – हैदराबाद
अलीकडेच “रिस्ट अॅश्य्युअर्ड: एक आत्मचरित्र” कोणी लिहिले आहे?
उत्तर – आर कौशिक
संयुक्त अरब अमिरातीच्या कोणत्या शहरात नुकतीच वर्ल्ड पॅरा अॅथलेटिक्स ग्रांप्री स्पर्धा पार पडली?
उत्तर – दुबई
"रिस्ट अॅश्युरड: अॅन ऑटोबायोग्राफी" हे कोणत्या माजी भारतीय क्रिकेट कर्णधाराच्या चरित्रावर लिहिले गेले आहे?
उत्तर- गुंडप्पा रंगनाथ विश्वनाथ
नुकतेच मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली?
उत्तर - एन बिरेन सिंग
वास्तुविशारद, शिक्षक, समाजसेवक असलेल्या फ्रान्सिस कॅरी यांना नुकताच कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
उत्तरः प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार
ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2022 मध्ये भारताच्या लक्ष्य सेनचा रँक किती आहे?
उत्तर - दुसरा
अलीकडेच व्हाईट हाऊसच्या COVID-19 प्रतिसादाचे नवीन समन्वयक म्हणून कोणत्या भारतीय वंशाच्या डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - आशिष झा