महाराष्ट्र राज्य संपूर्ण माहिती - Maharashtra State Information
महाराष्ट्र राज्य माहिती - Maharashtra State Information :
•१ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.
•द्वैभाषिक मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरले
राज्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, वायव्येस गुजरात राज्य आणि दादर व नगरहवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे
उत्तरेस व पूर्वेस मध्य प्रदेश, अग्नेयेस आंध्र प्रदेश, दक्षिणेस कर्नाटक ही राज्ये व गोवा केंद्रशासित प्रदेश आहे.
राज्याचा आकार साधारणपणे काटकोन त्रिकोणी असल्याचे दिसते.
पश्चिमेकडील उत्तर-दक्षिण असा ७२० किमी. लांबीचा समुद्रकिनारा म्हणजे काटकोन त्रिकोणाचा पाया असून येथून
पूर्वेस ८०० किमी. अंतरावरील राज्याचे पूर्व टोक म्हणजे या काटकोन त्रिकोणाचा शिरोबिंदू होय.
•महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग:
•कोकण (30746 चौ.किमी): मुंबई,मुंबई उपनगर,ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी/सिंधुदुर्ग.
• पुणे/प.महाराष्ट्र (57268 चौ.किमी): पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
• नाशिक/खान्देश (574426 चौ.किमी): नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार.
• औरंगाबाद/मराठवाडा (64822 चौ.किमी) : औरंगाबाद ,जालना ,बीड ,परभणी ,हिंगोली ,उस्मानाबाद ,लातूर नांदेड .
• अमरावती/प.विदर्भ (46090 चौ.किमी) :अमरावती,बुलढाणा,अकोला,यवतमाळ,वाशिम.
• नागपूर/पूर्व.विदर्भ (51336 चौ.किमी) :नागपूर,वर्धा,चंद्रपूर,गडचिरोली,भंडारा,गोंदिया.
•महाराष्ट्र नैसर्गिक सीमा :
•वायव्येस : सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या.
•उत्तरेस : सातपुडा पर्वतरांगा व त्याचा पूर्वेस गाविलगड टेकड्या.
•ईशान्येस : दरेकासा टेकड्या.
•पूर्वेस : चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर.
•दक्षिणेस : हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी.
•पश्चिमेस : अरबी समुद्र.
राज्य व त्यांना जोडणारे महाराष्ट्रातील जिल्हे
•गुजरात : पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे
•दादर नगर हवेली : ठाणे, नाशिक
•मध्ये प्रदेश : नंदुरबार, धुले, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपुर, भंडारा, गोंदिया
•छत्तीसगड : गोंदिया, गडचिरोली
•आंध्रप्रदेश : गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ, नांदेड
•गोवा : सिंधुदुर्ग
--------------------------------------------------------------------------------------------------
•महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात- १ मे १९६२.
•महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री- यशवंतराव चव्हाण, राज्यपाल- श्री प्रकाश
•महाराष्ट्राचे क्षेत्रफळ- ३,०७,७१३ चौ.कि.मी.
•महाराष्ट्राचा पूर्व-पश्चिम विस्तार- ८०० कि.मी.,
•महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी- ७२० कि.मी. (सर्वात जास्त- रत्नागिरी)
महाराष्ट्राची राजधानी- मुंबई, उपराजधानी- नागपूर
•महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते : आंबा
•महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते : मोठा बोंडारा
•महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता : हारावत
•महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता : शेकरु
•महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर : कळसुबाई (१६४६ मी.)
•महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्याची लांबी : ७२० किमी
महाराष्ट्र प्रमुख घाट रस्ते/महामार्ग
•कसारा / थळ घाट --- मुंबई ते नाशिक
•माळशेज घाट ---ठाणे ते अहमदनगर
•दिवा घाट ---पुणे ते बारामती
•कुंभार्ली घाट ---कराड ते चिपळूण
•फोंडा घाट--- कोल्हापूर ते पणजी
•बोर / खंडाळा--- घाट मुंबई ते पुणे
•खंबाटकी घाट ---पुणे ते सातारा
•पसरणी घाट ----वाई ते महाबळेश्वर
आंबा घाट ----कोल्हापूर ते रत्नागिरी
•महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य : कर्नाळा (रायगड)
•महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र : खोपोली (रायगड)
•महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प : तारापुर
•महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ : मुंबई विद्यापीठ (१८ जुलै १८५७)
•महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ : राहुरी, जि.अहमदनगर (१९६८)
महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यावरील धरणे
भडारदरा : प्रवरा : अहमदनगर
जायकवाडी : गोदावरी : औरंगाबाद
गगापूर : गोदावरी : औरंगाबाद
सिध्देश्वर : दक्षिणपूर्णा : हिंगोली
येलदरी : दक्षिणपूर्णा : हिंगोली
मोडकसागर : वैतरणा : ठाणे
मुळशी : मुळा : पुणे
दारणा : दारणा : नाशिक
माजलगाव : सिंदफणा : बीड
बिंदुसरा : बिंदुसरा : बीड
खडकवासला : मुठा : पुणे
कोयना : कोयना : सातारा
राधानगरी : भोगावती : कोल्हापूर .
महाराष्ट्र अभयारण्य
माळठोक (पक्षी) >>अहमदनगर
•मेळघाट (वाघ) >>अमरावती
•भीमाशंकर (शेकरू खार) >>पुणे
•सागरेश्वर (हरिण) >>सांगली
•नांदूरमधमेश्वर (पक्षी) >>नाशिक
•देऊळगाव रेहकुरी (काळवीट) >>अहमदनगर
•राधानगरी (गवे) >>कोल्हापूर
•टिपेश्वर (मोर) >>यवतमाळ
महाराष्ट्र राज्य माहिती ठोकळा 1000 प्रश्न उत्तरे / Maharashtra Rajya Prashn Uttre Thokla 1000 Prashn Uttre सर्व स्पर्धा परीक्षा