MPSC CHALU GHADAMODI DAILY || रोज चालू घडामोडी || 26 march 2022
राज्यात उष्णतेच्या लाटेची भीती. राज्यातील वाऱ्यांचा वेग मंदावल्याने पुन्हा एकदा तापमानाचा पारा चांगलाच वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे सोमवारपासून 28 मार्च राज्यभरातील वातावरण कोरडे होणार असून उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यभरातील बहुतांश शहरांमधील कमाल सरासरी तापमान 40 ते तेथे 41 अंशावर जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
खासगी विद्यापीठांच्या मनमानी शुल्क वसुलीवर अंकुश.
खासगी विद्यापीठाच्या मनमानी शुल्क वसुलीला चाप लावण्यासाठी शुल्क नियमांना करिता समिती गठीत करण्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसभेत केली त्याचप्रमाणे मुंबईतील जे जे कला महाविद्यालयात विद्यापीठाचा दर्जा देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही सखी सावित्री समित्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा.
राज्यातील लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक खाजगी शाळेत जून पासून सीसीटीव्ही बसविणे सत्तेचे करण्यात आले असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये वर्षभरात लावण्यात येतील अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली. प्रत्येक शाळेत सखी सावित्री समित्या स्थापन केल्या जातील आणि त्या माध्यमातून मुलांना लैंगिक किंवा अन्य त्रास होऊ नये यासाठी आवश्यक दक्षता व उपाय योजना केल्या जातील.
सीईटी चे संभाव्य वेळापत्रक जाहीर.
राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाने सीईटी सेल विविध सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले त्यानुसार अभियांत्रिकी औषध निर्माण शास्त्र कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची एमएचटी तसेच सीईटी ही परीक्षा 11 जून पासून सुरू होईल.सीईटी सेल चे आयुक्त रवींद्र जगताप यांनी शुक्रवारी संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले यंदा फेब्रुवारीपासून सीईटी साठी ची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती सीईटीच्या संभाव्य वेळापत्रकानुसार भौतिकशास्त्र रसायन शास्त्र आणि गणित पीसीएम या गटाची परीक्षा 11 ते 16 जून तर भौतिकशास्त्र रसायन शास्त्र आणि जीवशास्त्र पीसीबी या गटाची परीक्षा 17 ते 23 जून दरम्यान होईल.
व्यवस्थापन शास्त्र पदव्युत्तर पदवी एमबीए सीईटी परिक्षा ही 24 ते 26 जून आणि संगणक शास्त्र एमसीए सिईटी परीक्षा 27 जून ला होईल असे नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक सीईटी सेल च्या संकेतस्थळावर पाहता येईल.
एसबीआय म्युच्युअल फंडाची गंगाजळी सहा लाख कोटी पुढे.
देशातील सर्वात मोठे फंड घराने एसबीआय म्युच्युअल फंडाने एकूण व्यवस्थापन योग्य मालमत्तेत अर्थात गंगाजळीत सहा लाख कोटी रुपयांचा टप्पा पार करून अग्रस्थान कायम राखले आहे ऐतिहासिक टप्पा पार करणारे ते देशातील पहिले फंड घराणे ठरले आहे.
पुढील वर्षापासून महिला आयपीएल यंदा चार प्रदर्शनीय सामने बीसीसीआय ची घोषणा.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची बीसीसीआय पुढील वर्षीपासून महिलांच्या इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेटला प्रारंभ करण्याची योजना आहे असे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी शुक्रवारी सांगितले याच प्रमाणे एक वर्षांच्या विश्रांतीनंतर यंदा महिलांचे चार प्रदर्शन सामने होणार आहेत.
आयपीएल आज सलामीच्या लढतीत चेन्नई कोलकत्ता आमने-सामने इंडियन प्रीमियर लीग आयपीएल आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचे वर्षभराच्या कालावधीने भारतात पुनरागमन होत आहे शनिवारी सलामीच्या लढतीत गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि उप-विजेता कोलकत्ता नाइट रायडर्स हे संघ आमने-सामने येणार
Chalu Ghadamodi Prashn Uttare
मार्च 2022 मध्ये भारतीय नौदलाच्या कोणत्या जहाजाला प्रेसिडेंट कलर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
उत्तर - INS वालसुरा
कोणत्या राज्यात 3000 एकर जमिनीवर 17 जागतिक दर्जाची शहरी जंगले असतील?
उत्तर - दिल्ली
मारुती सुझुकी इंडियाचे नवे सीईओ आणि एमडी म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर: हिसाशी टेकुची
FIFA विश्वचषक कतार 2022 चा अधिकृत प्रायोजक कोणाला बनवण्यात आले आहे?
उत्तर: BYJU'S
नुकतेच एनफिल्ड बॅरल्स इंडिया ऑइल स्टोरी हे पुस्तक कोणी प्रकाशित केले आहे?
उत्तर - ऋचा मिश्रा
अभिषेक चॅटर्जी यांचे नुकतेच निधन झाले, त्यांचा कोणाशी संबंध होता?
उत्तर - बंगाली चित्रपट
हिमालयातील राज्यांमध्ये NITI आयोगाच्या तज्ञ तयारी निर्देशांकात अलीकडे कोणते राज्य अव्वल आहे?
उत्तर : उत्तराखंड